♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


"स्त्री अस्तित्वाची ज्योत - सावित्रीबाई फुले"

३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती त्या निमित्त लेख....

     आज ३ जानेवारी ,म्हणजे विद्येचे दैवत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती,यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र भरात बालक दिन म्हणून उत्साहात साजरी केले जाते,त्या अनुषंगाने त्यांच्या कार्याचा व त्यांच्या विचारांचा जागर या महाराष्ट्रात होतोय का,महिलांच्या स्वतंत्रासाठी,शिक्षणासाठी ज्यांनी रक्त सांडले त्यांच्या विचारांचा अस्तित्व,स्त्री स्वातंत्र्याची ज्योत आजही पेटती आहे का? असा प्रश्न माझ्या सारख्या एका सामान्य माणसाला पडणे सहजीकच आहे.
   क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा उलघडा करणे म्हणजे स्त्री स्वातंत्रांचा अस्तिवाची जाणीव करणे होय,खर तर आजच्या वैज्ञानिक युगात हा समाज इतका शिक्षित झाला,की त्यांचे पाय जमिनीवर कधी येतच नाहीत,स्त्रियांच्या शिक्षणाचा विचार केल्यास शैक्षणिक,राजकीय, क्रीडा अश्या अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्याचे दिसते,मात्र आज जी स्त्री या समाजात स्वतंत्रपणे वावरत आहे,आज प्रत्येक क्षेत्रात आपली भूमिका बजावत आहे या सर्वाच श्रेय महात्मा फुले दांपत्याला जाते,मात्र खंत या गोष्टीची वाटते खऱ्या विध्येची देवता असलेल्या क्रांतीज्योती सावित्री बाई फुलेंकडे या समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन नाहीच.
     ज्या व्यवस्थेत बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता,ज्या व्यवस्थेत स्त्रियांना काही कठोर कायद्याचा बंधनात अडकवले होते, स्त्री म्हणजे केवक भोग वस्तू,स्त्रीयांना चूल आणि मूल या पकीकडे कुठलाच अधिकार स्वीकारता येणार नाही,शिक्षणाचा अधिकार,स्वतंत्रेचा अधिकार, विधवा माहिलेवरील अत्याचार,बालविवाह, अश्या अनेक बंधनात अडकलेला हा स्त्री समाज, अश्या अवस्थेत एकोणीसाच्या शतकात असा एक द्रूव तारा जन्माला आला,की समस्थ बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आपलं अस्तित्व पणाला लावले,ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले,बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्‌ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला,हा दारिद्र, गुलामी ही केवळ आशिक्षतेमुळे होत असल्याचे त्यांच्या एका काव्याच्या ओळीतून आपल्याला पाहायला मिळते.

विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका  अविद्येने केले ।।

   या समाजाला जर गुलामीतून मुक्तता मिळवायचे असल्यास सर्वप्रथम शिक्षणाची कास धरणे हाच खरा उपाय आहे,आणि हाच गुलामी वरील प्रहार आहे,ज्योतिबांनी मानवी जीवनात शिक्षणाला खुप मोठं स्थान दिले आहेत,त्यातच स्त्री शिक्षणासाठी आपलं अस्तित्व देखील खर्ची घातले,१८४८ साली पुण्यातील भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरवात करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, स्त्रीयांना शिक्षण म्हणजे महिला शिक्षिका लागते अश्या चिंतेत असतांना पत्नी सावित्रीबाई फुले आपल्या पतीच्या सहकार्याला,त्यांच्या सामाजिक कार्यात खांद्याला खांदा लावून कार्य करण्याची जिद्द दाखवली,महात्मा फुलेनी सावित्रीबाई ला एखाद्या ज्वारीची बियाणे मातीत पेरल्यावर त्याच उगवण हे रोपट्यात,झाडात व त्या झाडाला कणसं येत आणि जो पेरलेलं बियाण आपलं अस्तित्व मिटवून कणसंरुपी अनेकांना घडवते,अश्या उदाहरणानी सावित्रीबाईंना प्रेरित करत समाज कार्यात स्त्री असल्याचा कुठलाच भेदभाव नठेवता प्रस्थपित व्यवस्थेशी झुंज घेण्यास उभा केलं,पती कडून अक्षर ओळख करून घेऊन स्वतः मुलींना शिकवण्या सज्ज झाली,सावित्रीबाई देश्याच्या पहिल्या महिला मुख्याध्यापीका बनल्या, या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला,जग बुडणार,कली आला." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला,सावित्रीबाई अश्या धमक्यांना डगमगल्या नाहीत,शाळेत जाताना अश्या कर्मठ लोकांनी अंगावर शेण दगड फेकले असता अंगावरचे घाण झालेले कपडे बदलून पुन्हा या समाजाला लागलेल्या गुलामीच घाण काढण्यासाठी शाळेत शिकवू लागल्या,स्त्रीयांना केवळ शिक्षणच नाहीतर प्रत्येक क्षेत्रात समानता मिळण्यासाठी त्यांनी झगडले, स्त्रियांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी कार्य केले,बाल जठर विवाह पध्दतीमुळे वयाच्या ११-१२ वर्षात मुली विधवा होऊ लागल्या अश्या विधवा मुलींना एकतर सती जावे लागले नाहीतर केशवपन करून कुरूप बनवले जाई,स्वातंत्र्याची हक्क नसल्याने ही स्त्री एखाद्या नराधमाचा शिकार होत असे,आणि समाज गरोदर विधवा म्हणून छळ करत असे,अश्या अवस्थेत या महिलापुढे जीव देणे नाहीतर भ्रूणहत्या करणे हाच पर्याय असे,अश्या अवस्थेत जोतिबांने बालहत्या प्रतिबंधक गृह सूर केले,आणि त्यास सावित्रीबाईनी समर्थकपणे चालवल्या,त्यात जन्माला येणार सर्व बाळांना मायेची उब दिली,त्यातच काशीबाई नामक एका ब्राम्हण विदवेची मूल सावित्रीबाई फुलेंनी दत्तक घेतले,त्यांचं यशवंत अस नामकरण केले,तोच यशवंत पुढे चालून डॉक्टर झाला.
  इ.स. १८९६-९७ दरम्यात पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता, हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला.ब्रिटीश सरकारने या रोगीना वस्ती पासून लांब स्थलांतरित करून खबरदारी चे पाऊल उचलले असता, यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
    आशा स्त्री शिक्षण त्याच बरोबर स्त्री अस्तित्वाची जननी असलेली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे आपल्या समाज कार्याचा ध्यास शेवटच्या स्वासपर्यंत खांद्या


- श्रीपाद नागनाथ राऊतवाड
             मदनुर जि. कामारेड्डी
             मो.९९७००५२८३७