♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


रचना कन्हेर

#कुणीतरी_असावं...
ज्यानं हात धरून बसवावं,
मनातली उलाढाल जरा प्रेमानं पुसावं.

कुणीतरी असावं...
ज्यानं पुसावी आसवे,
जाणून घ्यावे आपुलकीने फुगवे, रुसवे.


कुणीतरी असावं...
जिथे मुसमुसुन रडावं,
त्यानं मात्र अलगद कुशीतच धरून ठेवावं.

कुणीतरी असावं...
ज्याला आपण पूर्णपणे कळावं,
नजरेतल्या भाषेत ज्यानं हृदयचं वाचावं.

कुणीतरी असावं,
ज्यानं आपल्यासाठी स्वतःला झोकवावं,
स्वार्थापोटी नव्हे जरा निस्वार्थ प्रेम द्यावं.

कुणीतरी असावं,
ज्यावर हक्कानं रुसावं,
त्यानं मात्र रुसव्यावर मिश्कीलपणे हसावं.

कुणीतरी असावं,
ज्याचं विश्वच मी असावं,
माझ्याशिवाय ज्याचं आयुष्यच रीतं असावं.

असं कुणीतरी असावं, असं कुणीतरी असावं..!!
- सौ रचना कन्हेर