♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


वाटचाल

काव्यशिल्प हे ब्लॉग 2007 मध्ये तरुण पत्रकार देवनाथ गंडाटे यांच्या कल्पनेतून सुरु करण्यात आले. प्रारंभीपासूनच ताज्या बातम्या देण्याचा मानस राहिला.  झाल्यानंतर वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळू लागला. वाचकाच्या वाढलेल्या अपेक्षा आणि सूचना याचे स्वागत करीत ब्लॉगची मांडणी अधिक सुंदर आणि वाचनीय करण्यासाठी गजानन ताजने यांनी पुढाकार घेऊन लेआउट डिझाईन साठी मदत केली. पुढे ताज्या बातम्या आणि पत्रकारिता क्षेत्रात काम करणा-यांना संग्रही माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी अनेक -की- तयार करण्यात आल्या. गत चार वर्षात वाढलेली लोकप्रियता बघून काव्यशिल्प टीम  तयार करण्यात आली.

काव्यशिल्प या नावाने  काही  काळ sms सेवा सुरु केली होती. पुढे त्याचे रूपांतर २०१४ पासून व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून घडामोडीची माहिती देण्याचे काम सुरु आहे. जानेवारी २०१७ पासून काव्यशिल्प फेसबुक ग्रुप सुरु असून, अडीच हजाराच्या आसपास सदस्य आहेत.

भारतीय पत्रकारिता आणि साहित्याने मुद्रित माध्यमातून लाइव्ह माध्यमाकडॆ झेप घेतली आहे. हा बदल अनुभताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. आजघडीला दिवाळी अंक मुद्रितरूपात उपलबद्ध असते. मात्र, नव्या पिढीची क्रेझ बघता तेच साहित्य ऑनलाइन उपलब्ध व्हावे हा उद्देश ठेवून ई दिवाळी अंक ही संकल्पना मनात आली. वाचकांच्या आग्रहाखार पहिला ऑनलाइन दिवाळी अंक प्रकाशित करीत आहोत. हो आपली वाचनाची भूक भागवेल अशी आशा आहे.