जिवलगा
======
रक्ताला काढत का कुणी
आपल्या धमण्यातुन गरज असतांना
मन पाहु शकतं का?
काळीज वेदना सोसतांना---
तु आणि मी जेव्हा आपण झालो
दोन जीव एक मन झालो
पाहता येत नाही आता
तुझ्या पविञ श्वासावर
कुणाचही आक्षेप नोंदवण
अन् कुणी तुझं नाव
आपल्या हातावर गोंदवण-----
जिवलगा--
तुला का कळत नाही रे
माझ्या तिळतीळ जगण्याच कारण
मी नाही पाहु शकत तुझं
रोज होणार मरण
साधा ब्र काढला कुणी?
खोट काढुन
बोट दाखविनार्यांची
छाटावी वाटते जीवा---
ज्यांनी रचल आयुष्याचं सरण
वाटते त्याच्या नरडीचा घोट घ्यावा
जिवलगा ---
आपणही चुकतो का रे?
----------------------------
आता नाही घसरु द्यायची
तुझ्या पायाखालची वाळू
वादळातही तुला ऊभ करायचं आहे
ही व्यवस्था बदलण्यासाठी ,
तुझ्यात साविञी,जिजाईचं वार पेरुन
भोगसंस्कृतीवर स्वार करायचं आहे
अगणीक वेदना घेवून जगणारा
अश्वस्थामा नाही बघायचा तुझ्यात
मला तथागताचा
स्वयम् दिप पेटवायचा आहे
खेमराज भोयर 7798822764
======
रक्ताला काढत का कुणी
आपल्या धमण्यातुन गरज असतांना
मन पाहु शकतं का?
काळीज वेदना सोसतांना---
तु आणि मी जेव्हा आपण झालो
दोन जीव एक मन झालो
पाहता येत नाही आता
तुझ्या पविञ श्वासावर
कुणाचही आक्षेप नोंदवण
अन् कुणी तुझं नाव
आपल्या हातावर गोंदवण-----
जिवलगा--
तुला का कळत नाही रे
माझ्या तिळतीळ जगण्याच कारण
मी नाही पाहु शकत तुझं
रोज होणार मरण
साधा ब्र काढला कुणी?
खोट काढुन
बोट दाखविनार्यांची
छाटावी वाटते जीवा---
ज्यांनी रचल आयुष्याचं सरण
वाटते त्याच्या नरडीचा घोट घ्यावा
जिवलगा ---
आपणही चुकतो का रे?
----------------------------
आता नाही घसरु द्यायची
तुझ्या पायाखालची वाळू
वादळातही तुला ऊभ करायचं आहे
ही व्यवस्था बदलण्यासाठी ,
तुझ्यात साविञी,जिजाईचं वार पेरुन
भोगसंस्कृतीवर स्वार करायचं आहे
अगणीक वेदना घेवून जगणारा
अश्वस्थामा नाही बघायचा तुझ्यात
मला तथागताचा
स्वयम् दिप पेटवायचा आहे
खेमराज भोयर 7798822764