♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


अनुराधा हवालदार


भरली माझी ओटी
नाही माया खोटी
आनंदाला भरती
माझ्या बाळासाठी
वेदना सहन करूनी
प्रसवते तुजलागुनी
उर आले भरुनी
आनंदाश्रु नयनी
जन्मास घातले तुला
तुही जन्म दिलास मला
नवे नाते येई उदयाला
क्रुतार्थ केले तु मातेला
क्षण श्वास तुझ्याचसाठी
जपते या पंखांखाली
पाळणा तळहाताचा
मऊ उबदार मखमली
- अनुराधा हवालदार
नागपूर.

------------
👻गुलाबी थंडी👻
💞👻💞👻💞👻
गुलाबी थंडीचा असर
होतो आहे सगळ्यांवर
जाता पारा शुन्यावर
घाला टोपी शाल मफ्लर
💞👻💞👻💞👻
थंड गुलाबी पहाटे
दवबिंदुं पानांवर
ओसरली धुक्याची चादर
कोवळे ऊन पडल्यावर
💞👻💞👻💞👻
गरम चहा मसालेदार
बसून उन्हामधे उबदार
शेकण्या पेटवून शेकोटी
बसती भवती गोलाकार
💞👻💞👻💞👻
गुलाबी मौसम प्रेमाचा
जोडीदारांच्या प्रितीचा
मिळे ऊब मिठीत घेता
आधार एकाच रजईचा
💞👻💞👻💞👻
गुलाबी मौसम बहराचा
रंगबिरंगी फळफुलांचा
वसंताच्या आगमनाचा
सुमधुर कोकीळ गीतांचा
💞👻💞👻💞👻
मौसम आला थंडीचा
काजू बदाम खाण्याचा
तुपातील लाडू डिंकाचा
आणि शिरा गाजराचा
💞👻💞👻💞👻
टवटवीत मौसम थंडीचा
निसर्गाच्या सुंदरतेचा
बहर मुक्त उधळणाचा
ऋतू सर्वांच्या पसंतीचा
मिळून सहलीस जाण्याचा
💞👻💞👻💞👻
💁🏻अनुराधा हवालदार
नागपूर.

----------------
😎चापलूसी😎
😍😎😍😎😍😎
बाहेर पडताच षुरुष मंडळी
नेहमी मँडमला म्हणतात,
मँडम! खुप छान दिसतात
आणि फार गोड हसतात
😍😎😍😎😍😎
Hi,hello ने सगळ्यात आधी
बोलणे सुरु करतात
एक शब्दही बोलले की
प्रश्नावर प्रश्न विचारतात
बोट दिल त्यांना की
हात धरायला करतात
काय करता?कुठे रहाता?
सगळी माहिती काढतात
अन् मँडमला म्हणतात,
मँडम!खुप छान दिसतात
आणि फार गोड हसतात
😍😎😍😎😍😎
भोळेपणाचा आव आणतात
मँडम मँडम करतात
गुडमार्निंग गुडनाईट
रोज न चुकता म्हणतात
या बहाण्याने मुद्दाम ते स्वतःची आठवण देतात
हळू हळू ते सुंदरतेची तारिफ करायला लागतात
अन् मँडमला म्हणतात,
मँडम !खुप छान दिसतात
आणि फार गोड हसतात
😍😎😍😎😍😎
तारिफ करून मँडमची ते
खुप त्यांना चढवतात
पण मँडम विवाहित आहे
कळताच चेहरे त्यांचे पडतात
तरी बोलणे सोडत नाही
रोज एकदा तरी बोलतात
खरखोट सांगून स्वतःच्या
खुप बढाया मारतात
अन् मँडमला म्हणतात,
मँडम! खुप छान दिसतात
आणि फार गोड हसतात
😍😎😍😎😍😎
लग्न,मुलं झाली तरीही
मेनटेन आहात म्हणतात
दोन लेकरांची आई असूनही
पोरगीसोरगीच दिसतात
काय राज तुमच्या हेल्थचा
असे जाणूनच विचारतात
अस बोलायची देवजाणे
कशीकाय हिंमत करतात
अन् मँडमला म्हणतात,
मँडम! खुप छान दिसतात
आणि फार गोड हसतात
😍😎😍😎😍😎
यांच्यासारखे लोक जेव्हा
कौतुक मँडमचे करतात
त्याने मँडमला प्रेरणा मिळते
त्या मेनटेन स्वतःला ठेवतात
तुमची बायको माझी मैत्रीण
हे मँडम जेव्हा सांगतात
जमीन सरकते पायाखालची
मग धूम पळ ठोकतात
अन् मँडमला म्हणतात,
मँडम !खुप छान दिसतात
आणि फार गोड हसतात
😍😎😍😎😍😎
षुरुष असे वागतात हे
बायका खपवून घेतात
पण हेच बायकोने केले तर रागाने लाल होतात
विवाहित असतांना ही
शहाणे हातपाय मारतात
हिरवा सिग्नल मिळाला कुठे
की लग्गेच सुरु होतात
असेच वागायचे असते तर
मग लग्नच कशाला करतात
अन् मँडमला म्हणतात,
मँडम !खुप छान दिसतात
आणि फार गोड हसतात
😍😎😍😎😍😎
💁🏻अनुराधा हवालदार
नागपूर.

-----------------

💑 *प्रिया* 💑
💑💑💑💑💑💑
जीवनप्रवाही वाहतांना
स्वेच्छेने दिली तु साथ प्रिया
घरकुलासी उजळणारी
प्रकाशदायी वात प्रिया
💑💑💑💑💑💑
पेलली संकटे कितीतरी
सोबतीने माझ्या प्रिया
उधाणलेल्या वादळाला
पेलणारी नाव प्रिया
💑💑💑💑💑💑
मी सदैव व्यस्त राहिलो
सुखांच्या शोधात प्रिया
वाटेत आली दुःख त्याला
झेलणारी ढाल प्रिया
💑💑💑💑💑💑
भौतिकाला त्यागलेला
अलौकिकाचा ध्यास प्रिया
लौकिकाच्या वाटेवरूनी
चालणारी प्रीत प्रिया
💑💑💑💑💑💑
नियतीचे डाव पेलले
खंबीरतेने माझ्या प्रिया
जगलेल्या अन् उरलेल्या
जीवनाचे सार प्रिया
💑💑💑💑💑💑
टाकतो पाऊल पुढे मी
पाठीशी उभी आहे प्रिया
उडून गेल्या पाचोळ्याच्या
आठवणींचे गाव प्रिया
💑💑💑💑💑💑
तुझ्याविना मी आहे अधूरा
झुंजण्या वादळास प्रिया
धावत ये प्रिये त्वरेने
ऐकूनि माझी हाक प्रिया
💑💑💑💑💑💑
💁🏻अनुराधा हवालदार
नागपूर

-----------------

नको अंत पाहू🙏🏻
😢😔😢😔😢😔
देवा कसा न्याय तुझा
वादळात उडालं छप्पर
गरिबाच्याच नशिबी का रे
असते खाणे ठोकर
😢😔😢😔😢😔
देवा तुझ्या मंदिराला
भव्य सोन्याचा कळस
मात्र आम्हा बापुड्यांची
का येते तुला किळस
😢😔😢😔😢😔
कस बस उभारलं होतं
मेहनतीनं झोपडं
तेही नाही बघवलं तुला
नाही केल कुणाचं वाकडं
😢😔😢😔😢😔
जीवाचं रान करुन
थाटला होता संसार
समद झालं उध्वस्त
आता कुणाचा आधार
😢😔😢😔😢😔
भेगाळलं काळीज
पायात नाही बळ
कुठून आणू पैका
मिळेल का म्रुगजळ
😢😔😢😔😢😔
नको अंत पाहू आता
ढासळल्या जीवांचा
आधार वाटे मनाला
भंगल्या झोपडीचा
😢😔😢😔😢😔
💁🏻अनुराधा हवालदार
नागपूर.

---------------------------

😊माणूसकी😊
🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊
देवा तुला करते
आज एक प्रार्थना
माणसामध्ये माणूसकीची
जीवंत राहू दे भावना
🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊
जगतात तर सगळेच
पण वेगळेपण जपावं
जपून माणूसकीला
माणूस म्हणून जगावं
🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊
माणूसकीच्या नात्याने
भेद करणं सोडावं
माणसाने माणसाला
माणूस म्हणून मानावं
🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊
स्वतःवरुन इतरांच्या
भावना दुःख ओळखावं
भावना शुन्य जगामधे
थोड निस्वार्थीपणे जगावं
🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊
पैश्यांच्या श्रीमंतीप्रमाणे
मनही श्रीमंत असावं
गरीबांच्या सुखदुःखात
मदतीला धावून जावं
🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊
क्षमाशांतीचा श्रुंगार लेवूनी
या देहासी सजवावे
सद्गुणांचा साठा जमवूनी
त्रुप्ततेचे धन साठवावे
🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊
मीपणा अहंपणात
माणूसकी पार हरवली
दुःख स्वतःचेच कुरवाळत
मानवता विझून गेली
🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊
शर्यतीच्या युगात आटले
रक्त जरी असे आपुले
विरले नाते ,घरटे तुटले
जन्मासी नटसम्राट आले
🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊
स्वार्थी नीच
जात माणसाची
सरड्यासारखी रंग बदलणारी
प्रगती होता दुसऱ्यांची
अगरबत्ती सम जळणारी
🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊
लांडग्यांसारखी धूर्त माणसं
पाय खेचतात आपल्यांचे
वेळ बदलता पाठ फेरती
मुंडके छाटती दीनदुबळ्यांचे
🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊
खोट्या प्रेमाचा आव आणती
हेतु साधून पंख छाटती
एकमेकांना लूटून घेती
निरागसांचे खिसे कापती
🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊
माणसांच्या बाजारात
माणूसकी कुठे हरवली
कोठारात अन्नधान्याच्या
भूक कुजली करपली
🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊
भव्य बाजारी माणसांच्या
कुणी कुणाचे कुणीच नसती
क्षणिक नाते व्यवहाराचे
जिंकला माणूस हरली माणूसकी.
🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊
💁🏻अनुराधा हवालदार
नागपूर.

--------------------------------

नवरात्र हायकू🌷
🌸🌷🌸🌷🌸🌷
पूजा शक्तीची
धूम नवरात्रीची
नऊ देवींची
🌸🌷🌸🌷🌸🌷
अंबा रेणुका
महाकाली चंडिका
नाना रुपांची
🌸🌷🌸🌷🌸🌷
अश्विन शुद्ध
प्रतिपदेस आली
माळ सजली
🌸🌷🌸🌷🌸🌷
घटस्थापना
स्रुजनाचे प्रतिक
जे अलौकिक
🌸🌷🌸🌷🌸🌷
धूप आरती
नवरात्रोत्सवात
ज्योती दिव्यात
🌸🌷🌸🌷🌸🌷
उपासनेत
दंग भक्तिभावात
उपवासात
🌸🌷🌸🌷🌸🌷
💁🏻अनुराधा हवालदार
नागपूर.

-----------------------
दिवाळी 🏮
💡🏮💡🏮💡🏮
अंतरीचे दिप उजळू द्या
अंतरीचा अंधार पळू द्या
प्रेमाच्या वाती वळूनी
तेल दयेचे दिपात भरुया
💡🏮💡🏮💡🏮
क्षमाशीलतेच्या उंबरठ्यावर
मनाशी मनाचा मेळ करुया
रागद्वेषाचा अंधकार मिटवू या
प्रेमाचा प्रकाश पसरवू या
🏮💡🏮💡🏮💡
दिवाळीस दिपमाळ सजवती
मनामनातील ज्योती जळती
दुष्ट भावना द्वेष भावना
कुलषित छायेला मिटवती
🏮💡🏮💡🏮💡
झगमगत्या दिव्यांची कांती
प्रेमजिव्हाळा ह्रदयी वसती
अमावसेच्या काळ रात्री
दिपक रंगबिरंगी चमकती
🏮💡🏮💡🏮💡
दिप तेव्हा फडफडून विझला
जेव्हा गरीबाचा लेक पाहिला
नयनात आशेचा दिप चमकता
सर्व पसारा व्यर्थ वाटला
🏮💡🏮💡🏮💡
पोटात भूकेचे फटाके फुटती
शरीर झाकण्या वाती विकती
एकवेळच्या भाकरीसाठी
मिठायांचे ते भांडी घासती
🏮💡🏮💡🏮💡
टिमटिम तारे छतातून झाकती
चंद्रमौळी झोपडीस सजवती
चिमणीतल्या मंद प्रकाशात
दिप आशेचे उजळती
💡🏮💡🏮💡🏮
दिवाळी करुया सौजन्याची
सोज्वळतेची सजगतेची
संवेदना जाग्रुत ठेवून
जरा वेगळी सोशिकतेची
🏮💡🏮💡🏮💡
💁🏻अनुराधा हवालदार
नागपूर.

------------------------
स्पर्श होई मनाला😒
💔👈🏻💔👈🏻💔👈🏻
मनाचे हळवेपण माझे
बघूनी हेलावते यातनेला
पाहूनी घोर दुःखाला
स्पर्श होई मनाला
💔👈🏻💔👈🏻💔👈🏻
भिक मागती बालके
कोण कारणीभूत याला
बघूनी विदारक द्रुष्याला
स्पर्श होई मनाला
💔👈🏻💔👈🏻💔👈🏻
बेजार झाले किशोर
भटकती दाही दिशेला
शोधित रोजगाराला
स्पर्श होई मनाला
💔👈🏻💔👈🏻💔👈🏻
शिकारी नराधमांच्या
बळी पडती वासनेला
उध्वस्त बघूनी अब्रुला
स्पर्श होई मनाला
💔👈🏻💔👈🏻💔👈🏻
लढती देश रक्षणाला
सीमेवरच्या सैनिकाला
वीरमरण प्राप्त होता
स्पर्श होई मनाला
😢😢😢😢😢😢😢
देशास करूनी भिकारी
लुटे भ्रष्टाचारी भूकेला
लाज त्यांनी सोडली
स्पर्श होई मनाला
💔👈🏻💔👈🏻💔👈🏻
अन्नदाता उपाशी
जीव त्रासला शेतीला
कर्जाने घात केला
स्पर्श होई मनाला
💔👈🏻💔👈🏻💔👈🏻
काय झाले या पिढीला
बळी पडले व्यसनाला
देश अधोगतीस झुकला
स्पर्श होई मनाला
💔👈🏻💔👈🏻💔👈🏻
मनुष्य पैश्याचा भूकेला
उतरतो कुठल्याही थराला
गुन्हेगार येई जन्माला
स्पर्श होई मनाला
💔👈🏻💔👈🏻💔👈🏻
मोबाईलच्या या युगात
पिढी जातेय लयाला
यंत्रांच्या आहारी गेला
स्पर्श होई मनाला
💔👈🏻💔👈🏻💔👈🏻
दुःख होते मनाला
जीव कितीच कळवळला
कोण समजेल भावनेला
ह्रदयाच्या तळमळीला
💔👈🏻💔👈🏻💔👈🏻
💁🏻अनुराधा हवालदार
नागपूर.

-----------------------------

डोह 🌪
🌊🌊🌊🌊🌊🌊
थांग ना तळाचा
हा जीवघेणा डोह
गोत्यात नेई भवरा
नको करुस मोह
🌊🌊🌊🌊🌊🌊
संथ दिसे पाणी
नसे खळखळाट त्याला
परी आत काय खळबळ
ओळख स्वभावाला
🌊🌊🌊🌊🌊🌊
फसू नये दिसण्याला
बक फसवतो मास्याला
वरवरती शांतदांत
पारख अंतराला
🌊🌊🌊🌊🌊🌊
मोहात फसती सारे
विसरती सत्य का रे
विष काळजाच्या डोही
जीव जाई घेऊनी रे
🌊🌊🌊🌊🌊🌊
होई पोहण्याचा मोह
सुर मारती मोहाने
अनोळखी जलधारा
कवेत घेई छळाने
🌊🌊🌊🌊🌊🌊
भवऱ्यात फसत जाशी
गोल गटांगळ्या खाशी
चिखलात रुतत रुतत
जीव जाऊन वर येशी
🌊🌊🌊🌊🌊🌊
मोह लोभ प्रलोभनं
दिसती वरुन छान
जाळ फेकून मोहाचे
जीवघेणे प्रयोजनं
🌊🌊🌊🌊🌊🌊
या जीवनसरितेला
दरी,डोह तारण्याला
ईश उभा सदैव पाठी
तरण्यास साथ देई
तारण्यास हात देई
🌊🌊🌊🌊🌊🌊
💁🏻अनुराधा हवालदार
नागपूर

---------------------
पंख फुटले मनाला👐🏻
👐🏻👐🏻
पंख फुटलेत मनाला...
सांग ना सावरू कसं याला..?
लाख समजवता समजतंच नाही...सांग ना आवरू कसं याला..???
👐🏻👐🏻
या क्षणाला किती रडवतं...
अन् त्या क्षणाला खळखळुन हसवतं...
बघ ना रे...वेडयात काढतील न मला..
लाख समजवता समजतं नाही...
सांग ना आवरू कसं याला....?
👐🏻👐🏻
अलगद आनंदाच्या आभाळात घेऊन जातं...
तुझ्या आठवांच्या वर्षावात मनसोक्त न्हातं...
बघ ना मन माझ अन् ओढ मात्र तुझीच त्याला...
लाख समजवता समजतं नाही...
सांग ना आवरू कसं याला...?
👐🏻👐🏻
आकाशातल्या चांदण्या जणु माझ्या ओंजळीत भरतयं..
इवल्याशा पापणीआड छोटी छोटी स्वप्न दडवतंय..
बघ ना...कसा वेडा छंद याला...
लाख समजवता समजतं नाही..
सांग ना कसं आवरु याला...?
👐🏻👐🏻
माझ्यातली मी दिसेनाशीचं झालेय मला...
माझ्यातही नकळतं तुझच प्रतिबिंब दिसतय मला...
बघ ना कसं तुझंच वेड लागलयं याला...
पंख फुटलेत मनाला...
सांग ना कसं सावरु याला..?
लाख समजवता समजतं नाही...
सांग ना कसं आवरु याला...???
👐🏻👐🏻
सावरता सावरेना...
आवरता आवरेना...
समजवता समजेना...
खरंच पंख फुटलेत मनाला...
तुझ्याकडेचं ओढ त्याची क्षणाक्षणाला.....
सांग ना आवरु कसं याला.....?
लाख समजवता समजतं नाही...
सांग ना आवरू कसं याला..?
👐🏻👐🏻
💁🏻अनुराधा हवालदार
नागपूर




-----------------
लेक माई लाडाची👧🏻
👩‍👧👧🏻👩‍👧👧🏻
लेक माई तु लाडाची
तुहा हाये मले अभिमान
शिकून सवरुन मोठ्ठी हो
घे लय उची उडान
👩‍👧👧🏻👩‍👧👧🏻
लेक माई तु गुनाची
शाळेमंदी घातलं तुले
काय कमी करनार नाई
काय पायजे सांग मले
👩‍👧👧🏻👩‍👧👧🏻
चार घरचे काम करन
इटा रेती गिट्टी उचलन
पन तुह्या शाडाशिक्षनासाटी
कुठल बी काम म्या करन
👩‍👧👧🏻👩‍👧👧🏻
नक करु तु माह्यावानी
वणवण भणभण रणरण
पोलीसात भरती होउन
करजो
आपल्या देशाच रक्षन
👧🏻👩‍👧👧🏻👩‍👧
माह्य हे सपन मी
तुह्या डोयात पायते
पूरी करशीन माई इच्छा
ईश्वास मले वाटते
👩‍👧👧🏻👩‍👧👧🏻
गरिबांच ना कुनीच वाली
सारं सोताचं सावरा लागते
काय अडचन असली तं
खंबीरपने तोंड द्या लागते
👩‍👧👧🏻👩‍👧👧🏻
लेक माई तु मोलाची
मोलाचं तुले येक सांगते
शिक्षन करते दुर गरिबीले
दिये ग्यानाचे लावते.
👩‍👧👧🏻👩‍👧👧🏻👩‍👧👧🏻
💁🏻अनुराधा हवालदार
नागपूर.
(अस्सल वर्हाडाची भाषा)


------------------------


महाराष्ट्राची खाद्यसफर*
🍱🍱🍱🍱🍱🍱
विविध पदार्थांनी सजलेली,
महाराष्टाची खाद्यसंस्कृती
पूर्णब्रह्म अन्नास म्हणती
भोजनास यज्ञकर्म मानती.
🍥🍥🍥🍥🍥🍥
कोकणचो माणूस साधाभोला
नारळ कोकम अति वापरला
आंबोळी,पानगी जेवणाला
उकडीचे मोदक गणपतीला.
🍛🍛🍛🍛🍛🍛
मासे भाताची आवड फार
भाताची शेतं हिरवीगार
माडांची त्याला सुबक किनार
आंबे फणसांची झाडं डौलदार.
🌰🍑🌰🍑🌰🍑
मुंबईकरांना कायम गर्दी
वडापाव पावभाजीचे दर्दी
चौपाटीच्या भेळचाटची
क्रेझ प्रचंड पाणीपुरीची.
🥞🥞🥞🥞🥞🥞
पुण्याची आमटी मिसळ अन पाव
सपक जेवणामुळे सपक स्वभाव
बाळूच्या ढाब्याची पिठल भाकरी
चितळे जोशींचे पदार्थ भारी.
🌮🥙🌮🥙🌮🥙
वर्हाडातला माणूस लय रांगडा
जेवते झुणका, भाकर,खर्डा
मसाल्याचे वांगे,तोंडले भात
सावजीच्या रस्स्याची न्यारीच बात.
🥗🍚🥗🍚🥗🍚
आमाले लय भावते पातळभाजी
गोळाभात आन कांद्याची भजी
डाळभाजी,वडाभात,उकरपेंडी
कढीच्यासोबत पुडाची वडी.
🥖🌭🥖🌭🥖🌭
कोल्हापूरचा मर्द तगडा
खातो रस्सा पांढरा तांबडा
झणझणीत मिसळ इथली शान
राजाभाऊची भेळ भलतीच तुफान.
🍤🍗🍤🍗🍤🍗
चमचमीत चरचरीत मांसाहार
भजीपाव, उसळ वडा,वडासांबार
मिर्चीच्या चटणीवर तेलाची धार
कटवडा इथला लई फेमस प्रकार.
🥄🍴🍽🍽🍴🥄
चला बहिणाबाईंच्या जाऊ खानदेशात
हुरडा अन् भरीत पार्ट्या केळीच्या शेतात/बनात
कुरड्या,बिबड्या,नाचणी पापड करती उन्हाळ्यात
शेवभाजी, डुबुक वडे पाहुण्यांना खिलवतात.
🍯🥓🍯🥓🍯🥓
पातोड्याची भाजी अन् कळणाची भाकरी
वरण बट्टी, कढी फुनके,डाळ गंण्डोरी
मावा जिलेबी अन् मांड्याची लज्जतच न्यारी
बडगीतला ठेचा,आखाजीला सांजोरी
🍜🍩🍜🍩🍜🍩
मराठवाडा वसला गोदावरीच्या खोऱ्यात
उदरनिर्वाहाला इकडे शेती जास्त करतात
उंबराची आमटी, धपाटे जेवणात आवडतात
मांडगंं,भुरका, शेंगोळे चवीने खातात.
🧀🥘🧀🥘🧀🥘
मुरमुऱ्याचा सुशीला नाश्त्याला करायलो
मेथीफळं, वरणफळावर ताव मारायलो
पेंडपाला,भरले कांदे मस्त जेवायलो
संतमहंतांच्या भूमिला वंदन करायलो.
🍕🍪🍕🍪🍕🍪
विविध पदार्थांची नाव ऐकून
सुटले ना पाणी तोंडाला ?
महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा
अभिमान मराठी माणसाला.
😋💪🏻😋💪🏻😋💪🏻
अश्या महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीला
चला सगळे करू जतन
पारंपरिक पदार्थांचे
करूया नवरूपात सर्जन.
🍿🍩🍿🍩🍿🍩💁🏻

  *अनुराधा हवालदार*
*नागपूर*

  

 --------------
गौरी 🌺
🌼🍂🌼🍂🌼🍂
गौरी आल्या माहेराला
उधाण आले उत्सहाला
सज्ज झाले स्वागताला
मखरात बसवा गौराईला
🌼🍂🌼🍂🌼🍂
गौरी आल्या माहेराला
उत्तम अनुराधा नक्षत्राला
रांगोळी सजली आगमनाला
शोभा आली अंगणाला
🌼🍂🌼🍂🌼🍂
जेष्ठा कनिष्ठा सुंदर सुकुमार
बाळे गोंडस शहाणी फार
रुप साजिरे नयन दिपले
मुखचंद्रावर तेजाचा भार
🌼🍂🌼🍂🌼🍂
गौरी आल्या माहेराला
त्यांना लिंबलोण धरा
नाना पत्री फुले पुजेला
मनी चैतन्याचा झरा
🌼🍂🌼🍂🌼🍂
आल्या गौरी माहेराला
पंचपक्वांन्य नैवेद्याला
भाज्या चटण्या केल्या सोळा
झाले नातलग सर्व गोळा
🌼🍂🌼🍂🌼🍂
आल्या गौरी माहेराला
खण नारळ ओटीला
लेकी सासरी निघाल्या
कंठी हुंदका दाबला
🌼🍂🌼🍂🌼🍂
गौरी येती माहेराला
भाद्रपद अष्टमीला
भाऊ गणेश भेटीला
किती सुखद सोहळा
🌼🍂🌼🍂🌼🍂
गौरी येती माहेराला
सुखी ठेव घरदाराला
आयुआरोग्य लाभो कुटुंबाला
अखंड ठेव सौभाग्याला
🌼🍂🌼🍂🌼🍂
💁🏻अनुराधा हवालदार
नागपूर.


------------------