हिवाळभरणी
भुईतुन उगवले
कोंब ईवले ईवले
तया पाणी देण्या मंद
माझे खट्याळ पावले
कोंब ईवले ईवले
तया पाणी देण्या मंद
माझे खट्याळ पावले
दवबिंदु कोंबावरी
चमकतो शुभ्र तारा
पाय माझे गारठ्यात
गोठलेले कण गारा
चमकतो शुभ्र तारा
पाय माझे गारठ्यात
गोठलेले कण गारा
पाणी वाहते दांडान
वाहे कोबांच्या वरून
भिजे खुशाल वावर
माझ मन हो भरून
वाहे कोबांच्या वरून
भिजे खुशाल वावर
माझ मन हो भरून
अडचन हो विजेची
येती ह्याच समयाला
कधी कधी नाही पाणी
बहरत्या हो पिकाला
येती ह्याच समयाला
कधी कधी नाही पाणी
बहरत्या हो पिकाला
ज्याचे गारठले अंग
झाला कासावीस जीव
त्याच्या कष्टाच्या घामाला
सदा भावाची उणीव
झाला कासावीस जीव
त्याच्या कष्टाच्या घामाला
सदा भावाची उणीव
ज्याचे गारठले अंग
झाला कासावीस जीव
त्याच्या घामाच्या कष्टाचे
करी दुसरेच भाव
झाला कासावीस जीव
त्याच्या घामाच्या कष्टाचे
करी दुसरेच भाव
करी रात्रंदिन कष्ट
देश जगवण्यासाठी
साला देशच ठरला
चोर त्याच्या कष्टासाठी
देश जगवण्यासाठी
साला देशच ठरला
चोर त्याच्या कष्टासाठी
नाही विहरीत पाणी
गेली सुकून धरणी
*करी*सुकल्या पिकांची
बाप हिवाळभरणी
गेली सुकून धरणी
*करी*सुकल्या पिकांची
बाप हिवाळभरणी
कोरड्या विहरीपाशी
बाई माझा उभा बाप
त्याच घडीकड लक्ष
लोडशेडींगचा धाक
बाई माझा उभा बाप
त्याच घडीकड लक्ष
लोडशेडींगचा धाक
मालाच्या भावाचा बाई
मांडलाय सारा खेळ
खर्चाच्या पैशाचा कुठे
लागेना हो टाळमेळ
कृषीप्रदान देशात
कृषल चढे सरणी
मांडलाय सारा खेळ
खर्चाच्या पैशाचा कुठे
लागेना हो टाळमेळ
कृषीप्रदान देशात
कृषल चढे सरणी
कुठवर चालायचा
हो हमीभावाचा मोर्चा
मने उदवस्थ लोकांची
केली दंगलीची चर्चा
कृषलाचे हो शोषन
ही पुढा-यांची करणी
हो हमीभावाचा मोर्चा
मने उदवस्थ लोकांची
केली दंगलीची चर्चा
कृषलाचे हो शोषन
ही पुढा-यांची करणी
प्रेमराज रावसाहेब त्रिभुवन प्रेमविरा औरंगाबाद
7057470286
7057470286