♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


दिवा दिपावळी

चैत्र प्रतिपदा सजली निसर्गाने धरती नटली।।
दिवे लावुनी अंगणी आज अमावस्या हसली।।

    दीपावळी म्हणजे फक्त दिव्यांचा सण नसुन मनातील दिवे उजळावयाला पर्यायी सण म्हणजे दिपोत्सव हा भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहाने मनवल्या जात असतो!   हा सण सतयुग काळा पासुन सुरु झाल्याची नोंद वेद शास्त्रात सांगितलेले आहे.
              श्रीराम वणवास भोगुन सिते सह जेंव्हा परत अयोध्येला आले तेंव्हा नगर जनांना अतीशय आनंद झाला आनी उत्सवाचे रुपांतर दिपावळीच्या रुपात प्रगटला,पुर्ण नगर दिपाच्या झगमगाटाने सुशोभित करुन श्रीरामचंद्राचे स्वागत केले होते.गतो दीपावळीचा सण आजही मोठ्या थाटात मनवतात.त्या दिवशी अमावस्या असते.असंख्य दिपांनी तीमिर नाहीसा करतात. त्या रात्री लक्ष्मीचे पुजन करतात,आनी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा महत्वकांशी प्रयोग करतात.घरात सुख,शांतता,आनंद लाभावा म्हणुन हा प्रयत्न असतो. तो प्रयत्न सफल ही होतो सर्व कुटूंब एकत्र येवून हा सण अतिशय उल्हासाने साजरा करतात.
      सर्वीकडे सुगीचे दिवस चहुकडे हिरवळ,फळांच्या बागा,बहरलेली फुंलझाडे,वेली अनेक रंगाच्या फुलांनी नटलेले ताटवे निसर्गाचे अप्रतिम लावण्य त्यात सागर,सरिता,झरने निसर्ग पुर्णतया तरुन भासत असतोय.अन्न धाण्याचा, भाजीपाल्याचा सुकाळ,मनाला भावनारी गुलाबी थंडी,आल्हादपुुर्ण वातावरन दिपावळी सणाला पुरक असते!
      आजकालची दिपावळी जरा वेगळ्या पद्धतिने  साजरी करतांना दिसतात.धावपळीचे जन जीवन असल्यामुळे दोन दिवसात दिवाळी सारखा सन आटोपता घ्यावा लागतो.
ऑफिसला सुट्या नसतात मुलांना पण सुट्या नसतात. अश्यावेळी काय करावे काही सुचत नाही. मग आपन रेडिमेटचा सर्रास वापर करत असतो. कपड्यापासुन तर खाण्यापिण्याच्या वस्तू देखिल रेडीमेट वापरतो ,या सर्व व्यस्तते मुळे नुकसान मात्र आरोग्याला भोगावे लागतात.हे वेगळे,
       सनातन काळी अस नव्हते,१५ दिवस आधीपासूनच सारखी धावपळ असायची,घर अगदी साधी रहायची,दर वर्षी रंगरोगन व्हायचे,घराचा कानाकोपरा स्वच्छ व्हायचे,सजावटा करीता जे करता येईल ते करायचे.                                              आमच्या लहानपणी सिंधीच्या झाडाची मोठी पाने आणुन त्यावर झेंडूची फुले खोवून सुंदर सुशोभित कमान तयार करुन ती आपल्या मेनगेटवर किंवा दरवाज्याला लावुन शोभा वाढवित असे,झेंडुच्या फुलांची हार करुन सर्व दरवाज्याला लावुन त्या सुंगधी दरवळात मनसोक्त आनंद सर्वांगात भिनत असे.आंब्याच्या पानांची तऱ्हेतऱ्हेनी गुंफुन तोरने लावत असे. मातीची पनती कुंभाराकडुन दरवर्षी नविन आणायचो,सर्व वातावरण कसे प्रफल्लीत गांधाळलेले असायचे.
      घरातील थोरांनाही उत्साह यायचा,बसल्या जागेवरच त्यांच्यापरीने ते काहीतरी मदत करायचे,
आईला तर मुळी वेळच मिळायचा नाही. पहाटे उठून अंभ्यगस्नान म्हणजे अंगाला तेलमालीश करुन  आंघोळ करुन टिळा लावत असे,सर्व भांवडांना अन बांबांना ओवाळणी करीत असे.अंभ्यगस्नान झाल्यावर फराळ करुनच बाहेर कामाला लागायचो,आनी चार दिवस आधीच अनारसा करण्या साठी आई तयारी करायची,प्रत्येक दिवशी नविन गोड पदार्थ खायला बनवित असे. करंज्या, लाडु, चकल्या,शंकरपाळे, सेव,चिवडा,जेवना सोबत खीर किंवा हलवा गरमागरम असायचा.खुप खेळने खाणे ते जीवन काही वेगळेच होते ती मजा आता नाही राहिली.
        मिळमिळीत वाटतय सर्व काही पण अशातही आपन नविन मार्ग काढायचे,वेळ मिळाला तर वृद्धाश्रमात जावून प्रेमाने त्यांना सहानूभुती स्नेह देवून त्यांची उदासीनता दूर करुन त्यांचा विरंगुळा करावा वेळ द्यायचा.कधी वेळ काढायचा अपंग,अनाथ बालंका साठी काही खावू देवुन आत्मीयतेने त्यांना प्रेमाने गोंजारावे,मानवता जगात श्रेष्ठ आहे.प्रत्येक मानव परोपकारी असायला हवा.यामुळे मनशांती मिळते.                                                                
 पैश्याने सर्व काही मिळत नसते,दुखीतांचे दु:ख दुर करण्याचा थोडा जरी प्रयत्न केल्यास दिव्य अणुभूतीने आपले मनाला आनंद व समाधान मिळते असते. निरक्षरांना साक्षर करने,किंवा कोणती ही कलाविष्काराचे दान करायचे,बुद्धीचे दान
विचाराचे दान,विद्येचे दान हे सर्वस्वी दान मानवाला उच्च श्रेणीत नेवुन ठेवतो.आनी सहज रुपात आपनास  आत्मानंद मिळतो.व आपले वयक्तीक दु:ख क्षणात विसरतो.                                                               
 अश्या प्रकारे आपन आपली दिवाळी साजरी करुन या धावपळीच्या आयुष्यात आपले जीवन सार्थक करु शकतो.आनी ह्रदयदिपांजली करुन दिपावळीची पणती जाळुन तिमीर दुर करण्याचा थोडा का होईना प्रयत्न करुन प्रकाश किरने पसरवू शकतो.         

  श्रीमती.मिनाक्षी क.किलावत, यवतमाळ