दिवाळीस ह्या सदनी तुमच्या सुखदीपांची माळ सजावी
ऎहीक भौतिक सर्व सुखांनी झोळी तुमची भरुन जावी
दिवाळीस ह्या सदनी तुमच्या धनदीपांची माळ सजावी
लक्ष्मीदेवीच्या कृपाप्रसादे तिजोरी सारी भरूनी जावी
दिवाळीस ह्या सदनी तुमच्या निरामयाची माळ सजावी
व्याधि सारया दूर पळुनी काया तुमची निरोगी व्हावीं
दिवाळीस ह्या सदनी तुमच्या शांतिदीपांची माळ सजावी
तनामनासी शांती मिळुनी जीवनात समृद्धी यावी
- अनंत औरंगाबादकर
मनीषनगर नागपूर