♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


विजयकुमार राऊत

गझलेसाठी !!

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी !!
तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

नव्या युगाची, दूर ग्रहावर,वस्ती थाटू
कठीण कुठला, आहे मंगळ, गझलेसाठी !!

पृथ्वीवरच्या, हवेत आता,श्‍वास कोंडतो
प्रदूषणाची, सोसू का झळ? गझलेसाठी!!

युगायुगांचा, इथे कसा,"एल्गार' जाहला
क्षितिजावरती, उठले वादळ, गझलेसाठी !!

कलंदराने, कष्टाने,हे रोप लाविले !!
येइल नक्‍की, वृक्षाला फळ,गझलेसाठी!!

या आधीचे,जगणे कां ते,जगणे होते?
यानंतरचे, जगणे केवळ, गझलेसाठी !!

गझलेच्या, शत्रूंना आता, उत्तर द्याया
आणा तुमच्या, लेखणीत बळ, गझलेसाठी !!

विजयकुमार राऊत
8888876462