दिपावलीचा सण म्हटलं की दिव्यांची प्रकाशमय आरास
,सजावट,नवनवीन फराळाचा आस्वाद अन सर्वात महत्वाचे म्हणजे भेटीचा उत्साह.
मध्यमवर्गीय कुटुंबासाठी या पेक्षा जास्त दिवाळीचा आनंद कोणत्याच गोष्टीत
नसतो एवढे मात्र नक्की. तेंव्हा चार पाच दिवसाचा सहवास क्षणिक असतो पण
थोडासा बदल घडवून आणतो, दैनंदिन साचेमय दिनचर्येत...
जिकडे तिकडे दुकानात खरेदी सुरू असते अन कधी ग्राहकांचा तर कधी विक्रेत्यांचा दिवाळा होत असतो.
पण ज्या समाजाची दिवाळी ही आपल्यावर अवलंबवून असते त्याचा
कोणी विचारच करत नाही. प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा समान हक्क आहे पण
परिस्थिती काही कुणाला सांगून येत नाही..
कुटुंबाच्या पोषणासाठी फिरल्या चाकावर मातीला आकार मिळत असतो
अन त्या कुंभाराच्या कलेचे दर्शन आपल्याला त्याच्या सुबक कलाकृतीतून मिळत
असते. दिवसभर भुकेची पर्वा न करता कुटुंबासाठी दोन पैसे मिळावे म्हणून हा
समाज रातदीन राबत असतो.... ** ** ** ** **
वर्षभर कसे बसे पैसे मिळवून कुटुंबांना पोसणारा समाज आजही जगण्यासाठी धडपडत असतो.
आज आपली परिस्थिती चांगली आहे म्हणून आपण आपल्यातली माणुसकी
मात्र विसरायची नसते.कारण माणुसकी आपल्याला समोरच्याच्या दुःखात अन सुखात
सामील व्हायला शिकवत असते.
म्हणून कधी कधी आपण अश्या समाजाचा पण विचार करायला हवा...
म्हणून कधी कधी आपण अश्या समाजाचा पण विचार करायला हवा...
दिवाळीचा दिवा आपल्या घरात पेटवताना जर या दिव्यामुळे
कुणाच्या चेहर्यावर आनंदाचा ज्योत (स्मितहास्य) पहायला मिळत असेल तर
त्यापेक्षा मोठे समाधान लाखमोलच्या वस्तु मध्येही मिळणार नाही...
आपल्या समाजातील अशा बांधवांचा विचार करून जर या दिवाळीत आपण दिवा पेटवलात तर समाजात रोषणाई झगमगाटायला वेळ लागणार नाही. ** ** ** ** **
लाखमोलाचा china चा माल विकत घेतल्यापेक्षा गरीबाच्या कलेची किंमत त्याला सन्मानाने मिळवून देता येईल...
यामुळे दिव्याच्या प्रकाशाने आपली दिवाळी साजरी होईलच पण परिस्थितीच्या कोपामुळे या अंधारलेल्या समाजाच्या आनंदाची ज्योत पेटविण्याचा छोटासा प्रयत्न आपल्याकडून होइल...
दिवाळीचा दिवा पेटविताना या अंधारलेल्या समाजावर प्रकाश टाकण्याचा हा छोटासा प्रयत्न....
यामुळे दिव्याच्या प्रकाशाने आपली दिवाळी साजरी होईलच पण परिस्थितीच्या कोपामुळे या अंधारलेल्या समाजाच्या आनंदाची ज्योत पेटविण्याचा छोटासा प्रयत्न आपल्याकडून होइल...
दिवाळीचा दिवा पेटविताना या अंधारलेल्या समाजावर प्रकाश टाकण्याचा हा छोटासा प्रयत्न....
कितीतरी लोक जगण्याच्या धडपडीसाठी राबराब राबतात . निसर्ग
कोपला तरी आपल्या संघर्षाची सातत्याने सामना करतात पण भुकेने व्याकुळ होऊन
दोन पैशावर जगतात. या अंधारलेल्या समाजाचा विचार कधी मनात आला तर अंगावर
काटा उभा राहतो.....
दिवाळीचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहून आपणही आनंदी
होतो. तसाच या समाजाच्या आनंदाचा आपण भाग बनत असू तर या मध्ये काही वावगं
ठरणार नाही, एवढे मात्र नक्की...
** ** ** ** **
** ** ** ** **
सारिका अनंत चिकटे
जळगाव (जामोद)
जळगाव (जामोद)