♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


मी ज्ञान

ज्ञान, विज्ञानाच्या कक्षा रूंदावत गेल्या. माणसाने कर्तृत्वाच्या सगळया दिशा पादाक्रांत केल्या. सगळे शोध लागले. तरीही काहीतरी राहूनच गेल्याचे शल्य हातात उरले. काय आहे ते? सिकंदर, सम्राट अशोक आणि अलिकडचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांना जीवनात संघर्ष करून काय मिळाले? यांच्या विजयाला अपयशाची काळी किनार का?मोबाईल, इंटरनेट सारखी साधने हाती लागूनही संवाद का होत नाही? असे अनेक प्रश्‍दिवसेंदिवस निर्माण होत आहेत. दुनियेतल्या सगळया ज्ञानाची ओळख झाली परंतु "मी' तरीही कायमच उरला आहे. "मी' जाणल्याशिवाय माझं जिवन कसं असेल, याचे उत्तर मिळणार नाही.
                      - विजयकुमार राउत  Nagpur

मी' ज्ञान

"मी' आणि "माझे' या चक्रव्यहात आपण आजन्म गुंतलेले असतो. मी आणि माझया पलिकडे काही नाहीच, अशी आपली ठाम धारणा असते. मला कोण काय समजते, यावर आपल्या जीवनाची अख्खी इमारत उभी राहते. स्वतःची स्तुती करताना सुप्तावस्थेत असलेला "मी' अधूनमधून डोके वर काढतोच काढतो. आयुष्यभर खोटया समजूती , खोटया कल्पनेत वावरताना आपण सत्यापासून खूप दूर गेलेले असतो. जीवनभर ज्याला आपण ज्ञान संबोधतो मुळात ते जसे समजतो तसे नसतेच. आपण एकमेकांची स्तुती करतो, म्हणजे नेमके काय करतो? याचं उदाहरण म्हणजे इसापनितीतील जिराफला कावळा म्हणतो काय तुमची सुंदर मान आहे ! आणि मग कावळयाला खुश करण्यासाठी जिराफही त्याची भरभरून स्तुती करतो. म्हणतो, काय मस्त तुमचा आवाज आहे ! फार सुंदर गाता तुम्ही !' या दोघांचीही स्तुती खरी आहे का ? दोघांनाही बरं वाटावं त्यासाठी हा सगळा खटाटोप असतो.समाजाचा व्यवहारही असाच चालतो. खोटं खोंटं जगणं नशिबी येतं. शक्‍पिअरने म्हटल्याप्रमाणे आपण दुनियेच्या विशाल रंगमंचावरील केवळ एक पात्र ठरतो. समाजात वावरताना अनेक भूमीका पार पाडत जातो. बरं भूमीकेचं जाउ द्या, खर तर आपण जीवन जगतो का?दुभंगलेले व्यक्‍त्व घेउन आपण जगत असतो. क्षणात एक विचार, दुस-या क्षणात दुसरा विचार. कधी राग, कधी क्रोध या दोन टोकांवर आपण विभागलेले असतो.
सिर्द ऐर्शाचा त्याग करून सत्य शोधायला गेले आणि बुद्‌त्व प्राप्त झाल्यानंतरच त्यांचा सगळा शोध संपला. सत्य शोधण्यासाठी योग्यता कमवावी लागते. त्यासाठी बुद्‌देवत्व नाकारतात आणि आचरणाला महत्व देतात. देवत्वाठी आग्रह धरण्याऐवजी पंचशिल पाळण्याचा नियम सांगतात. या नियमातूनच मग खरा माणूस घडण्याची किमया घडत असते. "तथागत' शब्दाचा अर्थ होतो तथ्यागत...तथ्य, सत्य असेल तेच बोलणार. किंवा जसं आहे तसं स्वीकारणे. सत्याच्या पलिकडे काहीच नाही. सत्याच्या थोडयाफार अंशाला आपण सत्य समजून असतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग असल्यामुळे विज्ञान असं म्हणतं, विज्ञानात तमकं सांगीतले आहे. आपल्या विधानाला सत्याचा आधार मिळाला किंवा समोरच्याने ते ग्राहय मानावे, यासाठी सुरू होते आपली अहमहिका. सायंटीफिकली ते सिद्‌झालेले आहे, बरं का, असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अंतिम सत्य सांगीतल्याचा आपला समज असतो. देशात विज्ञान , तंत्रज्ञान अधिकाधिक उन्नत व्हावे, असे कुणाही सुज्ञ व्यक्‍वाटणार. परंतु समाजात जो विज्ञानाचा दावा करतो त्यानं तरी विज्ञानाची किती माहिती घेतली? स्वतःला कधी "अपडेट'केलं का? विज्ञान दररोज नवनवी क्षितीजे व्यापत आहे. जुने आणि नवे याचा संगम विज्ञानात पहायला मिळतो. म्हणून विज्ञानही अंतिम दावा कधीच करीत नसते. मात्र जे विज्ञानाविषयी अल्पज्ञानी असतात, ते मात्र विज्ञानाच्या नावावर भांडायला तयार होतात. वाद घालतात. स्वतःला पुरोगामी समजून स्वतःचीच हेटाळणी करतात. त्यालाच नकली पुरोगामित्व असे म्हणतात. विज्ञानात काम करणारे अनेक शास्त्रज्ञ अगदी विनम्रपणे आपल्या मर्यादा आणि सत्याचे अमर्यादीत्व ओळखून झटत आहेत. केवळ अल्पांशाने सत्य हाती लागले आहे, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असल्याचे मानतात. परंतु अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या नकली पुरोगामीत्ववादाने पछाडलेल्यांनी केलेल्या दाव्यात फक्‍"मी' असल्यामुळे त्यांच्या बोलण्यात सत्याचा अंशही सापडणे कठीण असते. जसे पुरोगामी तसेच प्रतिगामी. दोन्ही निव्वळ बुडबुडे. दोघेही दावे देत भांडत बसणार. लिळाचरित्रातील "चार आंधळया'सारखी यांची गती.
सत्य जाणणारा साक्रेटीस तर म्हणतो , "आय क्‍आय डोंट नो', "सत्यम शिव सुंदरम'...आपले जीवन सुंदर असायला हवे, असे वाटत असेल तर सत्याने जगायला शिकले पाहिजे. अलिकडे शब्दांचा वापर जास्त प्रमाणात होउ लागला आहे. संवाद साधण्यासाठी मोबाईल, इंटरनेट सारखे विविध उपकरणे आपल्या हातात आली आहेत. तरीही संवादातील " गॅप' अजूनही आपल्याला भरून काढता आली नाही. भाषेने नवनवीन शब्द शोधून काढले तरी सत्यापर्यंत ती नेउ शकली नाही. कधी नव्हे इतकी समाजात दरी निर्माण झालेली आहे. प्रत्येकाला काहीतरी सांगण्याची घाई झालेली आहे. जगण्यातला वेग वाढतो तसतसे आपण विनाशात्वाच्या दिशेने फार वेगाने सरकत जातो. कुणाला श्रीमंत होण्याची घाई झालेली आहे. कुणाला स्वतःची प्रतिमा तयार करण्याची घाई झालेली आहे. ही घाईच सर्व बाजूंनी व्यापून अक्राळविक्राळ समस्येचे रूप धारण करीत आहे.
"मी' किंवा माझी ओळख झाल्याशिवाय काहीच हाती लागणार नाही. सगळे दावे खोटे ठरतात. सगळया कल्पना ,सगळया व्याख्या फोल ठरतात. भगवान श्रीकृष्णाने स्वतःला "अहं ब्रम्हास्मी' म्हटलं. त्यामुळे समाजात घोळ निर्माण झाला. प्रत्येक जण स्वतःला "ग्रेट' समजायला लागला. दुस-याला तुच्छ लेखण्याशिवाय त्याचे "मीत्व'अपूर्ण राहू लागले. अडिच हजार वर्षापूर्वी मात्र बुद्‌"अत्त दीप भव' म्हणजे "तूच तुझा प्रकाश हो' म्हटलं तेव्हा त्याला भाषेतलं आणि एकूणच जगण्याचं सत्व कळलं. मित्रांनो, माणूस होण्याची वाट सरळ नाही. आणि सत्य जाणल्याशिवाय मनुष्य प्राण्यातील अपूर्णत्व कायमच राहणार. मानवी जिवनातील पूर्णत्व जाणून घेतल्याशिवाय संत साहित्यातील सत्व कळत नाही. कुणाला वगैरे नाव ठेवणं तर सगळयात छोटी गोष्ट. "मी' शिवाय जे कळायला लागते ते ज्ञान . ज्यात "मी' म्हणजे अहंभाव असतो, ते केवळ अज्ञानच !
"मी' पण ज्याचे पक्‍फळापरी
अलगद गळून पडले हो !
जीवन त्यांना कळले हो !
असे कविवर्य बा.भ.बोरकर म्हणतात ते उगाच नाही !