कविता...
स्वराज हवे तर...
विकास आणि समृद्धी हे,
दोन राजकारणी अपत्य...
बिन बुडाचे हे गाडगे आहे,
यात नाहीच कसले सत्य...
आधी पोटोबा साधणारे,
उरले नेता आणि भक्त...
लाळचाटू मतदारांनी देश,
काय होईल भ्रष्टाचार मुक्त...?
रक्षक झाले भक्षक आता,
कुणात दिसत नाही शिस्त...
भोग, विलासी, साधू बाबा,
आहेत कंचन, कायेत मस्त...
उजेडात होतात होम, हवन,
अंधारात चाले काळे कृत्य...
कथनी करनी जेवढी काळी,
तेवढाच होतो सत्कार नित्य..
स्वराज्य हवे असेल तर आता,
पेटवा देशभक्तिच्या मशाली...
अन्यथा नेता, बाबा, संधी साधू,
देशाची नक्की लावणार बोली...
मंदिर, मज्जिद जात, पात हेच,
आमच्या विनाशाचे कारण...
वेळ आली आहे करा हो आता,
या सांप्रदायीक विचारांचे दहन...
SUNIL PATOLE,
सुनील पाटोळे,
************"
महाराष्ट्राची आई
महाराष्टाची आई म्हणजे,
सिंधूताई सपकाळ...
डगमगली नाही किंचितही,
कोसळून दुःखाचं आभाळ...
पोटच पोरं आम्हांस भारी पडतयं,
ती हजारोंचा करतेयं सांभाळ...
करूणेच्या, ममतेच्या या देवीपुढे,
हरलायं कृर, निष्ठुर काळ...
प्रसव तिची गोठ्यात झाली,
नव्हता कुणाचा आधार...
स्वतःची नाळही स्वतःच कापली,
कधीच मानली नाही हार...
घरच्यांनी दिले तिला नाव चिंधि,
या चिंधिचा होता एकच ध्यास...
कुणाचीही मदत न घेता,
भुकेल्यांना भरवायचे सदा घास...
स्वतःलाच नव्हतं छत, परिवार,
सतत भोगले दुःख अपार...
अनगिनत निराधारांचे अश्रू पुसले,
थाटून अनाथांचा संसार...
बघा तरुणांनो या जिवंत देवीला,
त्यागा आत्महत्येचे विचार...
दिन दुबळ्यांच्या सेवेतच गवसतो,
जीवनाचा सच्चा सार...
माईला द्या हो हात मदतीचा,
अरे पाषाणात देव शोधू नका...
द्या घासातला घास भुकेल्यांना,
अन्नाची नासधूस करू नका...
सुनील पाटोळे, नागपुर
****************************************************
खरा दीपोत्सव....
बनावटी दीपोत्सव साजरा करून,
जीवनात प्रकाश होणार नाही...
आपलेच धर्म कर्म देतात जगाला,
आपल्या पुरुषार्थाची ग्वाही...
कागदी लक्ष्मीची पूजा करायची,
आणि जिवंत लक्ष्मीचा अपमान...
नको अशी ही भेसळ संस्कृती ज्यात,
आता केवळ उरले आहे अज्ञान...
मूळ संस्कृती गेलो विसरून आम्ही,
केवळ उरला धांगड धिंगा...
मोठ मोठ्या पदव्यांच्या आड आहेत,
निव्वळ अज्ञानाच्या रांगा...
दैवी-शक्ति, अंगात-येणे, राख-अंगारा,
यावर आजूनही अतूट विश्वास...
जिवंताला रोटी, कपडा, मकान नाही,
दगडाचा होतो अभिषेक बिंधास...
खरा दिपोत्सव होईल तेव्हाच साजरा,
जेव्हा होईल मानसिक विकास...
घरोघरी लागेल ध्यान दीप सदाचाराचे,
तेव्हाच लाभेल परमशांती मनास...
सत्य, अहिंसेचे मनी दीप उजळावे,
तोची खरा दिवाळी दसरा...
राग, लोभ, द्वेष, मद,मत्सर यांचा,
व्हावा दूर मनातून कचरा...
स्वराज हवे तर...
विकास आणि समृद्धी हे,
दोन राजकारणी अपत्य...
बिन बुडाचे हे गाडगे आहे,
यात नाहीच कसले सत्य...
आधी पोटोबा साधणारे,
उरले नेता आणि भक्त...
लाळचाटू मतदारांनी देश,
काय होईल भ्रष्टाचार मुक्त...?
रक्षक झाले भक्षक आता,
कुणात दिसत नाही शिस्त...
भोग, विलासी, साधू बाबा,
आहेत कंचन, कायेत मस्त...
उजेडात होतात होम, हवन,
अंधारात चाले काळे कृत्य...
कथनी करनी जेवढी काळी,
तेवढाच होतो सत्कार नित्य..
स्वराज्य हवे असेल तर आता,
पेटवा देशभक्तिच्या मशाली...
अन्यथा नेता, बाबा, संधी साधू,
देशाची नक्की लावणार बोली...
मंदिर, मज्जिद जात, पात हेच,
आमच्या विनाशाचे कारण...
वेळ आली आहे करा हो आता,
या सांप्रदायीक विचारांचे दहन...
SUNIL PATOLE,
सुनील पाटोळे,
************"
महाराष्ट्राची आई
महाराष्टाची आई म्हणजे,
सिंधूताई सपकाळ...
डगमगली नाही किंचितही,
कोसळून दुःखाचं आभाळ...
पोटच पोरं आम्हांस भारी पडतयं,
ती हजारोंचा करतेयं सांभाळ...
करूणेच्या, ममतेच्या या देवीपुढे,
हरलायं कृर, निष्ठुर काळ...
प्रसव तिची गोठ्यात झाली,
नव्हता कुणाचा आधार...
स्वतःची नाळही स्वतःच कापली,
कधीच मानली नाही हार...
घरच्यांनी दिले तिला नाव चिंधि,
या चिंधिचा होता एकच ध्यास...
कुणाचीही मदत न घेता,
भुकेल्यांना भरवायचे सदा घास...
स्वतःलाच नव्हतं छत, परिवार,
सतत भोगले दुःख अपार...
अनगिनत निराधारांचे अश्रू पुसले,
थाटून अनाथांचा संसार...
बघा तरुणांनो या जिवंत देवीला,
त्यागा आत्महत्येचे विचार...
दिन दुबळ्यांच्या सेवेतच गवसतो,
जीवनाचा सच्चा सार...
माईला द्या हो हात मदतीचा,
अरे पाषाणात देव शोधू नका...
द्या घासातला घास भुकेल्यांना,
अन्नाची नासधूस करू नका...
सुनील पाटोळे, नागपुर
****************************************************
खरा दीपोत्सव....
बनावटी दीपोत्सव साजरा करून,
जीवनात प्रकाश होणार नाही...
आपलेच धर्म कर्म देतात जगाला,
आपल्या पुरुषार्थाची ग्वाही...
कागदी लक्ष्मीची पूजा करायची,
आणि जिवंत लक्ष्मीचा अपमान...
नको अशी ही भेसळ संस्कृती ज्यात,
आता केवळ उरले आहे अज्ञान...
मूळ संस्कृती गेलो विसरून आम्ही,
केवळ उरला धांगड धिंगा...
मोठ मोठ्या पदव्यांच्या आड आहेत,
निव्वळ अज्ञानाच्या रांगा...
दैवी-शक्ति, अंगात-येणे, राख-अंगारा,
यावर आजूनही अतूट विश्वास...
जिवंताला रोटी, कपडा, मकान नाही,
दगडाचा होतो अभिषेक बिंधास...
खरा दिपोत्सव होईल तेव्हाच साजरा,
जेव्हा होईल मानसिक विकास...
घरोघरी लागेल ध्यान दीप सदाचाराचे,
तेव्हाच लाभेल परमशांती मनास...
सत्य, अहिंसेचे मनी दीप उजळावे,
तोची खरा दिवाळी दसरा...
राग, लोभ, द्वेष, मद,मत्सर यांचा,
व्हावा दूर मनातून कचरा...