♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


श्रीपाद राऊतवाड

''शेतकरी  कुटुंबाची , दुष्काळी दिवाळी"


 दिवाळी आली, सगळीकडे प्रकाशमय वातावरण, पणतीतल्या दिव्यांच्या रोषणाईंने जिवनातल्या काळोख्याला अगदी प्रकाश्याच्या जोखड्यात नेणारी दिवाळी,फटाक्याच्या अतीषबाजीने आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे...!

दिवाळीने घरांची रंगरंगोटी, नवे कपडे, नवी दुनिया, नवि मैफिल, नवि आशा, नवि वर्ष, सर्व कुठूंब एकत्रीत येवून नव्या उत्साहाने साजरी करणारी दिवाळी,खरंच अगदी उत्साह, लहणग्या पासून ते वृद्धांपर्यंत दिवाळी अगदी उल्हासाने साजरी करतो ना आपण,या आनंदात स्वात:ला विसरून जातो, असेच माझ्या स्मरणातील, समाजात असंख्य कुटुंब ह्या समस्येला सामना करणाऱ्या कुटुंबांची व अगदी माझ्या अनुभवातील दिवाळी, म्हणजे गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला सामना करणार्या माझ्या शेतकरी कुठूंबाची दिवाळी, कशी असेल आपण विचार देखील केल नसेल.

बाहेरगावी शिक्षण घेत आसल्याने घरी परतण्याची वेळ खुप दिवसानी आली, यंदाची दिवाळी सर्व कुठूंबाच्या एकत्रीत होणार ही अश्या आमच्या मणोमण होती, मात्र ग्रामीण भागतील शेतकरी कुठूंबातील दिवाळी ही वेगळीच आहे, एक सामान्य शेतकरी कुठूंब आमच्या शेजारी असत, लाकडीबांधावर उभारलेली ती दोन खोल्याच घर दारात मैस, घरचा पुढारी शेतमजुरी करून कुटुंबाच पालनपोषण करणारा,दोन लहान मुल, अणी पत्नी आपल्या कष्टाने घरच्या धनीला मदत करत आसते, मजूरी करून घर चालवणार कुठूंब, मी अनुभवतोय त्यांच्या वेतना, मी अनुभवतोय त्यांच्या संवेदना, आज दिवाळी, वयाने लहान असलेला छोटा मुलगा वडीलाकडे धाव घेत विचारतो,

मुलगा - बा, ओय बा, आज म्हणे दिवाळी,पोरकडं कौतुकेन पाहणारा बाप मुलाच्या प्रश्नाच उत्तर देतो,

बाप- व्हय रे पोरा, आजच की.

माय- (मजूरीला जाण्यास तयार होत, आपल्या टोपलीत भाकर सुडक्यात गुंडाळून ठेवत) पोर, आज आमी लवकर येवू शेतन्, तोवर तू बाजूच्या तुक्या सोबत खेळत बस.

बाप-( आपल्या फाटक्या बनियानच्या खिष्यातून एक रूपयाच नान त्याच्या हातात देत) बाळा, हे घे पैसा , अण् काय तर घे फटाके बिटाके.

मुलगा - (अगदी आई वडीलांची बोलन एकून, बापानी दिलेला रूपया हातात घेत), बा, आज दिवाळी हाय ना, मग मला नवे कापड.?

मुलाच्या ह्या प्रश्नांनी दोघे पति पत्नी ऐकमेकांकडे पाहत राहीले, मुलाच्या प्रश्नाच नेमक उत्तर काय द्याव ही कल्पानाच सुचत नव्हती, तेवढ्यात आई त्या बाळाला जवळ घेत,

माय- बाळा, झेंड्याला आपण दोन कापड घेतल व्हत ना रे, ते एक नवीच हाय, सांच्याला आम्ही आल्यावर घाल.

मुलगा - माये, ते सालेच हाय ऐ..! मला नवि कापड, फटाके पाहीजे, ते तुक्याच्या बा, ने बघ त्याला नवे कापड आनलाय, फाटाके आनलाय, बंदूक आनलेय..

वडील मुलाची समजूत काढत पुढे,

बाप- ते सालेच चांगला हाय तेच घाल,आपण उद्या घेवू नवि कापड.

मुलगा - बा.., ते शालेच कापड पण तु घेतला नाय,ते पांडरी कापड घातलेल्या मामा ने दिल.

मजूरीला निघालेला बाप त्या मुलाला मिठीत घेत, ढसा ढसा अश्रु व्हावू लागला, दिवाळी ही सण आमच्या या सुरळीत चालण्यार्या संसारात का आली आसेल, दोन वेळची भाकर आम्ही दिवसभराच्या काबाडकष्टाने कमवतो, कसेबसे संसाराचा गाडा ढकलत आजवर आम्ही जिवन जगत आलोत, आता काय कराव, काही सुचत नव्हत, पत्नी परिस्थितीला अनूभवत बांधलेली न्यारीच टोपल डोक्यावर घेवून

माय-चला धनी, उशीर होतोय.

बाप- बाळा, तु तुक्या सोबत खेळ, आम्ही जरा शेतला जाऊन येतोत.

मुलाला कसेबसे समजावून जोडी शेताला निघाली,गाव सर्व नव्या उत्साहाने दिवाळी साजरी करत आसतांना हा कुठूंब मात्र दुखाच डोंगर डोक्यावर घेवून चालत होती, आजच्या मजूरीने घरी काहीतरी गोड धोड बनवाव या आशेने मजूरीला निघाले.

सायंकाळ झाली, गावभर अकाश दिवे उभारलेली दृष्य प्रकाशमय वातावरण पाहून तो मुलगा बहरून गेला, गावातील दिव्यांची रोषणाई, फटाक्याची अतिषबाजीचे दृष्य केवळ पाहूनच बहरून गेलेला बाळ आई-वडिलांच्या घरी परतण्याची वाट पाहत बसला,दिवस मावळला, ती डोहावर टोपली घेवून दुरून येत आसलेली आई दिसताच, माय...! या हाकेने पळत जाऊन मुलानी मिठी मारली, नवी कपडे परिधान करून, सर्वांसारखे फटाके उढवेल ही एकच उल्हास दिसत होत, घरी परतल्यावर मुलांनी पहिला प्रश्न आई ला केला,

मुलगा -माये, आपणबी दिवे लावूत की, दारात.

माय - लावूत पोरा, ( म्हणत डोक्यावरून हात फिरवत,मुलाला नवि कापड काडून दिली)

शाळेच्या त्या गणवेश मुलगा उत्साहाने परिधान करून आनंदाने उड्या मारतांना आई वडीलांच्या डोळ्यात मात्र आनंदअश्रु बहरून निघाले,तेव्हढ्यात पत्नि ने पतिला

माय- धनी, दिव्याला आण् स्वयंपाकाला गोडतेल आण् किरणा घेवून या.. (पति ला सांगून स्वयपाकाच्या कामात व्यस्त झाली )

बाप - सखे, मजूराचे पैसे बाबुरावा पाटलाकडे जाऊन आणतो, मग दुकानातून सामान आनतो.( म्हणत बाप पाटलाकडे दिवसभर केलेल्या मजूरीचे पैसे आनायला निघाला), पाटलाकडे पोहचताच हा बाप त्यांच्या पुढे नतमस्तक होउन,

बाप - मालीक, सण हाय, मजुरी दिल्या तर घरी कायतर गोड धोड कराव म्हणतेय सखे.

पाटलांने विचार करत,आपल्या शर्टाच्या डाव्या खिश्यातून शंभरची नोट काडून बापाच्या हाती दिले, बाप अगदी उत्साहाने दुकानातून सामान आनला, अंधार पसरलेल्या घरात दिव्यानें रोषणाई पसरली, मुलगा दारात दिव्यांच्या रोषणाईत अनंदाने बापाने आनलेल्या ५ रूपयांच्या सुरसुर्या हाती घेवून फिरवत होता, घरात पुरण शिजत होत, कितीतरी दिवसांनी घरी गोड खायला बनत होत, बापानी पाचटांची दिवा तयार करून जनावरांना "दिन, दिन दिवाळी, गाई मैसी ओवाळी'' , म्हणत घरातल्या जनावरांची पुजा केली, घरात आसलेल्या लक्ष्मीच्या पोटोची पुजा करुन, गोड खाद्य अगदी आनंदाने खाऊन घेतले. अजूबाजूला होत आसलेल्या दिव्यांची रोषणाई व फटाक्यांचा अतिषबाजी फक्त पाहतच सण साजरी करणारी ही कुठूंब, पाहून खरच एक प्रकारचे सण आम्ही साजरी करतो, तो उत्साह माझ्या नजरेतून नाहीसा झाला.

एकीकडे परिस्थिती ला मुखत अश्या परिस्थितीला समोर जात, येणाऱ्या संकटाना मात करीत, कसे बसे कुठूंबाचा गाडा ढकलत, यंदाची दिवाळी मात्र अगदी त्यांच्या मुला बाळांना आनंदी ठेवण्यासाठी होइल तेव्हढ प्रयत्न करीत साजरी करीत आहेत, मित्रांनो आपण भल्या उत्साहात दिवाळी साजरी करतो,फटाक्यांची अतिषबाजीच चारशे रूपयांचे फटाके , चार मिणीटात धुर करून, चारशे लोकांच जिव धोक्यात घालतो, परंतु असे अनेक कुठूंब आहेत, आज एक एक रूपयांशी
झुंज घेत आहेत, दिवाळी सणासाठी दिवसभर राबून सायंकाळी दिवाळी साजरी करणाऱ्या या कुठूंबांना आपल्या मदतीची गरज आहे, आपली सामाजीक बांधीलकी जपवत, यंदाची दिवाळी आपल्या पुढाकारांने काही कुठूंब आनंदी करूया...




लेखक :- श्रीपाद नागनाथ राऊतवाड
संपर्क :- ८००७८७००२६
मदनूर  जि. कामारेड्डी