माहेर
मला ही वाटतं सुट्ट्यांमध्ये
जावं कुठे तरी
आई सोबत माहेर गेलं,
येवू का तुमच्या घरी ?
भाऊ झाला परका ,
आमची वहिणी मोठी भारी
चार दिवसांची सुद्धा
नाही उजागरी,
भाऊबीजेला चंद्राचीच
करते ओवाळणी
दर दिवाळीला आता
डोळ्यात येते पाणी.
पोर लावून बसतात आशा
पण मामाला समजत नाही
तुम्हीच सांगा घरात आमच्या
कमी असेन का काही?
साडी नका घेऊ मला
घेऊ नका काही,
दादा म्हणणार नाही तुम्हाला ,
मला म्हणू नका ताई.
नात्यांनी बांधलेले फार
कच्चे असतात धागे ,
आठवणींचीच शिदोरी
घेवून येईन मागे.
नातं नसेना आपले काही
ओळखही नाही जुनी
पण चार दिवसांसाठी सांगा
माहेर देता का कुणी??
- वर्षा खोब्रागडे
**********************************************
तुझे सागराचे डोळे
किती नितळ नि भोळे,
मन किती आवरले
वेड लागे थोडे थोडे.
तुझे सागराचे डोळे
याची आगळीच रित
बघ भाळले हे मन
अशी अनामीक प्रित.
तुझे सागराचे डोळे
बोल लावती हजार
जरी हिरवा मनाने
तरी आवडसी फार.
तुझे सागराचे डोळे
किती किती खोल डोह
वार करती हजार
तरी आवरेना मोह.
- वर्षा खोब्रागडे
मला ही वाटतं सुट्ट्यांमध्ये
जावं कुठे तरी
आई सोबत माहेर गेलं,
येवू का तुमच्या घरी ?
भाऊ झाला परका ,
आमची वहिणी मोठी भारी
चार दिवसांची सुद्धा
नाही उजागरी,
भाऊबीजेला चंद्राचीच
करते ओवाळणी
दर दिवाळीला आता
डोळ्यात येते पाणी.
पोर लावून बसतात आशा
पण मामाला समजत नाही
तुम्हीच सांगा घरात आमच्या
कमी असेन का काही?
साडी नका घेऊ मला
घेऊ नका काही,
दादा म्हणणार नाही तुम्हाला ,
मला म्हणू नका ताई.
नात्यांनी बांधलेले फार
कच्चे असतात धागे ,
आठवणींचीच शिदोरी
घेवून येईन मागे.
नातं नसेना आपले काही
ओळखही नाही जुनी
पण चार दिवसांसाठी सांगा
माहेर देता का कुणी??
- वर्षा खोब्रागडे
**********************************************
तुझे सागराचे डोळे
किती नितळ नि भोळे,
मन किती आवरले
वेड लागे थोडे थोडे.
तुझे सागराचे डोळे
याची आगळीच रित
बघ भाळले हे मन
अशी अनामीक प्रित.
तुझे सागराचे डोळे
बोल लावती हजार
जरी हिरवा मनाने
तरी आवडसी फार.
तुझे सागराचे डोळे
किती किती खोल डोह
वार करती हजार
तरी आवरेना मोह.
- वर्षा खोब्रागडे