बल्लारपूर येथे घडलेला प्रसंग आयुष्यात
नेहमीच स्मरत राहील असाच होता. तो दिवस. तिथला प्रसंग. तो थरार सुदैवानं मी
बचावाल्यामुळ आपणाशी अनुभव कथन करीत आहे.
– बंडू धोतरे
शब्दांकन – देवनाथ गंडाटे
उन्हाळ्याची सुरवात झाली. सकाळपासूनच उन्ह तापू लागत. त्यामुळे
एप्रिल-मे महिन्यात दरवषी इको-प्रोतर्फे जंगल ट्राकिंग राबविण्यात येते.
त्यानुसार जंगलात जाण्यासाठी सर्व कार्यकर्ते सोमवारी दि २१ एप्रिल रोजी
भल्या पहाटे पठाणपुरा मार्गावरील कार्यालयासमोर जमली होती. त्यातच रविवारी
सिंदेवाही तालुक्यातील नवरगांव लगतच्या आलेसूर गावातील विहीरीत पडलेल्या
बिबटचे रेस्क्यु आॅपरेशन दरम्यान मृत्यू झाल्याने त्या घटनास्थळास भेट देऊन
माहीती जाणून घेण्य़ाकरिता आपण तिकडे जावे आणि कार्यकर्त्यांना जंगलात
पाठवावेए असा बेत सुरु होता.
इतक्यात बल्लारपूर येथील वन परिक्षेत्र अधिकारी मोरे यांचा फोन आला.
त्यांनी सांगितले किए बल्लारपूरमधील संतोषी माता वॉर्डातील सुरेश कैथवास
यांच्या घरात सोमवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास प्रवेश केला आहे आपण यावे.
मग ठरलेले बेत रद्द केले. लागलीच इको-प्रो चे वन्यजीवप्रमुख नितीन बुरडकर
यांची चारचाकी मागविली. मी आणि माझे कार्यकर्ते १५.२० मिनिटात तिथे पोहचलो.
घरातील जनावरांना बघण्य़ासाठी गेलेल्या रघू कैथवास यांना अंधारात बिबट्याला
कुत्रा समजून तो शिरल्याचे समजून दगड भिरकावला. त्यामुळे बिबट पळाला. हे
दिसताच ते काही वेळ सुन्न झाले. आरडाओरड होताच बिबट्याने अर्धवट बांधकाम
असलेल्या बाजूच्या घरात दबा धरला. नेमक्या याचवेळेस समीक्षा अमरदीप ठेंगरे
ही महिला उठली आणि नकळत दार उघडत बाहेर पडली. समीक्षा बाहेर पडताच दबा धरून
बसलेल्या बिबट्याने समीक्षा यांच्यावर हल्ला चढवून जखमी केलेए त्यामुळे
घाबरलेल्या समीक्षा यांनी आरडाओरड करताच बिबट्याने पुन्हा सुरेंद्र पाल
यांच्या गुरांच्या खाद्यगृहात प्रवेश केला.बिबट शिरल्याची चर्चा परिसरात
पसरताच घटनास्थळाकडे शेकडो नागरिकांनी धाव घेऊन गर्दी केली होती. आम्ही
पोहचलो तेव्हा या गर्दीला पांगविण्य़ासाठी पोलिसांचा ताफा तिथे पोहचला होता.
घटनास्थळी वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी मधुकर मोरे, सहायक वनसरंक्षरक
आर एस धोतरे, मोरे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले.मी आणी माझी टिम
घटनास्थळी पोहचताच नेहमीप्रमाणे बिबट्याला जेरबंद करण्य़ाच्या दृष्टीने बिबट
असलेल्या परिसराची पाहणी केली. त्या ठिकाणी बिबट लपून बसला होता ते घर
स्लाबच्या घरास लागून होते. त्याच स्लबच्या इमारतीच्या एका भिंतीचा वापर
करून बांधलेले कवेलू असलेला भलामोठा गोठा होता. तिथे जनावरे बांधलेली होती,
याच गोठयात दरवाजा नसलेल्या एक खोलीत बिबट लपून बसला होता. त्या खोलीत
गुरांचे खाद्यगृह असल्याने कुटारए कडबा भरलेला होताए या गोठ्याच्या एका
बाजूचे 25.30 फुटाची खुली भिंत होती. स्लाबच्या घरातुनच इकडे ये.जा
करण्य़ाकरिता गल्ली होती ती दोन्ही बाजुने रस्त्याकडे येणारी होती. हीच खुली
भिंत सुरक्षेच्या दृष्टीने भिंतीच्या खुल्या भागात जाळी लावणे आवश्यक
होते. अवती-भवती जमा झालेल्या नागरीकांच्या कल्लोळामुळे तो चांगलाच गांगरून
दडुन बसला होता. नाहीतर, या बाजुने तो पळत सुटला असता. कारण, हि बाजु
पुर्णपणे उघडीच होती. परंतुए रॅपीड रिस्पाॅन्स् युनीटचे वाहन यायला अजुन
वेळ होताए त्यात आवश्यक सर्व साहित्य होते. अवती.भवतीचे नागरीकांचा होणारा
जोरदार कल्लोळ मुळे बिबट बिथरला तर कठीण होणार आणी याच खुल्या भागातुन पळ
काढणार अशी भिती अधिक होती. त्यामुळे आजु.बाजुच्या नागरीकांशी चर्चा करताच
पोलीसांनी शेजारीच राहणा-या डुकर पकडणा. या टोळीकडून जाळी मिळवून दिली. या
जाळीमुळे आवश्यक तेवढा भाग व्यापनाचा प्रयत्न सुरू झालेला होता. सोबतच सर्व
इको.प्रो वन्यजीव रेस्क्यु दलचे सहकारीए वन कर्मचारीए पोलिस दलाचे अधिकारी
वर्ग सज्ज झाला होता सर्वाचे समन्वय साधून बिबट जेरबंदीचे नेतृत्व
माझ्याकडे घेतले. बिबट म्हटलं कि साण्य़ांनाच बघण्य़ाची उत्सुकता होती. पोलिस
असोत कि वन कर्मचारी सारेच एक क्षण डोळ्यात टिपण्य़ासाठी आतुर होते. काही
अति उत्साही तरुण जल्लोष करीत होते. हा आमचा नेहमीचाच अनुभव. अलिकडे
सर्वाकडे स्मार्ट फोन आल्याने सर्वच मंडळी एकदा बिबटयाचे झलक मोबाईल
कॅमेण्य़ात घेण्य़ाकरीता प्रयत्नशील दिसत होते. तेवढयात रॅपीडचे वाहन आल्याने
जाळी मागविण्य़ात आली आणी त्या जाळीने गोठयाची खुली असलेली पुर्ण बाजु
झाकण्य़ात आली. आॅपरेशन मधील पहिले मोठे काम पुर्ण झाले. यामुळे बिबट पळुन
जाऊ शकणार नव्हता.जाळीच्या आत एका खोलीत बिबट तर त्यास गोठयाच्या बाहेरच्या
भागात जनावरे त्यात छोटी गाईची बछडे व गाई बकरी दावणीला बांधुन होत्या. हे
पाहुुन जनावरांचे मालक चिंतीत होते. आमच्या टिममधील सदस्यांनी
गाई-बछडयांची चिंता व्यक्त केली. बिबट रेस्क्यु करण्य़ाचा धावपळीत जनावराचा
जीव धोक्यात होता. टिमच्या कार्यकत्र्याना विश्वासात घेऊन काही सुचना देऊन
मी जाळी अलगत वर करून आत गेलो. या क्षणाला माझा श्वास रोकला गेला होता. या
क्षणाला माझा जीव मुठीत होता. आत मी-गाईचे बछडे आणी बिबट अशी परिस्थीती
होती. जनावरांकरीता गोठयात खुटयाला बाधलेल्या गाठी सहज सुटत नव्हत्या.
गोठयाच्या मालकांची नेहमीची सवय असल्याने त्यास ते सहज जमत असेल. परंतु,
परिस्थीतीचा विचार करता ते लवकर सुटत नव्हते यामुळे टिमच्या सहकार्याच्या
मनात खालवर होत असल्याचे जाणवत होते. मग एक.एक करून बकरीए गाय.वासरू यांना
बाहेर काढले. बिबटयाच्या रूमच्या अगदी जवळ असलेले एक गाय व वासरू सोडणे
खुपच कठीण असल्याने तेवढे ठेवून जनावरे रेस्क्यु करण्य़ाचे आॅपरेशन मध्येच
थांबविले.खुल्या असलेल्या बाजुची जाळी लावल्यानंतर स्लाब असलेल्या घरावर
जाऊन पुढचे नियोजन करण्य़ास सुरूवात केली. तोपर्यत पशुवैदयकीय डाॅक्टर आलेले
होते. त्यांच्या मार्गदर्शनात वनविभागाचे शुटर बलकी बिबटयास दयावयाचे
गुगींचे इंजेक्शन तयार करण्य़ात मग्न होते. गुगींचे इंजेक्शन तयार करून शुटर
सज्ज झाल्यानंतरए मी आणी बलकी कवेलुच्या घरावर चढलो. लागुनच असलेल्या दोन
मजली इमारतीवर प्रचंड गर्दी नागरीकांनी केलेले होती. त्या इमारती वरील
गर्दी आॅपरेशन दरम्यान प्रचंड गोंधळ घालत होती तसेच सुरक्षेच्या दृष्टीने
सुध्दा सदर गर्दी योग्य नसल्याने पोलीस अधिकाण्य़ांना सांगुन स्लाब खाली
करवून घेतला.गुगींचे इजेक्शन दयावयाच्या आॅपरेशन सुरू करण्य़ापुर्वी आधीच
काढण्य़ात आलेल्या घरावरील कवेलु मधुन बिबटचा अदांज घेण्य़ाचा प्रयत्न केला.
घरावरील आमच्या हालचालीमुळे आत बिबटच्या येर-जा-या सुरू झालेल्या होता. तो
पळुन जाण्य़ाचे पुर्ण प्रयत्न करेल असे त्याच्या हालचालीवरून लक्षात
येताच,परत एकदा जाळी लावलेल्या बाजुने जाऊन सर्व कार्यक्त्याना व
वनकर्मचारीना सुचना दिल्या कीए गुगींचे इजेक्शनचे प्रयत्न सुरू असतांना
बिबटयास असुरक्षीत वाटल्यास त्यास माहीती असलेला खुला रस्ता ज्या दिशेकडुन
बिबटयाने गोठयात प्रवेश केला, तो रस्ता पळुन जाण्य़ास उपयुक्त असले असे
समजुन बिबट या जाळी लावलेल्या दिशेकडे येईल. तेव्हा आपण सर्व दक्ष राहावे
अशा सुचना दिल्या. तसेच या क्षणाला थोपवून धरण्य़ाकरिता आवश्यक असलेले हातात
फसवून स्वताला सुरक्षीत करण्य़ास वापरण्य़ात येणारे फायबरचे गाॅर्ड-बोर्ड व
हेल्मेट बोलावून घेतले. रॅपीड मध्ये असलेले फायबरचे गार्ड व हेल्मेट
चार.चार आणण्य़ास सांगीतले. जाळी पकडुन असलेल्यांना दे देता येईल जेणेकरून
बिबट आल्यास हुसकवण्य़ाकरीता मदत होईल व मलाही गोठयावर गुंगीचे औषध देतांना
सुरक्षा होईल. परंतुए रॅपीडच्या वाहनात त्याचे दोनच सेट असल्याने जाळी
पकडुन असलेले टिमच्या सदस्यांना त्याची जास्त गरज असल्याने त्यांना देऊन
बिबट आल्यास त्यास परत हुसकावून लावण्य़ाकरिता कसा वापर करायचा याची माहीती
दिली. आता या दिशेला दिसणारा धोका परतवून लावण्य़ाची सोय झाल्याने पुर्ण
लक्ष बिबटयास गुगींचे इंजेक्शन देण्य़ाच्या प्रयत्नात घातले.
कवेलुवर जाॅईन्ट पाहुन जपुन पाय ठेवीत एक.एक कवेलु काढुन बिबटयाचा अंदाज
घेत होतो. जसजसा त्यांचा अंदाज घेण्य़ाकरिता कवेलु काढयचो तसतसा तो सुध्दा
आपले स्थान बदलायचा. आतमध्ये काही भागात अधांर असल्याने बिबट दिसत नव्हता
म्हणुन बॅटरी मागवीली. बॅटरीचा प्रकाश आतमध्ये पडताच तो बिथरला व
ठरल्याप्रमाणेच तो जाळी लावलेल्या भागाकडे धावुन गेला. टातील गाई व बछडयाने
जोरदार आवाज केला. यावरून जाळया पकडण्य़ा-या टिमला सुध्दा कळले की बिबट या
दिशेन येत आहे. परंतुए संपुर्ण जाळी लावुन असल्याने जाळी साभांळणारे
कार्यकर्ते कर्मचारी यांनी जोरदार आवाज करित बिबटयास परतवुन
लावले.जनावरांना संशयित बाहेर काढल्यानंतर बिबटयाला गंुगीचे इंजेक्शन
दयायचे होते. त्यासाठी पशुवैदयकीय अधिकाण्य़ांची चमू तिथं आली. त्यांनी
प्रमाणबध्द डाॅट बनवून शाॅर्प शुटरला दिले. हे काम आटोपल्यानंतर मीए
शाॅर्पशुटर आणि एक वनकर्मचारी असे तिघेजण गोटयाच्या छतावर चढलो. कैलारू छत
असल्याने तिथुन इंजेक्शन देणे सोयीचे होते. गोटयात दबा धरून बसलेल्या
बिबटयाचा ठिकाण लक्षात घेण्य़ासाठी एक कवेलू उघडून बघितला तेव्हा कवेलूच्या
आवाजाने बिबट सतर्क झाला आणि जाळी लावलेल्या दिशेने पळत सुटला तेव्हा
दुसरीकडे जाळी पकडुन असलेले कार्यकर्ते व वनकर्मचारी जाळी पकडुन तयारच होते
त्यांनी त्याला परतवून लावले.जसा बिबटयाने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न
केला.तिथे रेस्क्यु टिमने थोपवून धरले.पण पळून जाणे शक्य नसल्याने बिबट
गोटयात माघारी फिरला.आम्ही छतावर बसलेले तिघेजण शार्प शुट करण्यासाठी तयार
होतो.त्यातच तो असलेले ठिकाण नेम धरण्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी मी
आधीच उघडून असलेल्या कवेलू मधुन बघितला. त्याचे निश्चित लोकेशन मिळत
नव्हते. मी शुटर बल्की यांना आतील माहीती देत होतो. छताची सात-आठ फुट उंची
असलेल्या एका कवेलु मधुन पाहण्याचा प्रयत्न केला असता बिबटयान उडी मारून
हल्ला चढविण्याचा असफल प्रयत्न केला होता. पंरतु, ते अंतर अगदी जवळ
असल्याने आणी नेम साधण्याकरिता योग्य जागा नसल्याने ती जागा आम्ही सोडली.
जमीनीपासुन नऊ-दहा फुट अंतरावरील एक कवेलु काढुन तिथुन आत डोके घालुन परत
त्याची हालचाल पाहण्याचे प्रयत्न चालविले तर तो आरामशीर नेहमीची रूबाबदार
बैठकीत बसलेला दिसला, आणि मी शार्पशुटरला इशारा केला.त्यास कुठुन डाॅट
मारणे सहज होईल याची माहीती दिली. परंतु, पुढील पाच ते सहा सेंकदात जे घडले
अनंपेक्षीत होते.मी कवेलु उघडून आत डोकावून बघितले आणि बाहेर डोकं वरी
करीत शुटरला माहीती देत नाहीतोच आत दडून बसलेल्या बिबटयाने सरळ वरच्या
दिशेने आमच्याकडे कवेलू उडवीत उडी घेतली आणि आमची भंबेरी उडालीण्य़ा क्षणला
त्याचे फक्त तोंडच जवळ आल्याचे पाहुन त्याचा आधीच्या प्रमाणे असफल प्रयत्न
असावा असे वाटले. पण क्षणातच त्याचा मागच्या पायास कशाचा तरी आधार
भेटल्याचे जाणवले. बिबट अगदी माझया समोरूनच फेस टु फेस बाहेर निघाल्याने
त्याच्या नि माझया डोळयात फक्त फुट-दिड फुटाचे अंतर होते. तेव्हा त्याच्या
डोळयाशिवाय काही दिसले नाही. त्याच्यातील भिती व आक्रमकता पाहुन मला नाशीक,
मेरठ मधे शहरात बिबट आल्यानंतर झालेली निर्माण झालेली परिस्थीती डोळयासमोर
उभी होती. अवती-भवती सर्वच इमारतीवर खच-खचुन भरलेला जवळपास 4-5 हजार
नागरीकांचा जमाव. सर्व गल्ली-बोळीत जमा झालेले बल्लारपूरकर. बिबट इमारतीवर
खुल्यात आल्यावर पुढची टप्पात काय होईल ते होऊ नये हे बिबटयाच्या डोळयावर
नजर खिळुन असतांनाच त्यास थोपवून आत लोटता येईल याकरिता हाताचे प्रयत्न
सुरू होते. परंतु, काही करायच्या-कळायाच्या आतच त्याच्या उर्वरीत शरीराचा
भाग गतीनेबाहेर येत कवेलु हवेत उडीत दोघाच्या हाताच्या मधात आल्याने तो
प्रयत्न फसला. बिबटयास आत थोपविण्याचा प्रयत्न करू लागताच तो थेट घरावर
पुर्ण बाहेर आला. माझे सोबतचे सावध पवित्रा घेत बाजुले झालेत.पण बिबट आता
मोठे संकट उभे करणार असे चित्र स्पष्ट दिसू लागल्याने त्यास कसे रोखता येईल
हे विचार करीत त्याचेकडे नजर ठेवून होतो. त्याने माझयाकडील दिशा बदलवीली
तर त्यास कसे रोखता येईल जेणेकरून पुढील संकट टाळता येईल याचे विचार
डोक्यात घोळत असतांना थांबुन बिबटयाकडे लक्ष देत सावध असतांनाच त्याने
प्रतीहल्ला चढविला.बिबटयाने पुर्ण माझयाकडे धावून आला. बिबटयाने आता माझावर
हल्ला चढविल्याने तो परतवून लावण्याकरिता मी समोरच्या स्लाबच्या घरावर उडी
घेतलीए त्याचवेळेस त्यानेही माझ्यावर उडी घेऊन पंजाने हल्ला चढवती तोंडाने
कमरेखाली हिपवर चावा जोरदार चावा घेतला.मी घेतलेली उडी पुर्ण होण्याच्या
आत त्याने हल्ला चढविल्याने मी समोरच्या स्लाबवर जोरदार पडलो.परंतुए
पडल्याने त्याने घेतलेल्या चावामुळे त्याच्या तोंडातुन व पंजातून
वाचलो.त्यामुळे गंभीर दुखापतीपासुन वाचलो. मग बिबटयाने आपली दिशा बदलवित
सहकारी तसेच स्लाबवर असलेले इतर लोकावर आपले रौद्ररूप दाखवीत धावून
जाण्याचा प्रयत्न केला.त्यातच काही सहकारी वनकर्मचाण्य़ांनी बांबुने
हुसकावण्याचा जोरदार प्रयत्न केल्याने त्याने दोन इमारतीच्या मधात उडी
घेतली.बिबटचे सर्व प्रयत्न स्वःसुरक्षेकरीता आमच्यावर हल्ला चढवून त्याला
निसटायचे होते. परंतु, अवती-भवती असलेली प्रचंड गर्दी तसेच त्याच्या बाहेर
येण्याने परिसरात झालेला गोंधळ यामुळे बिबट पुरता गांगरून गेला होता.
त्याला काहीच कळत नव्हते जिथे लोक नसतील खुली जागेसोबत लपण असेल अशी जागा
तो शोधत असावा लगेच स्लाबच्या इमारतीवरून खाली उतरल्यावर त्याने लांब
गल्लीतुन रोडच्या बाजुला निघणाण्य़ा गल्लीतुन टिनाचे पत्राचा दरवाजा
असलेल्या गेटकडे धाव घेतली.परंतुए लगेच नागरीकांनी जोरदार आवाज करीत बिबट
गल्लीतून बाहेर पडत असल्याचा एकच कल्लोळ करण्यास सुरूवात केल्याने काही
कळायच्या व दिसण्याचा आत एका पोलीस जवानाने टिनाच्या दारावर जोरदार धडक
दिल्याने टिनाचा पत्रा असलेल्या दरवाजाचा जोरदार आवाजाने त्याने आपली दिशा
बदलली आणि जोरात गल्लीच्या दुसण्य़ा बाजूस असलेल्या बाथरूम मध्ये घुसला.तिथे
आत फिरून बाहेर पडणार तोच आजु.बाजूस असलेल्या नागरीकांच्या गोंधळामुळे
त्याने पाण्याच्या टाक्यात उडी घेऊन तिथेच दबा धरून बसला.एकंदरीत 2
मिनीटाच्या आत बिबट कवेलु मधुन बाहेर पडुन बाथरूमध्ये घुसे पर्यत झालेला
घटनाक्रम म्हणजे मोठे संकट, बिबट बाथरूम मध्ये जाऊन तिथेच शांत झाल्याने
आमच्यासह सुटकेचा श्वास सा-यानीच घेतला. पंरतु, हा दोन मिनीटातील थरार
शरीराचा थरकाप उडविणारा होता. रेस्क्यु टिमचे सदस्य, वनकर्मचारी-अधिकारी,
तसेच दंगा नियत्रण पथकातील जवान पोलीस अधिकारी झालेला प्रसंग कधीच विसरणार
नाही. एकंदरीत बिबट बाहेर येऊन उद्भवलेली परिस्थीती थोडक्यात नियंत्रणात
आली होती. तरी दरवाजा नसलेल्या बाथरूम मध्ये घुसलेल्या बिबटयास
पकडण्याकरिता रेस्क्यु आॅपरेशन यशस्वी करण्याची जबाबदारी खांदयावर होतीच.
थोडया वेळापुर्वी बिबटयाने जो थरार मांडला होता त्या परिस्थीतीत पुढचे
आॅपरेशन जे अजुन कठीण हेाते. बिबटया ज्या गल्लीच्या टोकावरच्या बाथरूम
मध्ये होता.त्या बाथरूमला दरवाजा नव्हताए त्यामुळे त्यास त्याच बाथरूम मधुन
पळुन जाऊ नये म्हणुन त्यास तिथेच तयास कोंडुन घेणे गरजेचे होते. लवकर
स्लाब वरून खाली उतरत अवती.भवतीच्या इमारतीवर असलेल्या नागरीकांना आवाहन
करित कुणाकडे टिन असल्यास लवकरात लवकर दयावी अशी मागणी केली.बिबट ज्या
गल्लीत होता त्या गल्लीत पोहचलो.सहकारी व वनकर्मचारी यांना घेऊन बिबटयास
कोंडण्याची योजना आखू लागलो.नागरीकांनी दिलेली टिन घेऊन सहकारी सुध्दा
आले.परंतुए टिन बिबट असलेल्या बाथरूमच्या दरवाज्यापेक्षा मोठी होती. तसेच
दरवाज्याचे वरील छताची सिमंेटची शिट सुध्दा बाहेर निघाली असल्याने ती टिन
लावणे कठीण होते. दुसरा पर्याय शोधत असतानाच समोर असलेल्या टिनाच्या पत्रा
असलेला दरवाज्याकडे लक्ष गेले. काही वेळापुर्वी बिबट गल्लीतुन बाहेर
पडण्याच्या प्रयत्नात असतांना पोलीस जवानाने हे लोखंडी पत्राचे दार
ठोकल्याने बाथरूम कडे धूम ठोकली होती. तो दरवाजा तिथुन काढुन घेतला. मात्र,
सदर लोखंडी पत्रा असलेले दार बिबट असलेल्या बाथरूम पेक्षा लहान होता. हा
दरवाजा लावत असतांना सोबत उर्वरीत खुली राहणारी जागा सुध्दा झाकणे गरजेचे
होते. माझया सहकारी कार्यकत्र्यास ती जबाबदारी सोपवली. त्यास तो दरवाजा
बाजुच्या गल्लीतुन जाऊन लावण्यास सांगीतले त्याच वेळेस मी गल्लीत
बाथरूमच्या समोरून जाऊन आमच्याकडे असलेले फायबरचे डिफेन्डर ने झाकण्याचे
ठरले. परंतुए तो दरवाज्यातच असलेल्या पाण्याचा टाक्यातुन तो एकटक गल्लीकडे
म्हणजे आमच्या हालचालीकडे लक्ष देऊन होता.काही मिनीटापुर्वीचा बिबटचा थरार
बघता अशा परिस्थीत बाथरूमला दरवाजा लावण्याचा बेत आणखीणच धाडशी तसा
धोक्याचा होता.त्यांनी केलेला हल्ला यामुळे त्याची नजर माझावर बसलेली
होतीण्य़ामुळे माझा सहकारी नितीन ला दरवाजा घेऊन सरळ जाऊन लावणे शक्य
नसल्याचे स्पष्ट जाणवत होते आणि दरवाजा सुध्दा आखुड पडत होता उरलेल्या
खुल्या जागेतुन उडी घेतली किंवा गल्लीत अर्धात असतांना धावून आला तर यामुळे
पुढे जाणे धोकादायक असल्याचे जाणवत होतेण्परंतु, त्यास तिथेच न कोंडल्यास
थोडया वेळा पुर्वीची थोडक्यात निभावलेली परिस्थाीती बाथरूम मधुन बाहेर
पडल्यास स्थिती हाताबाहेर जाईल त्यापेक्षा धोका पत्करण्याचा निर्णय आम्ही
घेतला. बाथरूमच्या बाजुने असलेल्या दुसण्य़ा गल्लीतुन टिनाचा दरवाजा घेऊन
जाण्यास नितीनला सांगीतले तो आल्यास मी सरळ गल्लीतुन फायबरचा गार्ड बोर्ड
घेऊन जाऊन बाकी असलेली खुली जागा पुर्णपणे बंद केली, टिमच्या इतर
सहका-यांनी सुध्दा बाथरूमच्या दरवाजाची इंच नी इंच जागा झाकुन घेतली आणि
आम्ही सुटकेचा श्वास घेतला. नंतर जास्त रिस्क न घेता बाथरूमच्या वरून
सुध्दा जाळीने झाकुन घेतले. बिबटयाच्या संकट काही वेळासाठी स्थिर झाल्याने
बिबटयाने चावा घेतलेल्या शरीराच्या भागाकडे होत असलेल्या दुखन्याने लक्ष
वेधुन घेतलं.कमरेखाली हिपवर चावा घेतल्याने जखम पाहता येणे शक्य नव्हते,
हातानी जखम पाहण्याचा प्रयत्न केला तर हात रक्ताने माखलाए जास्त
रक्तस्त्राव होऊ नये म्हणुन रूमालाची घडी पॅन्टच्या आत दाबली. जवळपास
डाॅक्टर असल्यास बोलावून घेण्यास स्थानीक वनपरिक्षेत्र अधिकारीना
सांगीतले.बिबटयास बाथरूम मध्येच गुगींचे इंजेक्शन देण्याकरिता प्रयत्न सुरू
झालेले होते. बाथरूमवरील सिमंेट शिटचा ताबा घेत आम्ही तिघेही वर चढलो.
सिमंेट शिट असल्याने ती तुटणार नाही याकडे लक्ष देण्याची वरून सर्व अधिकारी
मंडळी सुचना देत होते. डाॅट मारण्याकरिता सिमंेट शिटला छिद्र पाडणे गरजेचे
होते. त्याकरिता लोखडी सब्बल मागण्यात आली. त्याने छिद्र पाडतांना सहा
इंचचे मोठे छिद्र झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने जाळीने झाकुन घेतले. डाॅट
तयार असल्याने त्या छिद्रातुन बिबटयाचा शोध घेतला तर तो पाण्याच्या टाक्यात
बसलेला होता. शुटरला त्या बिबटयास डाॅट मारणे कठीण होत होते, कारण वरून आत
अंधार असल्याने आणी बंदुकीच्या ज्या भिंगातून बिबटयाचा शरीराचा विशीष्ट
भाग पाहणे शक्य नव्हते. परंतु, या विपरीत परिस्थीत शुटरने पहिला डाॅट मारला
खरा पण तो बिबटयास लागला नाही.डाॅक्टरनी दुसरा डाॅट तयार ठेवलेला होता, तो
बंदुकीत चढवून परत शुटर सज्ज झाला. यावेळी आतील अंधार दुर करण्याकरीता
पोलीस अधिकारीने त्याच्याकडील मोठी बॅटरी दिली मी बॅटरीने प्रकाश त्याच्या
शरीरावर टाकत होतो तर शुटर बंदुकीने नेम साधत होता. आत बिबटयाची हालचाल तेज
झाली होती. वरून छिद्रातुन प्रकाश पडल्याने त्याने छिद्राकडे उडी घेण्याचा
प्रयत्न केला. परंतु, वरून पुर्णपणे झाकुन असल्याने त्यास बाहेर पडण्याचे
प्रयत्न करणे कठीण होते. आमच्या सोबत छतावर उत्साही पोलीस कर्मचारी होता.
पुर्वीपासुन सक्रीयपणे आम्हास सहकार्य करित होता, जणू आमच्या रेस्क्यु
टिमचाच एक सदस्य दिलेल्या प्रत्येक सुचनेप्र्रमाणे मदद करीत होता. परंतु,
गुगींचे औषध देण्याची प्रकीया तो पोलीस विभागातील आॅपरेशनशी जोडुन पाहत
त्यास फार लेंदी प्रकीया वाटत होती. त्याचानुसार गुन्हेगारांचे जसे
एन्काउन्टर करतात तसे करण्याचा बेत होता. त्याच्या उत्साहानुसार एक घाव दोन
तुकडे फटाफट व्हावे अशी भावना होती. तो आपल्या अधिका-यांना एक सिंमेटची
खाली बोरी हातात घेऊन बिबटयाचे मंुडके त्यात घालुन पकडतो म्हणुन परवानगी
मागत होता.त्यास वन्यजीव संरक्षण अधिनीअमात बिबटची शेडयुल्ड एक चा प्राणी
असल्याने त्यास पकण्याच्या परवानगी घेण्यापासुन तर जंगलात सोडेपर्यत
मार्गदर्शक सुची असतात याबाबत माहीती दिली. गुगींचे औषधही इंजेक्शन
शरीराच्या कुठल्याही भागावर देता येत नाही, दिल्यास त्यास धोका संभवतो.
इंजेक्शन देताना पुढील पायाच्या वर आणी मागील पायाल्या मासांवर दयायचे
असते. गुगींचे औषधीचे इंजेक्शन पशुवैदयकीय डाॅक्टराच्या मार्गदर्शनाखालीच
तयार करावे लागते. संपुर्ण आॅपरेशन दरम्यान त्यास असले पाहीजे. वाघ-बिबट
बाबत आॅपरेशनच्या बाबतीत सगळी माहीती दिल्यावर तो थोडा शांत झाला. पण
त्याचा संयम तुटलेला होता हे लक्षात येत होते.शुटरचे डाॅट मारण्याचा
प्रयत्न सुरू होते बाथरूमच्या आत टाक्यात असतांना तो शांत असल्याचे पाहुन
डाॅट मारला. तो डाॅट बिबटयाचा मागील भागात पाठीच्यावर बाजुस मासांत रूतलेला
दिसत होता. डाॅट यशस्वीपणे लागलेला होता. बिबट टाक्यातच होता, वरून येणारा
प्रकाश बंद केला. आत शांत राहावा म्हणुन आमचा आवाज कमी करीत इतरांना शांत
राहण्यास सांगीतले. डाॅक्टर सोबत सर्वानीच आपल्या घडीकडे लक्ष देणे सुरू
केले. दहा मिनीटे, पंधरा मिनीटे, विस मिनीटे झाली तरी पुर्णपणे बेशुध्द
झाला नाही. हलकी गंुगी आल्याचे जाणवत होते. परत वेळ दिला अर्धा तास उलटला
तरी तो बेशुध्द झालेला नव्हता. आत डोकावून पाहले तर तो टाक्यात मान टाकत
असल्याचे लक्षात येत होते पण क्षणात मान उचलत होता. जास्त बारकाईने पाहीले
तर कळल त्याच्या नाकात पाणी गेल्याने तो अस्वस्थ होत होता. टाक्यात जवळपास 4
इंच पाणी असावे. तो बसल्याने ते 6 इंच वर आले असेल. गंुगीच्या औषधाचा असर
होऊ लागताच तो मान खाली टाकल्यानंतर पाण्यात नाक डुबत असल्याने तो बेशुध्दा
होण्याएवजी अस्वस्थ होत होता.हे लक्षात येताच जमा झालेल्या नागरीकांपैकी
उत्साही लोकाकडुन टिल्लू पंपचा पाईप मागवून घेतला. पाईप वरून सोडुन
टाक्यातील पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू केले. टाक्यातील थोडया पाण्याने
सुध्दा दुर्घटना होऊ शकत होती. याकरिता मोठया प्रयत्नानंतर थोडे पाणी काढता
आले पण पुर्णपणे नाही. मी जेव्हा वरून पाईप हलवित होतो. तेव्हा बिबट त्या
पाईपमुळे टाक्यात अस्वस्थ होत होता. हे लक्षात येताच त्या पाईपच्या एका
टोकाने त्यास त्रास देऊन त्याला टाक्याबाहेर निघण्यास प्रवृत्त करण्यात यश
आले. बाहेर पडताच त्याच्यावर गंुगीचा पुर्ण असर झाला. पाणी नसल्याने आता
धोका नव्हता. वरून बाबुंच्या काठीने त्यास मानेजवळ, कानाला हालवून बघितले
काहीच हालचाल त्याने न केल्याने तो बेशुध्द झाला समजुन मी वरून खाली उतरलो.
बाथरूम घेरून असलेल्या टिमला पुढील सुचना देत, बादलीत पाणी बोलावून घेतले.
गव्हाचे मोठे खाली पोते पाण्यात भिजवून घेतले. स्ट्रेचर आधीच मागवून घेतला
होता.बिबटयास बाहेर काढण्याकरिता दार बाजुला करून आत जातांना सर्वाना काय
करायचे याची माहीती दिली. वरून बॅटरीने प्रकाश पाडण्याच्या सुचना दिल्या.
दरवाजा बाजुला सरकवून बिबटयास हात लावण्याआधी त्यास डिवचून बघितले, हालचाल
नव्हती. मग बिबट ने हालचाल केल्यास, ज्याच्याकडे दरवाजा पकडण्याची जबाबदारी
होती, डिफेन्डर पकडण्याची जबाबदारी होती त्यांनी तयारीत राहण्याच्या सुचना
दिल्या आणि दरवाजा जास्त न उघडता आत गेलो. बिबट आत असल्याने दारापर्यत
खिचण्याकरिता त्याचा पाय खिचला शेपटी समोर असल्याने त्याची शेपटी
सावधानीपुर्वक खिचत असतांनाच त्याने मान फिरवत माझयाकडे गुरावला यावेळेस मी
अगदी एक फुटावर असल्याने झालेल्या प्रकाराने चांगलाच गांगरून गेला. क्षणात
बाहेर येत सहका-याच्या हातातला दरवाजा लावत सर्वाना दरवाजाचे सर्व छिद्र
बंद करण्याचे सांगीतले. परत एकदा संपुर्ण टिम मध्ये थराराचा संचार
झाला.बिबटयाचा काही वेळापुर्वीचा थरार पुन्हा डोळयासमोर होता. आतापण आम्ही
सावधान नसतो तर धोका होता. झालेल्या प्रकाराने बिबटयाच्या चावा घेतलेल्या
पाश्र्वभागाकडे पुन्हा लक्ष गेले. बिबट बेशुध्दा का झाला नाही ही चिंता पण
होती. शुटर व डाॅक्टरला माहीती दिली, डाॅट मधील औषधाचे प्रमाण तर कमी नसावे
असा अंदाज बाधंला पण ते योग्यच होते. बिबटयास बेशुध्द करायचे असेल तर
पुन्हा डाॅट मारणे गरजेचे होते, असे करणे धोक्याचे होईल ही भितीही होती.
याकरिता नेहमी आॅपरेशन मध्ये सहभागी असणारे अनुभवी डाॅ कडुकरांना फोन केला.
त्यांना पुर्ण माहीती दिली, आॅपरेशन मधील डाॅक्टर लेखामी सोबत बोलणे करून
दिले. कडुकरांच्या सल्लानुसार वाट पहा नाही झाला तर काही प्रमाणात औषधाचा
डाॅट मारण्याचे सांगीतले. परंतु, पुन्हा डाॅट मारायचा की नाही, प्रमाण
जास्त झाले तर. आधी प्रश्नामुळे वाट कीती वेळ पाहायची यात एकमत होत नव्हते.
क्षण-क्षणाला त्याचा हालचालीकडे लक्ष ठेवून होतो. अर्ध बेशुध्द असल्याने
तो उठण्याचा प्रयत्न करित होता पण ताकत जोडु शकत नसल्याने तो पडत
होता.15-20 मिनीटे वाट पाहल्यानंतर परत डाॅट मारण्याचा निर्णय घेण्यात आला.
कडुकरांनी सांगीतल्याप्रमाणे लेखामी डाॅक्टरांनी डाॅट तयार केला. आणि शुटर
ने यशस्वीरित्या डाॅट मारला. दहा मिनीटानंतर बिबटयाची चाचपणी केली. तर
पुर्ण बेशुध्द झालेला असल्याची खात्री करून त्यास बाथरूम मधुन काढण्याचे
प्रयतन चालविले. यावेळेस जास्त धोका पत्करावा लागू नये म्हणून आधिच
बिबटयाच्या शरीरावर जाळी टाकून स्वतःला सुरक्षीत करवून घेतले. नंतर बेशुध्द
बिबटयास बाहेर खिचत स्ट्रेचरवर टाकले. ओले केलेले पोते त्याच्यावर टाकले.
डोळे व्यवस्थीत झाकुन घेतले. बिबटयास बाहेर नेत असतांना नागरीकांनी
पाहण्याकरीता जोरदार आवाज करीत एकच कल्लोळ केला. नागरीकांच्या गर्दीतुन
बाहेर काढीत ट्रकवर असलेल्या पिंज-यात त्यास टाकले. आणि ट्रक सुरक्षीत
स्थळाकडे रवाना झाला. एका थरारक घटनेस पुर्ण विराम मिळाला. अवती-भवती जमा
झालेले नागरीक श्वास रोकुन पाहत होते, भिती होती परंतु, त्या बिबटयास एक
क्षण पाहण्याची उत्सुकता होती. पंरतु दुरवर इमारतीवर असलेल्या बराच
नागरीकांना ट्रकमधुन जाणारा पिंजराच पाहता आला. जो जवळुन पुर्ण आॅपरेशन
पाहत होती ती मंडळी किस्सा रंगवून सांगत होती. बिबटचा थरार अनुभवतांना
झालेली पळापळ, कसे मार्ग काढुन पळालो, मी अगदी जवळच होतो आदी प्रसंग रंगवून
सांगाणा-याच्या अवती-भवती मंडळी जमा झालेली होती. रेस्क्यु टिमचे मंडळी,
अधिकारी, पोलीस एकमेकांना केलेल्या सहकार्याबदद्ल यशस्वी आॅपरेशन बाबत
शुभेच्छा व आभार व्यक्त करित होते. पण माझे लक्ष जख्मेकडे लागुन होते पुर्ण
धावपळीत किती जखम आहे ती पाहता आली नाही.झालेला प्रसंग म्हणजे आमची चुक
किंवा बिबटचा आत्मसुरक्षे करिता पुर्ण ताकदीनीशी केलेला प्रयत्न हे पाहणे
माझयाकरिता उत्सुकता होती. म्हणुन बिबटला नेण्यात आलेल्या ठिकाणावरून जाऊन
परत घटनास्थळी येऊन गोठयाची पाहणी केली. मोजमाप केले, बिबटयाने मारलेली
उडीची उंची मोजली, त्यास आधार कशाचा भेटला हे बघितले. आणि बिबटच्या
स्ट्रेन्थचे आश्चर्च मानण्या पलिकडे मार्ग नव्हता…. सुखरूप वाचलो, मोठी
घटना टळली.