♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


यशोगाथा

अभिनव 'मैञी पक्ष्यांशी' उपक्रम
    सद्या पाणीटंचाईचा फटका माणसांप्रमाणे पक्ष्यांना सुद्धा बसत आहे.ठिकठिकाणी उभारलेले मोबाइल मनोरे,स्लॅबची घरे,झाडांची कत्तल यांमुळे चिमण्यांचा निवारा हिरावून गेला आहे.चिमण्यांची संख्या दिवसागणिक कमी कमी होत आहे.आगामी काळात चिमण्या छायचिञातच राहतील काय..? असा प्रश्न उपस्थित होत आहे.'चिमण्या वाचवा' अशी आर्त हाक देणारे सालई शाळेतील विद्यार्थीप्रिय तथा उपक्रमशील शिक्षक सचिन चव्हाण यांच्या  स्वकल्पकतेने दरवर्षी जागतिक चिमणी दिवस (२० मार्च) विशेष दिनी अभिनव 'मैञी-पक्ष्यांशी' उपक्रम मागील पाच वर्षापासून गावात विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सहकार्याने राबवित असतात.
     रामटेक तालुक्यातील आदिवासी भागातील राष्ट्रीय पेंच तोतलाडोह प्रकल्प उद्यान ला लागून आणि मोगरकसा निसर्गरम्य पर्यटन स्थळाच्या अगदी बाजूलाच वसलेले सालई हे गाव;साधारणतः२२ कि.मी अंतरावर आहे. सालई गावात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा असून इयत्ता १ ते ७ चे वर्ग आहेत.अन शाळेची एकूण पटसंख्या ६७ एवढी आहे.पक्ष्यांविषयी दयाभाव निर्माण व्हावा, पर्यावरण विषयक जाणीव जागृतीची मूल्ये रुजावित.यासाठी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये उपरोक्त भाव जाणीव जागृतीसाठी दिनांक २० मार्च २०१२ पासून शाळेत सदर उपक्रम सुरूवात करण्यात आले.पक्ष्यांसोबत मैञी व्हावी, दयाभाव मूल्ये रुजवणूक व्हायला हवी.यासाठीच मी स्वतः सदर अभिनव उपक्रमाला 'मैञी पक्ष्यांशी' नामक उपक्रम असे नाव दिले. सदर उपक्रमाच्या अनुषंगाने शाळेचे मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची मासिक सभेत उपक्रमाचा विषय घेण्यात आला.सालई गावाच्या भोवताल दाट जंगल आहे.जंगलात विविध पक्ष्याव्यतिरिक्त अनेक वन्यजीव दिसून येतात.उन्हाळ्यात जंगलातील नाले,नद्याचे पाणी आटून जाते.मग पाण्यासाठी वन्यप्राणी सह पक्षी भटकंती करीत असतात.उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे ठरले.सुरूवातीला मी स्वनिर्मित पाणपोई बनवून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले.मग विद्यार्थी ही आनंदाने स्वनिर्मित पाणपोई बनवू लागले. यात शाळेतील भाग्यश्री,गुंजन,दिव्या,जानवी,स्वाती,मातेश्वरी,चंद्रपाल,शुभम,कार्तिक,सौरव,आरती,प्रणय आदी विद्यार्थी उत्साहाने सहभागी व्हायचे.शाळा,घर,परिसरातील झाडावर पाणपोई लावण्यात आल्या.त्यात पाण्याची सोय विद्यार्थी, पालक मोठ्या उत्साहाने योगदान देत असतात . चाळीस पाणपोई पासून सुरू झालेला प्रवास आज सद्यास्थितीत ऎंशी पाणपोई संपूर्ण गावभर लावल्या जातात.
     विद्यार्थी व पक्ष्यांशी एकमेकांशी मिञत्वाचे नाते जपणारा असा अभिनव 'मैञी पक्ष्यांशी' उपक्रम २०१२ पासून सुरूवातीला चाळीस पाणपोई पासून ऎंशी पाणपोई आता दुपट्टीने संख्येत वाढ झाली आहे.सदर उपक्रमाची विविध वृत्तपत्रात बातमी प्रसिध्द झाल्याने नागपूर जिल्ह्यात भरपूर लोकप्रियता मिळाली. या उपक्रमामूळेच ठिकठिकाणी पक्ष्यांसाठी पाणपोई व घरटे बनू व लावू लागले. यंदा २०१७ मध्ये उपक्रमासाठी मातीची पाणपोई देणारे दानदाते ही मिळाले; हे विशेष.माझ्यासह विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांमध्ये पक्ष्यांसाठी आपण काहीतरी करत आहोत.याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर हास्य न फुलले तर नवलच.प्रत्येकांनी आपल्या घरी पाणपोई उभारावी. असे आवाहन लोकप्रिय पक्षीमिञ सचिन चव्हाण यांनी केले आहे.

     
श्री.सचिन भीमराव चव्हाण,
   विषय शिक्षक,
  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक.   शाळा सालई, पं.स.रामटेक जि.प.नागपूर
मो.9158393260