♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


चुकली दिशा आयुष्याची

चुकली दिशा आयुष्याची, चुकले ध्येय सारे
आयुष्याच्या या वळणावर पच्छातापाचे वारे


मी धावत होतो निरंतर त्या मृगजळाच्या पाठी
आपल्याच धुंदीत, शोधत होतो दिशा कुणासाठी


या वळणावर आयुष्य हिशोब मागते आहे
उत्तर द्यावे काय आयुष्य मौन पाहते आहे


घाबरलो मी वादळांना जे संधी होते त्या ध्रुवाचे
श्वास न ओढु शकलो जे वारे होते नव्या दमाचे


मीच हातांनी फाडला माझ्या जिवनाचा नकाशा
जेव्हा शोधत गेलो मार्ग तेव्हा झाल्या सैरभैर दिशा


चुकली दिशा तरीही आता नवे ध्येय शोधतो आहे
जाणतो झाला उशीर तरीही नवी पहाट पाहतो आहे


निराशा असली तरीही मी आता जागलो आहे
नवी पहाटेचं स्वप्न घेऊन आता चाललो आहे. 

संतोष उदमले 
santoshudmale@yahoo.com