♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


नरेंद्र कुकडे

जगावे जरासे


( वृत्त- भुजंगप्रयात )
हरावे जरासे.....

जगावे जरासे , मरावे जरासे
सदा जिंकतांना हरावे जरासे


उगा सोडले ते सुखाचे उसासे
पुन्हा आज वाटे धरावे जरासे


खुळी आस माझी कुणाला कळेना
मनी आपल्या का झुरावे जरासे !


रित्या काळजाची व्यथा का करावी ?
मनी सागराला भरावे जरासे

जगावे जरासे , मरावे जरासे
सदा संपतांना , उरावे जरासे.....


नरेंद्र के. कुकडे
प्लाट नं. १५ , गुराच्या दवाखान्याजवळ
महाजनवाडी , हिंगणा रोड वानाडोंगरी...
मो. नं. 9850830250