♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


सारिका चिकटे

मी कवितेच्या वाट चा वाटसरु
मी कवितेच्या वाट चा वाटसरु
त्यावर फिरणारं मी फुलपाखरु
त्या वाटेवरील भावनांचे रंग निराळे
त्यानेच बहरले माझे मन जगावेगळे
ना दिशेची तमा ना वेळेची
मला तिची साथ आयुष्यभराची
नकळत जोडले गेले अमूचे बंध
आता हवेहवेसे वाटतात फुलांचे गंध
त्या वाटेवरच मनसोक्त बागडावे
अन् पूर्णतः त्यावरच रमावे
शब्दांशी शब्द जोडले जातात
अन् वाटा काव्याने बहरतात
तिच्याशिवाय आयुष्य माझं अधुरच
तिची चव कितीही चाखली तरी मधूरच
या वाटेवरच आयुष्य माझं सरावं
अन् कवितेच्या वाट चा,वाटसरु म्हणूनच मी जगावं

सारिका अनंत चिकटे
जळगाव जामोद जि.बुलडाणा