♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


आशिष वरारकर

"प्रवास करताना"

प्रवास करताना
रमायचे क्षणभर,
प्रवास करताना
रमायचे मनभर....
प्रवास करताना
गुनगुनायची गाणी,
प्रवास करताना
किती सार्या आठवणी....
प्रवास करताना
सुटतात सारे मागे,
प्रवास करताना
जूळतात नवे धागे....
प्रवास करताना
थांबायचे नाही कधी,
प्रवास करताना
साठवायाचे सारे मणि....
प्रवास करताना जावे
तरंगत
होवूनी वार्यावर स्वार,
प्रवास करताना
जोडावी नाती जणू
देता श्वासांना सार....
- आशिष वरारकर, चंद्रपुर
- १६-०४-१६
-९९६००७३३५३

*******"""""*******

भावतरंग...
तुझ्या भेटीचा रंग तो 
ओसरतो नभावरी,
जिव जुळे जीवा 
आभाळ दाटे हृदयापरी....
सारे बोल होती निशब्द 
सुखाच्या सागरापारी,
सरतो मि तुझ्यात 
प्रेमाच्या अंतोतरी...
- आशिष वरारकर
-चंद्रपुर,
-९९६००७३३५३
- ५/१०/२०१३