आयुष्य म्हणजे
आयुष्य म्हणजे वळणावळणाची वाट
कधी सरळ रस्ता तर कधी नागमोडी घाट
कधी सरळ रस्ता तर कधी नागमोडी घाट
आयुष्य म्हणजे आपल्यांचा सहवास
कधी आनंदी तर कधी खिन्न जीवनप्रवास
कधी आनंदी तर कधी खिन्न जीवनप्रवास
आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ
विविध प्रसंगातला सुखदुःखाचा मेळ
विविध प्रसंगातला सुखदुःखाचा मेळ
आयुष्य म्हणजे पुढे पुढे चालत राहणे
मिळालेलं सुख भरल्या डोळ्यांनी पाहणे
मिळालेलं सुख भरल्या डोळ्यांनी पाहणे
आयुष्य म्हणजे वर्तमानातील अडचणी
भविष्याची चिंता अन् भूतकाळातील आठवणी
भविष्याची चिंता अन् भूतकाळातील आठवणी
आयुष्य म्हणजे भावनांचा पसारा
अखेरच्या वळणावर थांबतो जीवनप्रवास सारा
अखेरच्या वळणावर थांबतो जीवनप्रवास सारा
डाॅ. गौरव देशमुख
अमरावती.
अमरावती.
9561551825
************************************
आई
---------------------------------------
बाप
************************************
आई
पडती शब्दही अपुरे वर्णाया थोरवी आईची
माया अशी वासरावर त्या गोठ्यातल्या गाईची ;
प्रेमापुढे तिच्या माणिक रत्नही पडती फिके
तिच्या दूर जाता का दाटे आठवणींचे धुके ?
आई म्हणा माई म्हणा वा म्हणा माझी माय
मायेची ममता वाटे जणू दुधावरची साय ;
घेते काळजी कुटुंबाची लावून जीवास घोर
वटवृक्षापरी देई सावली ती माऊली थोर ;
मातीच्या गोळयास तू दिलास छान आकार
देतो वचन तुज आता करेन स्वप्न तुझे साकार .....
डॉ. गौरव देशमुख
अमरावती.
---------------------------------------
बाप
मोजायला माया त्याची
सांगा कोणते माप आहे?
राब राब राबणारा
कष्टकरी बाप आहे ;
कठोर वाटला जरी
आईपरी माया त्याची ;
आमच्यासाठी झिजताना
घामानंच भिजे काया त्याची ;
लेकराच्या कौतुकानं
डोळे येती रे भरुन ;
कर्तव्याच्या ओझ्याखाली
वेळ जाते रे सरुन ;
कुटुंबाच्या सुखासाठी
बाप राबत राहतो ;
अरे माझा देव मी
त्याच्यात पाहतो !!!
डॉ. गौरव देशमुख
अमरावती.