♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


शिकवण आणि आपण..!"

"फुले ,शाहूं,आंबेडकरांची  शिकवण आणि आपण..!"

प्राचीन काळापासून या देशातील बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेऊन,आपल्या पूर्वजांवर गुलामी लादून आपल्या अस्तित्वाचा नायनाट केले,यास इतिहास साक्ष देत,बाल विवाह,सती पद्धत,महिलांना शिक्षण व हक्क हिरावून घेतलेला हा इतिहास आपल्या वाचनात असेलच.

या सर्व बाबींवर मध्ययुगीन भारताच्या इतिहासात मोठी आमूलाग्रपणे क्रांती घडवून आणली,आणि आपल्या बहुजनांवर होणाऱ्या अन्यावर,अत्याचारावर आवाज उठवणारे महामानव होऊन गेले,त्यातच शैक्षणिक दृष्टीचा विचार केल्यास,गेल्या १०० ते १५० वर्षांपासून आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात येत आहोत,त्या प्रवाहाला अजूनही आमचे समाज बांधव जोडलेले नाहीत, हा शिक्षणाचा अधिकार असे साधे सरळ मार्गे मिळाला नाही,तर त्यासाठी या देशाला महापुरुषांनी आपला रक्ताचा अभिषेक केला,स्वतःसाठी नाही तर या समाजासाठी झीजले, अनेक वर्षापासून स्त्री ही केवळ भोग वस्तू अशी समाजात रूढी निर्माण करून तिला चूल आणि मूल यातच गुरफटून ठेवले होते, अश्या अवस्थेत १८ व्या शतकात महिला शिक्षणासाठी प्रस्थापित व्यवस्थेशी लढा देत, महात्मा फुले दांपत्याने अंगावर शेण दगड झेलेले, मात्र स्त्रियांना चूल आणि मूल या पलीकडचे शिक्षण देऊन धर्म व्यवस्थेत बधिस्थ असलेल्या स्त्रियांना मुक्त केलं,१८४८ साली पुण्याच्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरवात करून,देशातल्या पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुलेंनी हे कार्य अवगत केले,फुलेंच कार्य धर्म बुढवत आहे,अश्या धर्म व्यवस्थेतील थोतांडांणी गरळ ओखणे सुरू असताना मात्र या विरोधाच्या परिस्थितीत फुले दांपत्य खचले नाही,शेवटच्या स्वासापर्यंत स्त्री स्वातंत्र्यासाठी लढत राहिले,आणि समस्त बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहाला जोडण्याचे कार्य हे आजच्या बहुजनांच्या अस्तित्वाचा पाया आहे...



पुढे शाहू महाराजांनी शिक्षण हे हक्काच व सक्कीचे करून बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात वाहून नेण्याचं कार्य केले,छत्रपती शाहू महाराजांच्या साम्राज्यात जो कोणी मुलांना शाळेत पाठवीत नाहीत त्यांना २ रुपये दंड फुकारून, त्यांनी या बहुजन समाजाला वर्षेनुवर्षं चालत आलेल्या गुलामीतून मुक्त करण्याचं कार्य व शिक्षणाच्या प्रवाहात वाहून नेण्याचं कार्य शाहू महाराजांनी केलं,बहुजनांच्या मुलांसाठी वसतिगृह त्यांच्या शिक्षणासाठी लागणारे साहित्य सर्व व्यवस्था महाराजांनी आपल्या खाजगी खरच्यातून केले,याच २०व्या शतकाच्या प्रारंभास शाहू महाराज तर इकडे कर्मवीर भाऊराव पाटलांनी बहुजनांच्या मुलांसाठी शिक्षण घेण्यास व त्यांना शेवटच्या स्वासपर्यंत प्रयत्न करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ रोजी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली.भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’,स्वतःच्या दाढीच्या केसा एवढे विद्यार्थी मी शिकवणार अशी शपत घेऊन आज त्यांचं त्या रोपट्यांचे वटवृक्षात रूपांतर झाले,याच पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या अभंग रचनेतून व जण प्रबोधनातून वेळो वेळी शिक्षणाचे महत्व समस्थ बहुजन समाजाला पटवून देण्याचं कार्य त्यांनी केलं, "ज्यांनी मुलगा नाही शिकवीला तोही पापाचा भागीदार झाला,जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला तैसे शिक्षण देणे अगत्याचे", या रचनेतून तुकडोजींच्या शिक्षणावरील काटकसर समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात नेण्याची जिद्द याची जाणीव होते,याच स्थितीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित - पीडितांचे पुनरुत्थान केले, शिका ,संघटित व्हा ,संघर्ष करा या ब्रीद वाक्याची उखलंन करून बाबासाहेबांनी भारतीय संविधानात शिक्षण हे जन्मसिद्ध हक्क आहे, सर्वसामान्यांसाठी शिक्षणाचे दारे उघडे केले,वरील महापुरुषांच्या वैचारिक दृष्टीकोनास आपल्या सबळ मेहनतीने,देशाच्या सर्वांगीण विकास हा केवळ शिक्षणामुळे होतो,माझा देश हा शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे,आणि देश्याच्या भवित्व्ह्यासाठी, बहुजन समाजाला शिक्षण सक्तीचे करणे बंधनकारक ठरवून, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.अशी उपाधी दिली....



यावरून सर्व महापुरुषांनी शिक्षणासाठी तडजोड केले,मात्र आजची परिस्थिती काही औरच आहे,इथे गरीब अति गरीब होत चालले आहेत आणि श्रीमंतांचे मजले वाढत चालेले आहेत,अश्या परिस्थितीत अनेक कुटुंब अडकून पडलेत,की आजही शिक्षणाचा घोट त्यांनी घेतलेला नाही,आर्थिक परिस्थिशी झुंज घेत,शिक्षणाच्या प्रवाहा पासून दूर लोटले गेले,ही परिस्थिती भयावह आहे,खाजगी शिक्षण,शहरी शिक्षण आणि स्पर्धेच्या युगात शैक्षणिक साहित्याची भरमसाठ भार हा परवडणारे नाही,अश्या परिस्थितीशी लढा देणाऱ्या,शिक्षणापासून दूर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत गरजातील काही आवश्यक गरजा पुरवठा होत नसल्याने,होतकरू ,जिद्दी मुलांना शाळेची ओढ आहे मात्र परिस्थिती तिथे आड येथे अश्या काही विद्यार्थ्यांच्या संख्येत आज भरमसाठ वाढ होत चालली आहे, अश्या अवस्थेत आपली सामाजिक बांधिलकी काय..?,आपल्या वरील झालेल्या अन्यायावर लढा उभारून आपल्याला आज शिक्षणाचा घोट देऊन गेले,परंतु आम्ही आज त्या शिक्षणाचा काय उपयोग करतोय.? स्वतःच्या अस्तित्वासाठी,स्वार्थपणासाठी,माझं घर माझं बाळ,माझी बायको..! बस का या पुढे आपलं काहीही कर्तव्य नाही.. अशीच अवस्था निर्माण झाली,म्हणून म्हणतात ना,वारील महापुरुष एकदाच होऊन गेले या पुढे होणे कदापि शक्य नाही,आणि ते अगदी बरोबर आहे,बाबासाहेब म्हणायचे जो पर्यंत हा समाज मंदिरापुढील रांग ,ग्रंथालया पुढे उभारणार नाही तो पर्यंत समाजात परिवर्तन होणे शक्य नाही,आजची अवस्था पाहता,मंदिरापुढील रांग काही कमी नाही उलट दान पेटी ही भरत आहे,मात्र एखाद्या अस्वस्त गरीब,होतकरू मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात नेण्यास मदत करणे शक्य नाही,कधी एखाध्या आश्रमात जाऊन त्यांच्या वेदना,दुःख समजावून त्यांच्या दुःखात सामील होण्यास जमत नाही,उलट स्वतःचे आई वडील वृद्धाश्रमात ठेवण्यास त्या वृद्धाश्रमाबाहेर रांगा लागत आहेत.. ही खेदेेची बाब आहे..!

कोणतीही एखादी मोठी व्यक्ती सार्वजनिक जीवन कोणत्याही कारणाने सोडून गेली तर त्या व्यक्तीचे केवळ विचार मागे राहतात आणि हे विचारदेखील त्या त्या ठरावीक काळापुरतेच मर्यादित राहू शकतात,हे आजच्या परिस्थितीवरून ठळकपणे उमटून दिसत आहे...



लेखक :- श्रीपाद नागनाथ राऊतवाड

मदनूर जि. कामारेड्डी

मो.९९७००५२८३७
------------------------------------------------
लेखक विद्यार्थी असून,सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत....