♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


जयश्री दाणी

मुक्ताईस...

उन्ह अंगावर झेलून
ती चालते दूमडून
माझ्या मुक्ताईस पाहे
ज्ञानोबा वळून वळून !

दोन तळ्यांचे गहिवर
रिक्त मनाच्या पोकळी
घेई आकाश कवळून
उदासल्या सांजवेळी !

वारा झोम्बून झाडाला
वाहे दूरच्या देशाला
तापल्या वाळूवर ती
घेऊन चंद्र उशाला !


- जयश्री दाणी