काव्यशिल्प
१. पण, खिशात दमडी नाही…
वाटते मला बाहेर कुठंतरी
दूरवर फिरायला जावं
मनसोक्त भ्रमंती करावी
तुझ्यासह पर्यटक व्हावं
पण, खिशात दमडी नाही…
वाटते मला बाहेर कुठंतरी
दूरवर फिरायला जावं
मनसोक्त भ्रमंती करावी
तुझ्यासह पर्यटक व्हावं
पण, खिशात दमडी नाही…
वाटते मला बाहेर कुठंतरी
दूरवर जेवायला जावं
चवदार, खमंग पदार्थ खावं
तुझ्यासह खवय्या व्हावं
पण, खिशात दमडी नाही…
दूरवर जेवायला जावं
चवदार, खमंग पदार्थ खावं
तुझ्यासह खवय्या व्हावं
पण, खिशात दमडी नाही…
वाटते मला बाहेर कुठंतरी
दूरवर मनोरंजन करावं
कला, नृत्य, सिनेमा बघावं
तुझ्यासह रसिक व्हावं
पण, खिशात दमडी नाही…
दूरवर मनोरंजन करावं
कला, नृत्य, सिनेमा बघावं
तुझ्यासह रसिक व्हावं
पण, खिशात दमडी नाही…
वाटते मला बाहेर कुठंतरी
दूरवर प्रवास करावा
आज इथं, उद्या तिथ सैर करावी
तुझ्यासह प्रवाशी व्हावं
पण, खिशात दमडी नाही
दूरवर प्रवास करावा
आज इथं, उद्या तिथ सैर करावी
तुझ्यासह प्रवाशी व्हावं
पण, खिशात दमडी नाही
सखे, खिशात दमडी नाही
म्हणून हे सारं स्वप्नच आहे…
पण, तुझ्या प्रेमासाठी
या हृदयात श्रीमंतीचं
कोठार भरलेलं आहे…
म्हणून हे सारं स्वप्नच आहे…
पण, तुझ्या प्रेमासाठी
या हृदयात श्रीमंतीचं
कोठार भरलेलं आहे…
– देवनाथ गंडाटे
काव्यशिल्प
ता. 23 एप्रिल 2017
२. या भूवर अवतरली
पाहिले प्रथम तेव्हा
नजरेत ती भरली
जशी अवकाशातून
परी या भूवर अवतरली
नाचणे, गाणे, मुरडणे
मनात ती भरली
जशी गालिचावरुन
लावण्यवती या भूवर आली
केसांचा तो पिसारा
ओठ गुलाबी, गालावर खळी
जशी इंद्राच्या दरबारातील
उर्वशी या भूवर आली
डोळ्यात काजळ, नाकात नथनी
पायात पैंजण रुणझुणावी
जशी रंगमहालातील
नर्तकी या भूवर आली
कमरेला कमरपट्टा, गळ्यामधी हार
कानी कुंडले, पायी तोरड्या
जशी सौंदर्याची खाण
सुंदरा या भूवर आली
- देवनाथ गंडाटे
24 मे 2017
------------------
14, मे 2017
४. मंजूळ गाणी
आकाशात ढग आले
बरसल्या सरीवर सरी
निष्पर्ण झाडाला पालवी फुटली
वनराई हिरवा शालू नेसून आली
पानापानांतून पावसाचे थेंब
फांद्या फांद्यांना भिजवित
जमिनीवरून वाहू लागले
मातीतून सुगंध दरवळला
पक्ष्यांचा चिवचिवाट कानी
गात मंजूळ गाणी
हवेत गार वारा सुटला
साऱ्यांनी निसर्गाचा आनंद लुटला...
- देवनाथ गंडाटे
23 मे 2017
---------------------
५. माझ्या आठवणीच तुझ्या सोबती...
बांधूनी शिदोरी नेईन
तुझ्या सहवासाच्या स्मृती
नसेन या जगी मी जेव्हा
माझ्या आठवणीच तुझ्या सोबती...
वाटलंच तुला कधी एकटं
तर पाने पलटव कवितेची
संवाद साधीन त्यातूनी
सांगेन हालहवाल या लोकी....
मला एकटं वाटलं तर
येईन मी तुझ्या स्वप्नात
थांबेन मी तुझ्या उशाशी
झोपवेन तुला गात गीत....
जाताना उठविणार नाही
पहाटेच्या साखरझोतून
पण, पुन्हा नक्की येण्याची
हमी देऊन जाईन...
- देवनाथ गंडाटे
12 मे 2017
-----------------------------
६. फूलपाखरू होऊनी मी फिरावे
उंच उंच घ्यावी भरारी
दूर निळ्या आकाशी
ढगांच्या कुशीत निजावे
हात तुझा हातात घेऊनी
फूलपाखरू होऊनी मी फिरावे
तुझ्या अवतीभवती.....
सांजेला तू हाक द्यावी
अहो, या ना इकडे म्हणावी
बुडत्या सूर्याची किरणे
दोघांनाही स्पर्श करावी
फूलपाखरू होऊनी मी फिरावे
तुझ्या अवतीभवती.....
अंधा-या रातीला चाँद यावा
सोबत घेऊन चांदण्या
त्यांच्यासोबतीने खेळखेळावे
तुला शोधाया लपाछपी
फूलपाखरू होऊनी मी फिरावे
तुझ्या अवतीभवती....
पहाटेला गार वारा यावा
हलवित वृक्षाईच्या फांद्या
तू माझ्यात- मी तुझ्यात
घट्ट बिलगुनी जावे
फूलपाखरू होऊनी मी फिरावे
तुझ्या अवतीभवती....
- देवनाथ गंडाटे
काव्यशिल्प
ता. ४ एप्रिल २०१७
काव्यशिल्प
ता. 23 एप्रिल 2017
२. या भूवर अवतरली
पाहिले प्रथम तेव्हा
नजरेत ती भरली
जशी अवकाशातून
परी या भूवर अवतरली
नाचणे, गाणे, मुरडणे
मनात ती भरली
जशी गालिचावरुन
लावण्यवती या भूवर आली
केसांचा तो पिसारा
ओठ गुलाबी, गालावर खळी
जशी इंद्राच्या दरबारातील
उर्वशी या भूवर आली
डोळ्यात काजळ, नाकात नथनी
पायात पैंजण रुणझुणावी
जशी रंगमहालातील
नर्तकी या भूवर आली
कमरेला कमरपट्टा, गळ्यामधी हार
कानी कुंडले, पायी तोरड्या
जशी सौंदर्याची खाण
सुंदरा या भूवर आली
- देवनाथ गंडाटे
24 मे 2017
------------------
३. या हिरवाईचा मी पहरेकरी
हिरव्या पानातून फुलला निसर्ग
गुलाबी फुलातून आला सुगंध
काटेरी वनातही दिसला सौंदर्य
या हिरवाईचा मी पहरेकरी
जगविन मी, फुलविन मी
हा निसर्ग….
माती मातीचा गंध वेगळा
फुला फूलांचा देठ निराळा
बहुरंगी झाडांचा रुप आगळा
या हिरवाईचा मी पहरेकरी
जगविन मी, फुलविन मी
हा निसर्ग….
फुलपाखरू परागकणाभोवती
चाखया गोडवा फिरे मधमाशी
फांदी बहरली ही आकाशी
या हिरवाईचा मी पहरेकरी
जगविन मी, फुलविन मी
हा निसर्ग….
– देवनाथ गंडाटे
काव्यशिल्प
नागपूर
आकाशात ढग आले
बरसल्या सरीवर सरी
निष्पर्ण झाडाला पालवी फुटली
वनराई हिरवा शालू नेसून आली
पानापानांतून पावसाचे थेंब
फांद्या फांद्यांना भिजवित
जमिनीवरून वाहू लागले
मातीतून सुगंध दरवळला
पक्ष्यांचा चिवचिवाट कानी
गात मंजूळ गाणी
हवेत गार वारा सुटला
साऱ्यांनी निसर्गाचा आनंद लुटला...
- देवनाथ गंडाटे
23 मे 2017
---------------------
५. माझ्या आठवणीच तुझ्या सोबती...
बांधूनी शिदोरी नेईन
तुझ्या सहवासाच्या स्मृती
नसेन या जगी मी जेव्हा
माझ्या आठवणीच तुझ्या सोबती...
वाटलंच तुला कधी एकटं
तर पाने पलटव कवितेची
संवाद साधीन त्यातूनी
सांगेन हालहवाल या लोकी....
मला एकटं वाटलं तर
येईन मी तुझ्या स्वप्नात
थांबेन मी तुझ्या उशाशी
झोपवेन तुला गात गीत....
जाताना उठविणार नाही
पहाटेच्या साखरझोतून
पण, पुन्हा नक्की येण्याची
हमी देऊन जाईन...
- देवनाथ गंडाटे
12 मे 2017
-----------------------------
६. फूलपाखरू होऊनी मी फिरावे
उंच उंच घ्यावी भरारी
दूर निळ्या आकाशी
ढगांच्या कुशीत निजावे
हात तुझा हातात घेऊनी
फूलपाखरू होऊनी मी फिरावे
तुझ्या अवतीभवती.....
सांजेला तू हाक द्यावी
अहो, या ना इकडे म्हणावी
बुडत्या सूर्याची किरणे
दोघांनाही स्पर्श करावी
फूलपाखरू होऊनी मी फिरावे
तुझ्या अवतीभवती.....
अंधा-या रातीला चाँद यावा
सोबत घेऊन चांदण्या
त्यांच्यासोबतीने खेळखेळावे
तुला शोधाया लपाछपी
फूलपाखरू होऊनी मी फिरावे
तुझ्या अवतीभवती....
पहाटेला गार वारा यावा
हलवित वृक्षाईच्या फांद्या
तू माझ्यात- मी तुझ्यात
घट्ट बिलगुनी जावे
फूलपाखरू होऊनी मी फिरावे
तुझ्या अवतीभवती....
- देवनाथ गंडाटे
काव्यशिल्प
ता. ४ एप्रिल २०१७
७. नसतेस जेव्हा तू आॅनलाइन
जीव कासावीस होतं
नसतेस जेव्हा तू आॅनलाइन
तेव्हाचच बरं होतं,
तु द्यायची डोळ्यांनी लाइन
तेव्हा तू होकार
लवकरच कळविला
आता तर रोज पाठविताचरिप्लायला उशीर झाला
तेव्हा गुड मार्निंग-नाइट नव्हतं
पुन्हा कधी भेटशिल, इतकच ठरायचं
आता तर स्टेटस, अपडेट
लाइव्ह कळवतं
पण,
जीव कासावीस होतं....
नसतेस जेव्हा तू आॅनलाइन
तेव्हा सा-या आठवणी
मनात सांभाळून ठेवल्या
आता चॅटिंग मॅसेज
व्हाॅट्सअॅपवरच सेव्ह झाल्या
तेव्हाचा तुझा पासपोर्ट
फोटो पॅकेटात जपून होता
आता तुझ्याच सेल्फींनी
मोबाईल मेमोरी फूल्ल झालाय
पण,
जीव कासावीस होतं...
नसतेस जेव्हा तू आॅनलाइन
तेव्हा चिठ्ठी द्यायचो
मनातल्या भावना लिहायचो
आता दररोजच मॅसेज सेंड होतं
क्षणाक्षणाची खबर मिळते
तुझ्या- माझ्या बर्थ डेला
बाहेर कुठेतरी भेटायचो
आता केकच्या इमोजीतून
दोघेच करतो सेलिब्रेशन
पण,
जीव कासावीस होतं....
नसतेस जेव्हा तू आॅनलाइन
- देवनाथ गंडाटे
काव्यशिल्प
------------------------------
८. तिच्यासाठी
मी जागतोय तिच्यासाठी
तिच्या स्वप्नांसाठी
तिच्या उद्यासाठी
काळरात्री एकटात
होऊन पहारेकरी
रातकिड्यांच्या प्रकाशात
त्या चोरट्या भेटीत
कसे न्याहाळावे तिचे रुप
साठवूनी किती साठवावे
हृदयातील भितीचे हे ठोके
तिच्यासाठी
ठोके वाजे घड्याळाचे
जसे टिकटिक वाजे डोक्यात
इतके तासहीे क्षणभर वाटे
थांबावे सेकंद- मिनिट काटे
तिच्यासाठी
तिचा सहवास लाभावा
कधी इकडे, कधी तिकडे
फिरतो वनवन, कधी मनोमन
जीव हा व्याकुळ
तिच्यासाठी...
का लागला तिचा लळा
हा मन साधाभोळा
इश्कात गुंतला,
अन् बोलला जुईच्या कळीला,
मी घायाळ तरूण बावरा
बांधेन स्नेहबंध तिच्यासाठी
- देवनाथ गंडाटे
(काव्यशिल्प)
--------------------
९. दम लागतं
आय लव्ह यू
म्हणायलाही दम लागतं
विचार केला तरीही
छातीत धडधड होतं
कुणी इलू इलू म्हटलं
तर कुणी वन फोर थ्री
ढाई अक्षर प्रेमासाठी
खिती खटाटोप
त्याचा अन् तिचाही
कुणी पटवली म्हणतात
तर कुणी तिच्यावर मरतोय
कुणी लाइन मारतात
कुणी तिच्यावर झुरतातही
आधी ओळख, मग मैत्री
मी तुझ्यावर प्रेम करतेय
म्हणत, ती एक दुजे साठी
आणाभाका घेतात...
जात- धर्म, रुढी परंपरांच्या
बेड्या आडव्या येतात
सैराट होण्यासाठी ते
पळूनही जातात
कुठेतरी दूरवर मंदिरात
गळ्यात माळ पडते
तिच्या कपाळावर कुंकू
हातात हिरवा चुडा दिसतं
संसारिक सुखाच्या वेलीत
सुख दु:खाचे धडे गिरवित
गरिबीतून श्रीमंतीकडे
जाण्याचा गणितही मांडतात
कष्ठाला फळ मिळतं
दोन आणि एक तीन
नव पोरं आनंद देऊन येतं
तरीही आय लव्ह यू
म्हणायला दम लागत....
काय जादू आहे या शब्दात
दोन जीव एकत्र येतात
तिस-या जीवासाठी
तरीही आय लव्ह यू
म्हणायला दम लागत....
- देवनाथ गंडाटे
काव्यशिल्प
----------------------
१०. तुझी माझी मैत्री
जन्मोजन्मीसाठी बांधली
म्हणूनच तू माझ्या
पाठोपाठ जन्मली
हातात हात घेत
बालपण गेले
तुझ्याच सोबतीने
शिक्षणही झाले
आता तू आपल्या
संसारिक जीवनात
अन् मी माझ्या
ही मैत्री कुण्या
बहिणी- बहिणीहून
कमी नाही
म्हणूनच तुझी आठवण
केल्याशिवाय दिवस जात नाही
तू माझ्या मना, मी तुझ्या मना
अशाच मैत्रिणी जया - भावना
- देवनाथ गंडाटे
काव्यशिल्प
-------------------------------
११. पहिली भेट
तुझी पहिली भेट घेताना
हृदयात धड धड होती
तरीही तुला बघण्याची
मनात हूर हूर होती
मी आलो तेव्हा
तू स्वागताला उभी होती
'आलात तुम्ही... '
हळूवार आवाज
कानावर पडला
माझ्या तोंडून शब्दच निघेना
निशब्द होऊन
तुझ्याच मागोमाग
पहिली पायरी चढली
काय बोलावं...
कसं बोलावं....
सुरवात कशी करावी
कळेनासं झालं होत,
पण, कसाबसा
पहिला शब्द ओठावर आला
'तू खूप वेळ वाट बघितली का?'
'नाही हो....
माझ्याच पाठी
तुम्ही आलात',
ती बोलली....
आणि कसे आहात...
कसं चाललंय
म्हणत, गप्पा रंगल्या
कुण्या अनोळखीशी
गप्पात रमलोय
असं वाटतच नव्हतं
डोळ्यात साठवून घेताना
पापण्याही झुकत नव्हत्या
ते गुलाबी गाल
गालावर खळी
आेठावर स्मीत
अन् केसांचा पिसारा
भारावून सोडलं होतं
या नात्याला नावही नव्हते
पण, मनात निर्मळता होती
भराभरा वेळ निघून गेला
घड्याळ ठोके देत होती
चला निघायचं आता
म्हणायलाही मन जड होत होतं
पण, जड मनाने
रजा घेतली
त्यातच पुढल्या भेटीचं ठरलं....
- देवनाथ गंडाटे
10 फेब्रुवारी २०१७
------------------------------
१२. मोसम की तरहा
थंडी कमी झाली
पानगळ दिसली
पानगळ....
उन्हं तापली
धरती कोपली
ती कोपली आणि
धरणीकंपच झालं
वारा सुटला..
सुसाट्याचा
न थांबणारा
सरीवर सरी
न थांबणारा पाऊस
महाप्रलय
पुन्हा जीवाची कासावीस
काळ.... काळोख
ती देखील बदलली
मोसम की तरहा
- देवनाथ गंडाटे
----------------------------
१३. काव्यशिल्प
नाही तरी मी मरणारच आहे
मरण्यापूर्वी वाचून घेतो
वाचता वाचता काही क्षण
तुझ्यासाठीही जगून घेतो!
नाहीतरी मी मरणारच आहे
मरण्यापूर्वी लिहून घेतो
लिहता लिहता काही शब्द
काव्यशिल्प तुला देऊन जातो!!
देवनाथ गंडाटे
(काव्यशिल्प©)
----------------------------
१४. प्रत्येकाची एक ती असते
आयुष्याच्या वळणावर
प्रत्येकाची एक ती असते
बालवाडीत हातात हात धरणारी
शाळेतल्या वर्गात चोरून बघणारी
ट्यूशन क्लासमध्ये जाताना भेटणारी
शेजारची, आपलेपणा समजणारी
बसमध्ये दररोज दिसणारी
गावी गेल्यावर भेटणारी
काॅलेजमध्ये हाक मारणारी
नोटबुकातून चिठ्ठी लिहणारी
हाॅटेलमध्ये पार्टी मागणारी
सिनेमाचं तिकिट काढणारी
कधी भेट झालीच तर कसं आहेस
आपुलकीनं विचारणारी
कालपर्यंत मॅसेज पाठविणारी
आणि आता व्हाॅट्सअॅपवर चॅटिंग करणारी!
प्रत्येकाची एक ती असते
अन् पुन्हा प्रश्न पडतो
सध्या ती काय करते?
- देवनाथ गंडाटे
(काव्यशिल्प ©)
---------------------
१५. लावणी
हाती घातली हिरवी बांगडी
नेसली हिरवीच साडी
कशी दिसते सांगा ना राया
आपली दोघांची जोडी !
-------
हातावर रंगली मेंदी
लावते कुंकू कपाळी
केसात माळला गजरा मी
तुम्हास लावण्या लाडीगोडी
कशी दिसते सांगा ना राया
आपली दोघांची जोडी!
-------
अंथरुणावर पसरला हा गंध
मोगरा, गुलाबाच्या पाकळ्या
लइ दिसानं, लयभारी
करूया प्रेमाची वारी
कशी दिसते सांगा ना राया
आपली दोघांची जोडी!
------
स्पर्श नवा या हाताला
हळूच चोरून घेते मुका
इश्श...
कशी दिसते सांगा ना राया
आपली दोघांची जोडी !
- देवनाथ गंडाटे
(काव्यशिल्प)
२० जानेवारी २०१७
---------------------------
१६.
"क्षणामागून क्षण गेले
दिवसामागून दिवस
बघता बघता वर्ष संपले
अन आज माझा वाढदिवस
- देवनाथ गंडाटे
(काव्यशिल्प)
१४ डिसेंबर २००६
---------------------------
१७. रिस्टार्ट
आयुष्यात चुकलं तर
कन्ट्रोल झेड होत नाय
कन्ट्रोल एफ दाबूनही
हरवलेलं सापडत नाय
एंटर मारून मारून
थकलो राव मी
मूड रिफ्रेशसाठी
दाबतो एफ5ची की
आतातरी चालेल
आयुष्याचा संगणक
म्हणूनच करतोय
शटडाउन, अन् रिस्टार्ट
- देवनाथ गंडाटे
(काव्यशिल्प©)
१५ जानेवारी २०१७
------------------------
१८. पुन्हा जगायचं...
तुम्ही जेव्हा गुड नाइट म्हणता
तेव्हा मी जागाच असतो
आणि
जेव्हा मी गुड नाइट म्हणतो
तेव्हा तुम्ही झोपून उठलेले असता
तुम्हचं जेवण आटोपते
तेव्हा आम्ही चहा घेतो
अाता सवयच झाली
उशिरा झोपून उठण्याची
मोबाईलची बॅटरी संपली की
पुन्हा चॅर्जींग करण्याची
आयुष्याचं असच आहे
थकलं की रिचार्ज मारायचं
बॅलेन्स संपेपर्यंत...
पुन्हा जगायचं...
- देवनाथ गंडाटे
काव्यशिल्प™
------------------------
१९.
पाऊस पडला की
आठवण येते शाळेची
दप्तराची थैली
अन बालभारतीची
ओले शरीर, केसातील पाणी
अन रस्त्यावरून घसरलेल्या सायकलची
माखलेले कपडे अन
रागावलेल्या गुरुजीची
- देवनाथ गंडाटे
(काव्यशिल्प©)
------------------------
२०. परतूनी ये माहेरा
सांज झाली रे पाखरा
परतूनी ये माहेरा
गुजगोष्टी सांगू दिनभराच्या
या झाडावरती बसूनी ।
भरविन घास तुझ्या चोचित ।
पाजेन पाणी ओन्जलीन ।
गायिन अंगाई गित
निज़शिल निवांत , माझ्या कुशित
- देवनाथ गंडाटे
(काव्यशिल्प©)
जून २००२
------------------------
२१. विदर्भ माझा
भारत भूमिच्या गर्भात
जन्मला विदर्भ माझा ।
आपुलकी, प्रेम अन गौरवाने
करतो गाजावाजा ।।
कुशित विदर्भाच्या
काल्या हि-याची खाण ।
खुणावतो हिरवा मालरान ।
मंजुल स्वरांचा पक्षी करी किलबिलाट ।
नदी, नाल्यांतून वाहे पाणी अफाट ।
राष्ट्रसंत, गाडगेबाबा नांदे गावागावांत ।
वाघाची डरकाली येई जंगलात ।
शेतकरी राबतो शेतात ।
पिकवी कापूस, सोयाबिन, भात ।
ऊर्जा अंगी तरीहि शोधतोय
विकासाची प्रकाशवाट ।
असा माझा गौरवशाली विदर्भ ।
- देवनाथ गंडाटे
(काव्यशिल्प©)
एप्रिल २०१३
जीव कासावीस होतं
नसतेस जेव्हा तू आॅनलाइन
तेव्हाचच बरं होतं,
तु द्यायची डोळ्यांनी लाइन
तेव्हा तू होकार
लवकरच कळविला
आता तर रोज पाठविताचरिप्लायला उशीर झाला
तेव्हा गुड मार्निंग-नाइट नव्हतं
पुन्हा कधी भेटशिल, इतकच ठरायचं
आता तर स्टेटस, अपडेट
लाइव्ह कळवतं
पण,
जीव कासावीस होतं....
नसतेस जेव्हा तू आॅनलाइन
तेव्हा सा-या आठवणी
मनात सांभाळून ठेवल्या
आता चॅटिंग मॅसेज
व्हाॅट्सअॅपवरच सेव्ह झाल्या
तेव्हाचा तुझा पासपोर्ट
फोटो पॅकेटात जपून होता
आता तुझ्याच सेल्फींनी
मोबाईल मेमोरी फूल्ल झालाय
पण,
जीव कासावीस होतं...
नसतेस जेव्हा तू आॅनलाइन
तेव्हा चिठ्ठी द्यायचो
मनातल्या भावना लिहायचो
आता दररोजच मॅसेज सेंड होतं
क्षणाक्षणाची खबर मिळते
तुझ्या- माझ्या बर्थ डेला
बाहेर कुठेतरी भेटायचो
आता केकच्या इमोजीतून
दोघेच करतो सेलिब्रेशन
पण,
जीव कासावीस होतं....
नसतेस जेव्हा तू आॅनलाइन
- देवनाथ गंडाटे
काव्यशिल्प
------------------------------
८. तिच्यासाठी
मी जागतोय तिच्यासाठी
तिच्या स्वप्नांसाठी
तिच्या उद्यासाठी
काळरात्री एकटात
होऊन पहारेकरी
रातकिड्यांच्या प्रकाशात
त्या चोरट्या भेटीत
कसे न्याहाळावे तिचे रुप
साठवूनी किती साठवावे
हृदयातील भितीचे हे ठोके
तिच्यासाठी
ठोके वाजे घड्याळाचे
जसे टिकटिक वाजे डोक्यात
इतके तासहीे क्षणभर वाटे
थांबावे सेकंद- मिनिट काटे
तिच्यासाठी
तिचा सहवास लाभावा
कधी इकडे, कधी तिकडे
फिरतो वनवन, कधी मनोमन
जीव हा व्याकुळ
तिच्यासाठी...
का लागला तिचा लळा
हा मन साधाभोळा
इश्कात गुंतला,
अन् बोलला जुईच्या कळीला,
मी घायाळ तरूण बावरा
बांधेन स्नेहबंध तिच्यासाठी
- देवनाथ गंडाटे
(काव्यशिल्प)
--------------------
९. दम लागतं
आय लव्ह यू
म्हणायलाही दम लागतं
विचार केला तरीही
छातीत धडधड होतं
कुणी इलू इलू म्हटलं
तर कुणी वन फोर थ्री
ढाई अक्षर प्रेमासाठी
खिती खटाटोप
त्याचा अन् तिचाही
कुणी पटवली म्हणतात
तर कुणी तिच्यावर मरतोय
कुणी लाइन मारतात
कुणी तिच्यावर झुरतातही
आधी ओळख, मग मैत्री
मी तुझ्यावर प्रेम करतेय
म्हणत, ती एक दुजे साठी
आणाभाका घेतात...
जात- धर्म, रुढी परंपरांच्या
बेड्या आडव्या येतात
सैराट होण्यासाठी ते
पळूनही जातात
कुठेतरी दूरवर मंदिरात
गळ्यात माळ पडते
तिच्या कपाळावर कुंकू
हातात हिरवा चुडा दिसतं
संसारिक सुखाच्या वेलीत
सुख दु:खाचे धडे गिरवित
गरिबीतून श्रीमंतीकडे
जाण्याचा गणितही मांडतात
कष्ठाला फळ मिळतं
दोन आणि एक तीन
नव पोरं आनंद देऊन येतं
तरीही आय लव्ह यू
म्हणायला दम लागत....
काय जादू आहे या शब्दात
दोन जीव एकत्र येतात
तिस-या जीवासाठी
तरीही आय लव्ह यू
म्हणायला दम लागत....
- देवनाथ गंडाटे
काव्यशिल्प
----------------------
१०. तुझी माझी मैत्री
जन्मोजन्मीसाठी बांधली
म्हणूनच तू माझ्या
पाठोपाठ जन्मली
हातात हात घेत
बालपण गेले
तुझ्याच सोबतीने
शिक्षणही झाले
आता तू आपल्या
संसारिक जीवनात
अन् मी माझ्या
ही मैत्री कुण्या
बहिणी- बहिणीहून
कमी नाही
म्हणूनच तुझी आठवण
केल्याशिवाय दिवस जात नाही
तू माझ्या मना, मी तुझ्या मना
अशाच मैत्रिणी जया - भावना
- देवनाथ गंडाटे
काव्यशिल्प
-------------------------------
११. पहिली भेट
तुझी पहिली भेट घेताना
हृदयात धड धड होती
तरीही तुला बघण्याची
मनात हूर हूर होती
मी आलो तेव्हा
तू स्वागताला उभी होती
'आलात तुम्ही... '
हळूवार आवाज
कानावर पडला
माझ्या तोंडून शब्दच निघेना
निशब्द होऊन
तुझ्याच मागोमाग
पहिली पायरी चढली
काय बोलावं...
कसं बोलावं....
सुरवात कशी करावी
कळेनासं झालं होत,
पण, कसाबसा
पहिला शब्द ओठावर आला
'तू खूप वेळ वाट बघितली का?'
'नाही हो....
माझ्याच पाठी
तुम्ही आलात',
ती बोलली....
आणि कसे आहात...
कसं चाललंय
म्हणत, गप्पा रंगल्या
कुण्या अनोळखीशी
गप्पात रमलोय
असं वाटतच नव्हतं
डोळ्यात साठवून घेताना
पापण्याही झुकत नव्हत्या
ते गुलाबी गाल
गालावर खळी
आेठावर स्मीत
अन् केसांचा पिसारा
भारावून सोडलं होतं
या नात्याला नावही नव्हते
पण, मनात निर्मळता होती
भराभरा वेळ निघून गेला
घड्याळ ठोके देत होती
चला निघायचं आता
म्हणायलाही मन जड होत होतं
पण, जड मनाने
रजा घेतली
त्यातच पुढल्या भेटीचं ठरलं....
- देवनाथ गंडाटे
10 फेब्रुवारी २०१७
------------------------------
१२. मोसम की तरहा
थंडी कमी झाली
पानगळ दिसली
पानगळ....
उन्हं तापली
धरती कोपली
ती कोपली आणि
धरणीकंपच झालं
वारा सुटला..
सुसाट्याचा
न थांबणारा
सरीवर सरी
न थांबणारा पाऊस
महाप्रलय
पुन्हा जीवाची कासावीस
काळ.... काळोख
ती देखील बदलली
मोसम की तरहा
- देवनाथ गंडाटे
----------------------------
१३. काव्यशिल्प
नाही तरी मी मरणारच आहे
मरण्यापूर्वी वाचून घेतो
वाचता वाचता काही क्षण
तुझ्यासाठीही जगून घेतो!
नाहीतरी मी मरणारच आहे
मरण्यापूर्वी लिहून घेतो
लिहता लिहता काही शब्द
काव्यशिल्प तुला देऊन जातो!!
देवनाथ गंडाटे
(काव्यशिल्प©)
----------------------------
१४. प्रत्येकाची एक ती असते
आयुष्याच्या वळणावर
प्रत्येकाची एक ती असते
बालवाडीत हातात हात धरणारी
शाळेतल्या वर्गात चोरून बघणारी
ट्यूशन क्लासमध्ये जाताना भेटणारी
शेजारची, आपलेपणा समजणारी
बसमध्ये दररोज दिसणारी
गावी गेल्यावर भेटणारी
काॅलेजमध्ये हाक मारणारी
नोटबुकातून चिठ्ठी लिहणारी
हाॅटेलमध्ये पार्टी मागणारी
सिनेमाचं तिकिट काढणारी
कधी भेट झालीच तर कसं आहेस
आपुलकीनं विचारणारी
कालपर्यंत मॅसेज पाठविणारी
आणि आता व्हाॅट्सअॅपवर चॅटिंग करणारी!
प्रत्येकाची एक ती असते
अन् पुन्हा प्रश्न पडतो
सध्या ती काय करते?
- देवनाथ गंडाटे
(काव्यशिल्प ©)
---------------------
१५. लावणी
हाती घातली हिरवी बांगडी
नेसली हिरवीच साडी
कशी दिसते सांगा ना राया
आपली दोघांची जोडी !
-------
हातावर रंगली मेंदी
लावते कुंकू कपाळी
केसात माळला गजरा मी
तुम्हास लावण्या लाडीगोडी
कशी दिसते सांगा ना राया
आपली दोघांची जोडी!
-------
अंथरुणावर पसरला हा गंध
मोगरा, गुलाबाच्या पाकळ्या
लइ दिसानं, लयभारी
करूया प्रेमाची वारी
कशी दिसते सांगा ना राया
आपली दोघांची जोडी!
------
स्पर्श नवा या हाताला
हळूच चोरून घेते मुका
इश्श...
कशी दिसते सांगा ना राया
आपली दोघांची जोडी !
- देवनाथ गंडाटे
(काव्यशिल्प)
२० जानेवारी २०१७
---------------------------
१६.
"क्षणामागून क्षण गेले
दिवसामागून दिवस
बघता बघता वर्ष संपले
अन आज माझा वाढदिवस
- देवनाथ गंडाटे
(काव्यशिल्प)
१४ डिसेंबर २००६
---------------------------
१७. रिस्टार्ट
आयुष्यात चुकलं तर
कन्ट्रोल झेड होत नाय
कन्ट्रोल एफ दाबूनही
हरवलेलं सापडत नाय
एंटर मारून मारून
थकलो राव मी
मूड रिफ्रेशसाठी
दाबतो एफ5ची की
आतातरी चालेल
आयुष्याचा संगणक
म्हणूनच करतोय
शटडाउन, अन् रिस्टार्ट
- देवनाथ गंडाटे
(काव्यशिल्प©)
१५ जानेवारी २०१७
------------------------
१८. पुन्हा जगायचं...
तुम्ही जेव्हा गुड नाइट म्हणता
तेव्हा मी जागाच असतो
आणि
जेव्हा मी गुड नाइट म्हणतो
तेव्हा तुम्ही झोपून उठलेले असता
तुम्हचं जेवण आटोपते
तेव्हा आम्ही चहा घेतो
अाता सवयच झाली
उशिरा झोपून उठण्याची
मोबाईलची बॅटरी संपली की
पुन्हा चॅर्जींग करण्याची
आयुष्याचं असच आहे
थकलं की रिचार्ज मारायचं
बॅलेन्स संपेपर्यंत...
पुन्हा जगायचं...
- देवनाथ गंडाटे
काव्यशिल्प™
------------------------
१९.
पाऊस पडला की
आठवण येते शाळेची
दप्तराची थैली
अन बालभारतीची
ओले शरीर, केसातील पाणी
अन रस्त्यावरून घसरलेल्या सायकलची
माखलेले कपडे अन
रागावलेल्या गुरुजीची
- देवनाथ गंडाटे
(काव्यशिल्प©)
------------------------
२०. परतूनी ये माहेरा
सांज झाली रे पाखरा
परतूनी ये माहेरा
गुजगोष्टी सांगू दिनभराच्या
या झाडावरती बसूनी ।
भरविन घास तुझ्या चोचित ।
पाजेन पाणी ओन्जलीन ।
गायिन अंगाई गित
निज़शिल निवांत , माझ्या कुशित
- देवनाथ गंडाटे
(काव्यशिल्प©)
जून २००२
------------------------
२१. विदर्भ माझा
भारत भूमिच्या गर्भात
जन्मला विदर्भ माझा ।
आपुलकी, प्रेम अन गौरवाने
करतो गाजावाजा ।।
कुशित विदर्भाच्या
काल्या हि-याची खाण ।
खुणावतो हिरवा मालरान ।
मंजुल स्वरांचा पक्षी करी किलबिलाट ।
नदी, नाल्यांतून वाहे पाणी अफाट ।
राष्ट्रसंत, गाडगेबाबा नांदे गावागावांत ।
वाघाची डरकाली येई जंगलात ।
शेतकरी राबतो शेतात ।
पिकवी कापूस, सोयाबिन, भात ।
ऊर्जा अंगी तरीहि शोधतोय
विकासाची प्रकाशवाट ।
असा माझा गौरवशाली विदर्भ ।
- देवनाथ गंडाटे
(काव्यशिल्प©)
एप्रिल २०१३
22. इश्काचा एकच प्याला
दूर निघून जाण्याचा तुझा इरादा
अन् माझा मंद प्रकाशात
इश्काचा एकच प्याला
एक एक घोट घेत
ओठावरची नशा पोटात घ्यावी
तुझ्या प्रेमात झिंग व्हावे?
तुझ्या प्रेमाच्या विरहात
सांजेपासूनच एकांताचा प्रवास सुरू होतो
सोबतीला तुझ्या प्रेमळ आठवणी
प्यालात बुडवून पितो
टाॅप टू बाॅटम थेंबनं थेंब
संपवून नशा उतरवितो अंगात
मग, थोडसं बरं वाटतं
दु:ख हलकं होतं
शेवटच्या घोटातही
प्यालात तू जलपरी होऊन येते
बस्स!! झालं खूप झालं आता निघ लवकर घरी….
तुझी कुणीतरी वाट बघत आहे, ती म्हणते…
मी अंधारात वाट शोधत
मी अंधारात वाट शोधत
नागमोडी वळण घेत
कसाबसा घरी पोहोचतो
सुखाची झोप घेण्यासाठी..
– देवनाथ गंडाटे
काव्यशिल्प