" जा रे माहेरी पाखरा....!"
माय धरनीच्या लेकरा...
माह्या मायेच्या पाखरा
उडत जारे.. माह्या घरा...
आवर तुहाला पसारा
माय धरनीच्या लेकरा...
माह्या मायेच्या पाखरा
उडत जारे.. माह्या घरा...
आवर तुहाला पसारा
दूरं व-हाड देशातं
चिले पिले बैनं भाऊ
दूरं पोटासाठी आलो
कसा भेटीसाठी जाऊ..?
मायं बापं चिले पिले
तथी झुरतं राह्यती
आसु भरल्या डोयानं
वाटं माह्याली पाह्यती
हाये माह्या कुटीपाशी
हवेल्यारे.. दाटं दाटं
उतर झोपडी पाहूनं
बांध बापा खूणगाठं
खूणं माह्या आंगणाची
हिर्वी तुळसन् वेली
हाये खोप्याम्दी पाखरं
गाती व-हाडची बोली
मारं आभायी भरारी
करं बापा आता घाई
ठेवं ओयखं घराची
दारी हंबरत्या गायी
माह्या तणाच्या घराची
अशी उघडीचं ताटी
मैना उभीचं दारातं
आतुरं रे भेटीसाठी
पाह्य सर्व्या खानाखूना
मंग आंगनी उतरं
सुखी हाये लेकं तुहा
सांग मायले सत्वरं
मले झुरतं पाह्यलं
खोटं तरीबी हासजो
माह्या मथा-या बापाचे
आसु हासतं पुसजो
माह्या बैनाईची राखी
पाखरा बांधून घेजो
आरतीतं ओवाळनी
माहे दोनं आसु देजो
गोष्टी राघूच्या मनाच्या
माह्या मैनेले सांगजो
थोडं तिचं गोडं हासू
संग नेयाले मांगजो
पाखरा तुले पाहून
याद माह्यी साह्यतीनं
सारे मायेचे पाखरं
मले तुह्यातं पाह्यतीनं
गरिबाची चून रोटी
बापा हासतचं घेजो
माहा एकं एकं मुका
माह्या लेकराले देजो
घेता निरोपं सुखाचा
सत्वर वापस येजो
माह्या झुकत्या शिराचा
सा-या रामं रामं देजो
(व-हाड कवी.)
का.रा.चव्हाण,यावली(श).
तालुका.जिल्हाःअमरावती
८५५२८३३८३९
चिले पिले बैनं भाऊ
दूरं पोटासाठी आलो
कसा भेटीसाठी जाऊ..?
मायं बापं चिले पिले
तथी झुरतं राह्यती
आसु भरल्या डोयानं
वाटं माह्याली पाह्यती
हाये माह्या कुटीपाशी
हवेल्यारे.. दाटं दाटं
उतर झोपडी पाहूनं
बांध बापा खूणगाठं
खूणं माह्या आंगणाची
हिर्वी तुळसन् वेली
हाये खोप्याम्दी पाखरं
गाती व-हाडची बोली
मारं आभायी भरारी
करं बापा आता घाई
ठेवं ओयखं घराची
दारी हंबरत्या गायी
माह्या तणाच्या घराची
अशी उघडीचं ताटी
मैना उभीचं दारातं
आतुरं रे भेटीसाठी
पाह्य सर्व्या खानाखूना
मंग आंगनी उतरं
सुखी हाये लेकं तुहा
सांग मायले सत्वरं
मले झुरतं पाह्यलं
खोटं तरीबी हासजो
माह्या मथा-या बापाचे
आसु हासतं पुसजो
माह्या बैनाईची राखी
पाखरा बांधून घेजो
आरतीतं ओवाळनी
माहे दोनं आसु देजो
गोष्टी राघूच्या मनाच्या
माह्या मैनेले सांगजो
थोडं तिचं गोडं हासू
संग नेयाले मांगजो
पाखरा तुले पाहून
याद माह्यी साह्यतीनं
सारे मायेचे पाखरं
मले तुह्यातं पाह्यतीनं
गरिबाची चून रोटी
बापा हासतचं घेजो
माहा एकं एकं मुका
माह्या लेकराले देजो
घेता निरोपं सुखाचा
सत्वर वापस येजो
माह्या झुकत्या शिराचा
सा-या रामं रामं देजो
(व-हाड कवी.)
का.रा.चव्हाण,यावली(श).
तालुका.जिल्हाःअमरावती
८५५२८३३८३९