लक्षणीय
हा २७ वर्षाचा खामगावचा तरुण गाण्याचं करिअर करण्यासाठी मुंबईत येतो आणि संधी मिळताच थेट आफ्रिका गाठतो आणि या दौ-यात केनिया, युगांडा आणि टांझानियात ४९ गाण्याचे कार्यक्रम करतो आणि साल ऐकाल तर आणखी थक्क व्हाल. १९३६...!
यावर आपला चटकन विश्वास नाही ना बसत! पुढे मग अमेरिकेत जाऊन तिथल्या रेडिओवर आणि विद्यापीठात भारतीय शास्त्रीय संगीतावर भरभरून बोलतो हेही पटवून घ्यायला जड जातं. पण हे सत्य आहे कारण हे त्यांनी मला स्वतःला सांगितलं आहे. कारण मी त्यांच्याकडेच पेइंग गेस्ट म्हणून ४ वर्षे राहत होतो आणि त्या काळात अनेक वेळा झालेल्या गप्पातून त्यांनी मला संगीत जगतातील अदभूत वाटाव्यात अशा अनेक आठवणी सांगितल्या.
रमाकांत रुपजी या एच.एम.व्ही.च्या वरिष्ठ अधिका-याच्या सांगण्यावरून ४ पदं गाण्यासाठी हा तरुण एच.एम.व्ही.स्टुडिओत गेला आणि चक्क १४ सुमधुर रचना गाऊनच् बाहेर पडला ...
यांच्या गाण्याचं वैशिष्टय हे की यांनी कवितेचं कोवळेपण जपत तिला रसिकांसमोर नेलं. तिचं गाणं न करता तिला हितगूजाचा स्पर्श दिला आणि मराठी संगीत विश्वाला पहिला वहिला भावगीत गायक मिळाला. मराठी भाषेतलं पाहिलं युगुल गीतही यांनीच सादर केलं - सहगायिका होत्या गंगूबा
ई हनगळ.
या गायकानं वकिलीची सनद घेतली होती पण काळा कोट न चढवता एच.एम.व्ही.ची धुरा सांभाळून गानरसिकांवर यांनी उपकारच केले.
बडे गुलामअली खा, रविशंकर, भीमसेन, जसराज, रा मनारायण, कुमार
गंधर्व अशा अनेक दिग्गजांच्या स्वरांचा अनमोल ठेवा त्यांनी तबकडीच्या
माध्यमातून चिरंतन केला हे त्यांचं ऋण न फिटण्यासारखं आहे. ‘अंडरस्टँ डिंग इंडियन म्युझिक’ हा त्यांचा इंग्रजी ग्रंथ हा भारतीय शास्त्रीय संगीताचा दस्तावेज मानला जातो.
“रानारानात गेली बाई शीळ” ... ही त्यांची १९३२ निघा लेली रेकॉर्ड गावागावात जिथे जिथे म्हणून ग्रामोफोन आहे तिथल्या ठेल्यावर उपाहारगृहात, माजघरात घुमत राहिली...
एका अर्थी या शिळेने मराठी गानरसिकांना, मराठी कवितेला साद घातली आणि या गोविंदाच्या स्वरस्पर्शाने ती भावगीत होऊन आजही मनामनात निनादत आहे.
जी.एन. जोशींच्या जन्मशताब्दी वर्षात म्हणजे २००९ साली, एच.एम.व्ही.ने जोशींना मानवंदना देण्यासाठी त्यांच्या आवाजातील इ.स. १९३५ सालापासूनच्या जुन्या ४३ भावगीतांच्या ( https://mr.wikipedia.org/wiki/ %E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5% E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4
) ‘स्वरगंगेच्या तीरी’ नावाचा दोन सीडींचा संच बाजारात आणला असून त्यात
जोशी यांच्या आवाजातील फिरत, लयकारी, खटके-मुरके याचा आस्वाद रसिकांना घेता
येतो.
मराठी भावगीताचे जनक गोविंदराव उर्फ जी. एन्. जोशी यांची आज ( मृत्यू २२ सप्टेंबर, १९९४ ) पुण्यतिथी ... प्रणाम !
@@@
रॉबर्ट बॉश
स्टीव्हन स्पिलबर्गचा 'शिंडलर्स लिस्ट' हा सिनेमा पाहिला तेव्हा अंगावर आलेला काटा बरेच दिवस तसाच होता ... हिटलरची अमानूष छळवणूक पाहून मन विदीर्ण झालं होतं पण शिंडलरची माणुसकी आणि त्यातून त्यांनी वाचवलेले ज्यू बांधव पाहून आशेचा एक दिलासाही त्यात मिळाला होता. यानेही नेमकं हेच केलं. जर्मनस्थित या उद्योजकाला युद्धसाहित्य तयार करायचं कंत्राट मिळालं आणि यानेही काही ज्यू बांधवांची सुटका केल्याचा इतिहास आहे.
एका धनाढ्य आणि सुशिक्षित शेतकऱ्याचा हा डझन मुलांमधला अकरावा मुलगा. लहानपणापासून हा यंत्रात रमायचा. मोडतोड करायचा खरा पण काही नवं बनवायचा. मग पुढं रीतसर शिक्षण घेत, शिकाऊ उमेदवार म्हणून काम करत एके दिवशी त्याने स्वतःची कंपनी काढली. त्यालाही आता १३० (१५ नोव्हेंबर,१८८६) वर्षं झाली. यंत्रउद्योगात त्याने संशोधन करून प्रथम वापरलेलं उपकरण त्याच्या उद्यमशीलतेचं आणि कष्टाचं फळ आहे.
विद्युत चुंबकीय तंत्रज्ञान वापरून तयार केलेला पहिला स्पार्क प्लग ही त्याची स्वयंचलित यंत्र उद्योगाला दिलेली एक क्रान्तिकारक भेट आहे. १९ व्या शतकाची पहाट होत असताना या उद्योजकाचा व्यवसाय जर्मनीच्या बाहेर यूरोप, अमेरिका अशा अनेक देशात पसरला. काळाबरोबर बदलत अनेक नव्या प्रणाली त्याने स्वयंचलित वाहन उद्योगात आणल्या. कामगार हेच उद्योग व्यवसायाचे प्राण असतात हे या सहृदय माणसाला ठाऊक होतं आणि म्हणून ८ तासांची कामाची पाळी ही पहिल्यांदा त्याने सुरू केली. महायुद्धाने त्याला बक्कळ पैसा दिला खरा पण याने तो गरजूना वाटून टाकला त्यातून इस्पितळ उभारलं. उद्योग उभारताना समाजाचाही तेवढयाच आत्मीयतेनं विचार करणारा हा जर्मन उद्योजक, अभियंता रॉ बर्ट बॉश, Bosch या जगप्रसिद्ध उद्योगाचा जनक ( जन्म २३ सप्टेंबर १८६१) : सादर प्रणाम !
- केशव साठये
keshavsathaye@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ ^^^^^^
हा २७ वर्षाचा खामगावचा तरुण गाण्याचं करिअर करण्यासाठी मुंबईत येतो आणि संधी मिळताच थेट आफ्रिका गाठतो आणि या दौ-यात केनिया, युगांडा आणि टांझानियात ४९ गाण्याचे कार्यक्रम करतो आणि साल ऐकाल तर आणखी थक्क व्हाल. १९३६...!
यावर आपला चटकन विश्वास नाही ना बसत! पुढे मग अमेरिकेत जाऊन तिथल्या रेडिओवर आणि विद्यापीठात भारतीय शास्त्रीय संगीतावर भरभरून बोलतो हेही पटवून घ्यायला जड जातं. पण हे सत्य आहे कारण हे त्यांनी मला स्वतःला सांगितलं आहे. कारण मी त्यांच्याकडेच पेइंग गेस्ट म्हणून ४ वर्षे राहत होतो आणि त्या काळात अनेक वेळा झालेल्या गप्पातून त्यांनी मला संगीत जगतातील अदभूत वाटाव्यात अशा अनेक आठवणी सांगितल्या.
रमाकांत रुपजी या एच.एम.व्ही.च्या वरिष्ठ अधिका-याच्या सांगण्यावरून ४ पदं गाण्यासाठी हा तरुण एच.एम.व्ही.स्टुडिओत गेला आणि चक्क १४ सुमधुर रचना गाऊनच् बाहेर पडला ...
यांच्या गाण्याचं वैशिष्टय हे की यांनी कवितेचं कोवळेपण जपत तिला रसिकांसमोर नेलं. तिचं गाणं न करता तिला हितगूजाचा स्पर्श दिला आणि मराठी संगीत विश्वाला पहिला वहिला भावगीत गायक मिळाला. मराठी भाषेतलं पाहिलं युगुल गीतही यांनीच सादर केलं - सहगायिका होत्या गंगूबा
या गायकानं वकिलीची सनद घेतली होती पण काळा कोट न चढवता एच.एम.व्ही.ची धुरा सांभाळून गानरसिकांवर यांनी उपकारच केले.
बडे गुलामअली खा, रविशंकर, भीमसेन, जसराज, रा
“रानारानात गेली बाई शीळ” ... ही त्यांची १९३२ निघा
एका अर्थी या शिळेने मराठी गानरसिकांना, मराठी कवितेला साद घातली आणि या गोविंदाच्या स्वरस्पर्शाने ती भावगीत होऊन आजही मनामनात निनादत आहे.
जी.एन. जोशींच्या जन्मशताब्दी वर्षात म्हणजे २००९ साली, एच.एम.व्ही.ने जोशींना मानवंदना देण्यासाठी त्यांच्या आवाजातील इ.स. १९३५ सालापासूनच्या जुन्या ४३ भावगीतांच्या ( https://mr.wikipedia.org/wiki/
मराठी भावगीताचे जनक गोविंदराव उर्फ जी. एन्. जोशी यांची आज ( मृत्यू २२ सप्टेंबर, १९९४ ) पुण्यतिथी ... प्रणाम !
@@@
रॉबर्ट बॉश
स्टीव्हन स्पिलबर्गचा 'शिंडलर्स लिस्ट' हा सिनेमा पाहिला तेव्हा अंगावर आलेला काटा बरेच दिवस तसाच होता ... हिटलरची अमानूष छळवणूक पाहून मन विदीर्ण झालं होतं पण शिंडलरची माणुसकी आणि त्यातून त्यांनी वाचवलेले ज्यू बांधव पाहून आशेचा एक दिलासाही त्यात मिळाला होता. यानेही नेमकं हेच केलं. जर्मनस्थित या उद्योजकाला युद्धसाहित्य तयार करायचं कंत्राट मिळालं आणि यानेही काही ज्यू बांधवांची सुटका केल्याचा इतिहास आहे.
एका धनाढ्य आणि सुशिक्षित शेतकऱ्याचा हा डझन मुलांमधला अकरावा मुलगा. लहानपणापासून हा यंत्रात रमायचा. मोडतोड करायचा खरा पण काही नवं बनवायचा. मग पुढं रीतसर शिक्षण घेत, शिकाऊ उमेदवार म्हणून काम करत एके दिवशी त्याने स्वतःची कंपनी काढली. त्यालाही आता १३० (१५ नोव्हेंबर,१८८६) वर्षं झाली. यंत्रउद्योगात त्याने संशोधन करून प्रथम वापरलेलं उपकरण त्याच्या उद्यमशीलतेचं आणि कष्टाचं फळ आहे.
विद्युत चुंबकीय तंत्रज्ञान वापरून तयार केलेला पहिला स्पार्क प्लग ही त्याची स्वयंचलित यंत्र उद्योगाला दिलेली एक क्रान्तिकारक भेट आहे. १९ व्या शतकाची पहाट होत असताना या उद्योजकाचा व्यवसाय जर्मनीच्या बाहेर यूरोप, अमेरिका अशा अनेक देशात पसरला. काळाबरोबर बदलत अनेक नव्या प्रणाली त्याने स्वयंचलित वाहन उद्योगात आणल्या. कामगार हेच उद्योग व्यवसायाचे प्राण असतात हे या सहृदय माणसाला ठाऊक होतं आणि म्हणून ८ तासांची कामाची पाळी ही पहिल्यांदा त्याने सुरू केली. महायुद्धाने त्याला बक्कळ पैसा दिला खरा पण याने तो गरजूना वाटून टाकला त्यातून इस्पितळ उभारलं. उद्योग उभारताना समाजाचाही तेवढयाच आत्मीयतेनं विचार करणारा हा जर्मन उद्योजक, अभियंता रॉ
- केशव साठये
keshavsathaye@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^