♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


उषा वाणी

किना-याचे मनोगत
वाहती ज्ञानगंगाच तुझे हाती
मी तर काठावरची किंचीत रेती
      तू कर्मयोगीनी धावत असते
     मी  स्थितप्रज्ञ निरखीत असते
तुझे नी माझे अभंग नाते
सौरभैरही. न तुज होउ देते
    तुझ्या ओलाव्यावर जीवनमाझे
   माझ्या अस्तित्वावर संगीत तुझे
ओढ सागराची धावत तू असते
मी इथेच नभाला जीवन मागते
  तुज तमा न काठावरच्या सृृष्टीची          
   मी आधार होतेत्या प्राणीमात्रांची
असे जरी तू एक प्राणशक्ति..
मी घडविते चिरंतर संस्कृृती
तुझ्या गतीशी माझी ही विसंगती
मी काठावरची किंचित ओली रेती

- उषा वाणी