ओळख
ओळखलसं!! म्हणून विचारले
पण त्यासाठी ओळख व्हायला हवी होती
आधीची.....
म्हणून मी स्तब्ध पहात राहीले कारण
तेव्हा धडधड होती मनामधे
तिही भितीची....
नुसतीच निरव शांतता नि
मधेच घंटानाद झाला
तु काही विचारण्याआधी
माझा श्वास मरणप्राय झाला
एक पाउल मागे झाले ..कारण
समोर जायचेच नव्हते कधी
आज अकस्मात आपुलकी
ही नशीबाची का सुवर्णसंधी?
कुणासाठी? तुझ्यासाठी कि माझ्यासाठी ?
ही वेळ तर यायला हवी होती आधी.......
- तृप्ती नवारे
ओळखलसं!! म्हणून विचारले
पण त्यासाठी ओळख व्हायला हवी होती
आधीची.....
म्हणून मी स्तब्ध पहात राहीले कारण
तेव्हा धडधड होती मनामधे
तिही भितीची....
नुसतीच निरव शांतता नि
मधेच घंटानाद झाला
तु काही विचारण्याआधी
माझा श्वास मरणप्राय झाला
एक पाउल मागे झाले ..कारण
समोर जायचेच नव्हते कधी
आज अकस्मात आपुलकी
ही नशीबाची का सुवर्णसंधी?
कुणासाठी? तुझ्यासाठी कि माझ्यासाठी ?
ही वेळ तर यायला हवी होती आधी.......
- तृप्ती नवारे