♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


मिनाक्षी किलावत


"घडविले अक्षर"

होते शब्द घडविले अक्षर
भारत भूमीचे कर्ज फेडले
आपले समजुनी लेकरांना 
संविधानिक मार्ग दाखवले.......

असते बाबा या जगी जर
नव्या पिढिला घडवण्यासाठी
आत्मविश्वासाचे बीजांकुर
असते सज्ज रुजवण्यासाठी.......

आत्मविश्वासाचे बीज पेरण्या      
महावलय जगी पसरवावे                                       
आंम्हा गरज आहे तुमची
नव अवतार घेवूनी तुम्ही यावे........

आदर्श मानव होते तुम्ही बाबा
कर्मकांडता तुम्ही झिडकारली
तळमळले परी लढले लेखणीने                              
धर्मांधतेची या धिंड काढली.....

पवित्र संविधान साक्षरतेला
प्रगल्भतेची देणगी दिली
आधारस्थंब संविधान तुम्ही
अथक परीश्रमाने सार्थक केली.........

शिल्पकार तूम्ही निति निपुनतेचे 
विश्वात तुमची किर्ती महान
कल्याणकारी बंधनाचे तुम्ही
मानवतेला घातले या कुंपन .........

समता,स्वतंत्रतेचा जयघोष 
जातपात बंधूभावाचे तत्व जाणूनी                        
तेजस्वि अभियानाची ज्वंलत ज्योती
केली सुर्यप्रकाशाची किरणे उगाळूनी.....


चारोळी  
---------------------
रस्त्यावरचे जिणे आमचे
कचरा वेचितो जगण्यासाठी
गरीबित फिरतोय वणवणं
पोटाची खळगी भरण्यासाठी..1         
---------*---------------*----

---
आम्ही गरीब बालके
आईबापा विना अनाथ
पोटासाठी कचरा वेचितो
थकले की घेतो विश्रांती..2            
---------*---------------*-------                                                          
राहिली नाही कुठे माया ममता                               
आधार द्यावया लागत असते हिंमत,                         
मदतीचे झाले आहेत बाजारीकरनं
मानुसकीला नाही इथे किंमत..3     
---------*---------------*---------
आशय आयुष्याचा जगी असावा
नसो धोंड्यागत आपले जीवन जगने.              
आपल्या जगण्याला अर्थ असावा
चांगले कर्म करुन मरावे आनंदाने..4       
---------*---------------*-------
श्रीमती मीनाक्षी किलावत , 8888029763
     
  काव्यांजंली
  आधार द्यावया                                                  
लागत असते हिंमत
   नाही किंमत
    मानुसकीला
   आशय जगण्याला
चांगले कर्म करुन
  जीवन जगुन
      मरावे

  आयुष्य अमुल्य
जगण्याला अर्थ असावा
   पच्छाताप नसावा
       कधीच
     कर्म प्रधानता
सोज्वळ,सात्विक,निष्ठा
   नको प्रतिष्ठा
     जीवनात
  कर्म कर्तव्यात
  असो सात्विक निष्ठा
     राहो प्रतिष्ठा
       सदा
श्रीमती मीनाक्षी किलावत ,
 8888029763


बाळाचे जीवन

फुलासारखे बाळाचे जीवन
नाजूक पाकळ्या अंतरमन
निरागस ते कमळासारखे
सर्वांचे लाडके मनमोहन.......
छोट्या सोबत मोठ्यांना ही
नादी लावती ही बालतरू
उत्कर्षाची फुले बहरती
उद्याचे हे फुलपाखरु........
मस्तीत चाले मस्तीत डोले
बोल तूझे असे अती शहाने
हवेसे तुझे लाडने बागडने
घरातील तु रे मधुर गाणे.......
अशीच असावी गोडी तुझीया
अद्भूत वाटे आनंदमय पर्वनी
अमृताची गोडी तुझी रे
बोल बोबडी ही मंजूळ वाणी......
खोड्या करिती त्रास देती
तरी तुज कवटाळी प्रेमाने
जरी रागावने मारने बळेच 
नयन पाझरती तुझ्या वेदनेने.......
मधूर तुझे जीवन जगने-मरने
लाभे आयुष्य सुंदर निर्व्यसनी
इमानदारी ने घे गरुड भरारी
गरीबित ही हो मोठा स्वभिमानी......
 
निडरतेने मार्ग तुडवून परक्यांचे
कष्ट घ्यावे ओंजळीत भरुनी
नसे असुया कुणाची मनी
संस्काराचे फुले असावी आचरनी.........
श्रीमती मिनाक्षी किलावत जिल्हा- यवतमाळ
    8888029763 
-----------------------
ई माझी आई     
                              
बोलते मी ऐक तुझ्या गर्भातला बाळ
होवू नको तु आपुल्या बाळाचा काळ.......
इवलासा ग माझा जीव आहे अती छोटा
अस्र शस्रंचा ग तु रचु नको घाट.......                                                                   
कशी खेळु आनंदात  तुझ्या गर्भात                         
तन मन घायल माझे रक्ताच्या पाटात
करू नको ग आई माझ्या जीवनाशी खेळ.......
पंचप्राण नियतीचा येवु दे घरात
तुझ्या प्रेमा साठी जीव तळपते आत
माय लेकीची ग माया उंत्तुग महान
ऐकु येते का ग माझे आर्त क्रंदन.........
येवु दे की तु मजला या धरतीवर                                  
पाहु दे की एकदा हे अप्रतिम नगर                     
क्षमया धरतीची उपमा तुज आहे ग जगात
असे भयंकर पाप करू नको घात........
छिन्न विछिन्न अवस्थेत पाहु नको बाळ                     
तोडु नको ही वेल लागु दे फळ.........                                            
     
   श्रीमती. मिनाक्षी किलावत ,वणी  जिल्हा यवतमाळ    
मो.नं.8888029763


--------------------
माझ्या मनाचा
   
प्रेम करीते तुझ्यावर,गीत ओठी तुझेच येते,
आली गेली वादळे,राखून ह्रदयात ठेवते......
दाटला वसंत ह्रदयी,पसारा मनी प्रेमाचा,
तरी मनी माझ्या, भास होई सावलीचा.......
माझ्या एवढे असेल कां प्रेम तिचे माझेवरी
करणार आहे कां ती ,राज्य माझ्या ह्रदयावरी...
प्रेमात पडल्यावर असच कां होतय मला
तरी वेड्या माझ्या मना,कां लागावा लळा .....
मजकडे ती नेहमी यावे,असे मला वाटते,
भेट दुरुन ही होता ,मनास समाधान लाभते .....
न दिसता ती कुठेच, काहूर उठते मनोमनी,
पहावे जवळून तिला,वाटे मज क्षणोक्षणी .....
साक्षात्कार प्रीतीचा,भेट रस्त्याचे आडोश्याला,
वाटे व्हावी नजरानजर,चुकवून घरच्याला .....
कधी असे प्रेमाची,वेगळी धग शब्दाला,
कधी होई विचलीत मन,ते पडता कानाला ......
गुप्त प्रेम मनातल,कां सांगु वाटे तिला,
हाच एक ध्यास ,कां असतो मनाला ......
सहज फिरकलो मी,त्या निलगीरी बागेला,
उजाळा मिळाला , माझ्या नव भविष्याला .....
इथेच दिला शब्द तिने ,नयनी लाजून प्रेमाचा
घेतला अखेर कानोसा,येथे माझ्या मनाचा .... 

  meenakilawat 2153@gmail.com
श्रीमती मिनाक्षी किलावत ,वणी-यवतमाळ 



"पशुसंवर्धन "
मुक्या प्रण्यांना ही असतात
वेदना अन संवेदना,
समतोल सृष्टीचा राखण्यास
पशु पक्ष्यांचे मोठे बलिदान .......
वन्य जिवांचे रक्षण करून
करावे सकलांनी पशुसंवर्धन,
आजची नितांत गरज आहे
पशुपक्षी असे मानवा वरदान ...........
मानव जातीला कलंक असतेे काही
चार पैश्यासाठी करतात कत्तल नामीजण
म्हाताऱ्या गाईला विकतात कसायाला
कसाई विकतो पशुचे मांस म्हणून घेतो प्राण.......
पशुपक्ष्यांचे कार्य अभिमानास्पद
मरुनी जगी होतसे चीरंतन,
मल,मुत्र,चामडी ही जात नसे वाया
असे श्रेष्ठ तत्व पशुंचे जगी महान ........
निसर्गचक्राला पर्याय असे पशुपक्षी                 
वनराई अाहे जगाची शान,
थोडा का होईना तनमनधन देवून
भावनामयी पशुंची ठेवूया जान.......

श्रीमती मिनाक्षी किलावत ,
वणी जिल्हा -यवतमाळ
   8888029763

*********************************************
 सद्भावनांचा फराळ
     दिवाळी आली                                            
दिवाळी आली करुया लावुया पणती
गाय वासराची कृतज्ञता मनी बाळगावे                      
अंगी अमुल्य असणारे प्रेमरसदुग्ध प्रसन्नतेने
या दिनी गायीस घास नम्रतेने भरवावे......
धनत्रयोदशी निरामय निरव्यसनी संकल्प
होईल धन्वंतरीचा समाधानाचा धनवर्षाव
आरोग्य मिळाव आपना अखंडित निरोगी
या दिनाचे महत्व पुर्ण जीवन संतृष्ट व्हाव ......
नरकचतुर्दशी सत्याचा असत्यावर                            
कायम आयुष्यात प्रभावळ असावी
अन्यायाचा प्रतिकार करण्याचे बळ
या दिनाचे महत्व सदा यशकिर्ती मिळावी ........
दिवाळी आली लक्ष्मीचा सहवास                             
आपल्या घरी नित्य राहावा
घरच्या लक्ष्मीला ठेवावे सदा प्रसन्न
अन् आयुष्यभर आंनद घ्यावा .......
पाडवा अर्थात बलिप्रतिपदा आगमनाने                
आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा            
दिवाळीचा फराळ अनाथांना घेवून खावा                  
या दिनाचे महत्व नव प्रेरणेने अंगीकारावा .........

श्रीमती मिनाक्षी किलावत,वणी ,यवतमाळ
मो. नं. 8888029763




अवनी
^^^^^^^^^^^^^^^^^
वसुंधरा ही भरली भरली
दुरुन दिसे हिरवी हिरवी
रूप तीचे हे पाहून सारे
होती सस्मीत नरनारी.........
इथे रोजच्या उलाढाली
सहन करते साऱ्या उठाठेवी
कर्कश्य आवाज गगन भेदी
वसुंधरेच्या कानी कपारी.......
ह्रदय पृथ्वीचे धडधडते
अंग-अंग अवनीचे थरथरते
किती हो इथे प्रदूषण होते
तरी वरदानी आम्हा लाभते......
जगणे मरणे तीच्या वरती
शल्य वेदनेत अवनी सहभागी
सुख-दुखाची धुसमट सारी
असे अवनी ही महान त्यागी......
घेई सामावुन मानवाची करनी
सांभाळा अपुल्या बाळापरी
भेदभाव नसे ना जातीभेद करी
अपार भार असे हा अवनीवरी .......
पशु-पक्षी धरने-सरीता-पर्वते
वृक्षारोपन करुनी वाचवा अवनीला
कारखाणे,मोटर गाड्या किती
करु नका अस्वच्छ हो तिजला......

श्रीमती मिनाक्षी किलावत,वणी
         यवतमाळ
        8888029763

माझा भाऊ
माझा भाऊ असे परदेशी
फेस बुुक अन फोनवरून
होतसे आमच्या गाठी-भेटी
भावाशी बोलतां येई डोळ्यात पाणी......
जवळ होता तेंव्हा पाहिली
आम्ही मोठ-मोठी स्वप्न
करत होता लहान बहिणीचे
कोड कौतुक माया देई भरभरुन........
दुर उभा राहून अश्रृपूरीत डोळ्याने
लग्नात माझ्या सतत रडत होता
कामे करतांना मागे पुढे करता
भाऊ माझी नजर चुकवित होता..........
प्रेमळ मनाचा आहे माझा भाऊ
त्याच्या बोलण्याने जाते मी बहरुन
तो येईल म्हणुन वाट मी बघते
येणार म्हणता जाते मी हर्षून........
ईश्वर चरणी करते मी प्रार्थना
सुखी राहो कुठे ही माझा भाऊ
प्रेम जिव्हाळा नांदो साऱ्या जगी
संस्कृतीचा आदर राखतो माझा भाऊ.......
श्रीमती मिनाक्षी किलावत,वणी,यवतमाळ
मो. नं. 8888029763
-----------------------------

क्षणागणिक
क्षणागणिक ते सावरतांना
चाहूल होतं असते मनाला
जर का जगी आरसा नसता
मुकले असतो का तारुण्याला.....
पाहात असता फोटो आपले
मनातच ती कळवळली
तारुण्यातली रसरसनारी
सुरेख कांती कुठे हरवली....
सळसळनारी डौलदार
चाल पाहुनी मागे किती
सांगु कशी मी एकेकाची
तीरा परी नजर निती.......
किती भरभर दिस जातात
काही कळत पण नाही
तरुण पन शापित असत
काळ काही थांबत नाही......
आठवले ते जुने दिवस
की मन नाराज होतय
चिरतरुण का कोणी झाले
फक्त नटी ही तरुन दिसतेय.....
तारुण्य अबाधित नसतय ग
यायला हवा ना मोठेपणा
बोल बोबडे ते ऐकाण्यासाठी
नातवात मन असतेच ना.......
    श्रीमती मिनाक्षी किलावत जिल्हा- यवतमाळ
    मो.क्रं.  8888029763 
-----------------------------