पुनरावृत्ती
करतो पुन्हा पुन्हा आम्ही
तीच जाती धर्म पुनरावृत्ती
अन् विसरतो सहजतेने
शहिदांच्या त्या पावन स्मृती
करतो अवमान वीरांचा त्या
जयांनी सोडुन जाती-पाती
भारतमातेसाठी लढुन शर्थीने
दिली अपुल्या प्राणांची आहुती
स्वाधीनता आली परि न सुटली
जाती धर्माची अजब ही गुंती
नव्या युगीही जोपासली आम्ही
जुनी जीर्ण भेदाभेद संस्कृती
नववर्षाची साद घ्या ऐकुनी
त्यागा निजस्वार्थी ही वृत्ती
देशभावना हीच सर्वतोपरी
बिंबवुन घ्या अपुल्या चित्ती
गणेश पांडे
मो, ९५0३३५0५७४
....................
प्रार्थना
भोवती सारे सुखाचे भास होते..
दु:ख माझे एकटे अभिजात होते..
सावली झालास तू ग्रिष्मात जेव्हा
मी कुठे तेव्हा तुझ्या गावात होते..?
का फुले देहावरी काटाच माझ्या
का असे माझे ऋतू कैफात होते..?
शुन्य तू होताच मी का पूर्ण झाले
काय हे माझ्या-तुझ्या नात्यात होते..?
पेरते प्राणात माझ्या प्रार्थना मी
तेज दे सार्यास जे तिमिरात होते..?
मंजिरी भोयर
हिंगणघाट, जि. वर्धा
९९६0४७५९८१
....................
चला मुलांनो...
चला मुलांनो आपण स्वप्नातील
भारताला, साकार करू,
एकविसाव्या शतकाचा
नवा इतिहास रचू
आपण वीर आहो उद्याचे
करू संघर्ष उद्यासाठी,
आपुल्या हाती भवितव्य या देशाचे..
हे बंद करा तंटे जातीवादाचे
एकच संदेश सार्या धर्मांचे,
एक होउनी स्वप्न पाहू देश विकासाचे..
सुरुवात करू नव्या क्रांतीला
बनवू देशाचा राजा शेतकर्याला,
नेऊ प्रगतीपथावर या देशाला..
या विज्ञानाच्या युगात
घेऊ उंच भरारी गगनात,
'नंबर वन' राहो भारत या जगात..
अमन मुंजेकर.
पाटणबोरी जि. यवतमाळ
७७७४९६२५९२
....................
जन्म लेकीचा
सम्मान करुया स्त्री जातीचा,
धागा जोडते दोन घराचा
नका संपवु तिला गर्भात,
होवु द्या जन्म लेकीचा
ईवले रुप घेवुन आली,
आंगणी जणु बाग फुलली
रांगत ठुमकत चालत असता,
आसरा मातेच्या पदराचा
लेक माझी सावली सुखाची,
बघता रुप तिचे विसर दु:खाची
माय जणु ती माझी भासते,
जेव्हा फिरवीते हात प्रेमाचा ।
बालपण तिचे पित्याच्या घरी,
तारुण्याचा संसार सासुरवाडी
वंश चालण्या पती कुळाचा,
तीच देते जन्म मुलाचा
कुळा-कुळाचा उद्धार केला,
स्त्री मुळेच वारस जन्मला
चुल-मुल सांभाळ करूनी,
तीच घास देई अन्नाचा
कन्यादान हे श्रेष्ठ समजता,
पुण्यदान गर्भात संपवता
ईवल्या रुपाला संपवुनी,
करू नका अपमान स्त्री जन्माचा ।
सुनील बावणे
बल्लारपूर, ८३0८३३४१२३
....................
स्वच्छंद
चल नं सख्या ..
हातामध्ये हात घेऊ
चांदण्यांच्या गावी जाऊ
चांदणचुर्यात हलके हलके
चांदणझुला झुलून घेऊ
चल नं सख्या..
कोसळत्या पावसात जाऊ
दोघे ओलेचिंब होऊ
एकमेकांना बिल्गुन घेत
पाऊसफुलं झेलून घेऊ
चल नं सख्या..
जगापासून दूर जाऊ
दुनियेला विसरून जाऊ
स्वप्नांच्या राज्यात जगू
स्वप्नं सारी रंगवून घेऊ
चल नं सख्या..
उंच उंच भरारी घेऊ
आकाशाला कवेत घेऊ
काळोखाच्या कुशीत शिरून
प्रकाशगाणी गाऊन घेऊ
चल नं सख्या..
देवासमोर उभे राहू
मनापासून हात जोडून
तुझ्या माझ्या प्रेमाला
उदंड आयुष्य मागून घेऊ
मीनाक्षी मोहरील
नागपूर, ९९२३0२0३३४
....................
प्रेम करावं
प्रेम करावं.. करून पहावं
कुणास डोळी भरून पाहावं
प्रेम करावं पाखरांवरती
प्रेम असावं मेघ नी धरती
धुंद सुगंधीत कळय़ाकळय़ांवर
कधी फुलांच्या पाकळय़ांवर
लांब पसरल्या रस्त्यांवरती
आणि जुनाट वस्त्यांवरती
प्रेम करावं चराचरांवर
ज्या ज्या योग्य त्या परंपरांवर
येत्या जात्या क्षणाक्षणावर
आणि स्वत:च्या वेड्या मनावर
मातृभूमीवर प्रेम करावं
तिच्यासाठी सदा झुरावं..
प्रियंका राऊत
नागपूर, ८६0५३६६0१९
....................
शुक्राची चांदणी
पहाटेचा सूर्य मावळताच
ती चमचम करत होती
इंद्राची अप्सरा लाजेल
अशी शुक्राची चांदणी होती
काळे भुरे डोळे तिचे
अन मऊ गोरे गाल
चंद्राविना चांदणीचे
झालेत बुरे हाल
चमचम करती चांदणी
ती उंच ढगाच्या काळोखात
विचार पडतो मला आता
कसे दिसते तिला अंधारात
या शुक्राच्या चांदणीने आता
अप्सरेला ही लाजविले
चांदणीची चमक पाहून मी
माझे डोकेच खाजविले
चंद्राच्या आडोश्यात लपलेल्या
चांदणीची चमक लयभारी
तुटता तारा बनुनी ही चांदणी
करती सर्वांची इच्छा पूर्ण सारी
चंद्राच्या आड लपलेल्या चांदणीला
मला एक विचरायचय
तू इतकी कशी चमकते चांदणी
तसे मला सुद्धा चमकायचय
प्रतिक कांबळे,
पवई, मुंबई, ९७0२२0६३७२
....................
प्रेमाचा बाजार.!
जिव्हाळा ह्या प्रीतीचा
म्हणे खेळ खेळत होते,
प्रेमाच्या नावाचा इथे
फक्त बाजार मांडत होते।
रेशीम धाग्याने म्हणे
वस्त्र विनवीत होते,
प्रेम करणे होत नाही
म्हणून धागे तोडत होते
तुटलेल्या धाग्यामध्ये
माझं हृदय तोडत होते,
प्रेमाच्या नावाचा इथे
फक्त बाजार मांडत होते
हृदय तोडतांना इथे
वेदना सांडत होते,
रक्तानी माखलेल्या
हृदयात कल्लोळ मांडत होते
डोळ्या पाणी वाहूनी
दु:ख वेदनेशी खेळत होते,
रिकामा हृदय मला
प्रेमाचा हिसाब मागत होते
स्पशूर्नी अंत:करणा
म्हणे प्रेम केलेच नव्हते,
प्रेमाच्या नावाचा फक्त
बाजार मांडत होते
श्रीपाद नागनाथ राऊतवाड
नांदेड, ९९७00५२८३७
....................
चला दोस्तांनो
चला दोस्तांनो दु:खाना वाटून घेऊ
या जगण्याला आनंदी वाहून घेऊ..
काल कुठले दिलासे बोलले मज
आज सुखाची स्पंदने रोवून घेऊ..
पुन्हा होतील भेटीचे बहाने इथे
क्षण उरात गुलाबी कोरून घेऊ..
अदा तुझिया माणसां बहरू दे रे
गोड स्वप्नांचे घरटे बांधून घेऊ..
प्रा. गणेश सांगोळकर
उदापूर, जि. चंद्रपूर
मो. ९९२१४५१५५0
....................
कैदी
गुन्हेगार तर कैदी आहेच
आम्ही भूतलावरील
सारे कैदीच आहोत
अंडज कवचात कैदी
जरायुज गर्भात कैदी
जन्मानंतर चरितार्थासाठी जो तो कैदी
कृमी किटक पक्षीही
अवघे प्राणी अन्नासाठी भ्रमंतीचे कैदी
उत्पादकाला उत्पन्न होण्याची कैद
मालकाला संपत्तीच्या वाढीची,
रक्षणाची खरेदी विक्रीची कैद
कामगाराला रोजी रोटीची कैद
आपली भूमिका निभवणारे
कार्याच्या पूर्ततेची कैदी
सांगा, इथे कैदी कोणी नाही?
सुरेंद्र मेर्शाम
नागपूर, ९१५८५६५0१0
....................
तुमचा प्रश्न
पाखरानं टोकरलेलं बोर
हमखास गोड असतं
ते उष्टावलेलं आहे
हे माहिती असूनही
ते मिळणारे स्वत:ला
भाग्यवान समजता
अख्खी अनाघ्रात बोरे
असुंदर व आंबट असतात
त्यांना समजूतदारपणा नसतो
ती पूर्णत: अनानुभवी असतात
त्यामानाने टोकरलेली बोरे
तुम्हाला खूश करण्यात
तरबेज असतात
आता हा तुमचा प्रश्न आहे
तुम्हाला टोकरलेलं, उष्टावलेलं
बोर चालेल की,
अख्ख अनाघ्रात बोरच हवय.
गोविंद मोतलग
अकोला
....................
तुम्हां जगविलंच पाहिजे!
तुम्हांमुळे मी जीवंत आहे
तुम्हा जगविलंच पाहिजे
ही नात्यांमुळे मानवता,
ती नात्यांविण दानवता।
शांती माया प्रेम दया समता,
जीवनी तरंग उठवित आहे
हे भाऊ ताई आई बाबा,
ते मावशी आजी आजोबा ।
अनावर तेणे वासनेवरी ताबा
वाढत्या वेलींना आधार आहे
झाडे-झुडे ही वल्लरी,
हो शुद्ध हवेची बेल्लरी ।
तयाविण जीव प्राण गुदमरी
सुवासी इच्छा जगण्याची आहे
हवे प्राणी पशू पक्षी,
खरी सृष्टीवरी ही नक्षी।
रक्षी आता रक्षी नरा कारे भक्षी,
मम विकासी तू भकास होताहे
सारे परोपकारी तुम्ही,
कसा वाणू किती कुणी मी?
कुचकामी या भूमी हा 'कृगोनि',
तो मेला तरी जग अधुरे नोहे
के. जी.एन. 'कृगोनि'
गडचिरोली, ७७७५0४१0८६पुनरावृत्ती
करतो पुन्हा पुन्हा आम्ही
तीच जाती धर्म पुनरावृत्ती
अन् विसरतो सहजतेने
शहिदांच्या त्या पावन स्मृती
करतो अवमान वीरांचा त्या
जयांनी सोडुन जाती-पाती
भारतमातेसाठी लढुन शर्थीने
दिली अपुल्या प्राणांची आहुती
स्वाधीनता आली परि न सुटली
जाती धर्माची अजब ही गुंती
नव्या युगीही जोपासली आम्ही
जुनी जीर्ण भेदाभेद संस्कृती
नववर्षाची साद घ्या ऐकुनी
त्यागा निजस्वार्थी ही वृत्ती
देशभावना हीच सर्वतोपरी
बिंबवुन घ्या अपुल्या चित्ती
गणेश पांडे
मो, ९५0३३५0५७४
....................
प्रार्थना
भोवती सारे सुखाचे भास होते..
दु:ख माझे एकटे अभिजात होते..
सावली झालास तू ग्रिष्मात जेव्हा
मी कुठे तेव्हा तुझ्या गावात होते..?
का फुले देहावरी काटाच माझ्या
का असे माझे ऋतू कैफात होते..?
शुन्य तू होताच मी का पूर्ण झाले
काय हे माझ्या-तुझ्या नात्यात होते..?
पेरते प्राणात माझ्या प्रार्थना मी
तेज दे सार्यास जे तिमिरात होते..?
मंजिरी भोयर
हिंगणघाट, जि. वर्धा
९९६0४७५९८१
....................
चला मुलांनो...
चला मुलांनो आपण स्वप्नातील
भारताला, साकार करू,
एकविसाव्या शतकाचा
नवा इतिहास रचू
आपण वीर आहो उद्याचे
करू संघर्ष उद्यासाठी,
आपुल्या हाती भवितव्य या देशाचे..
हे बंद करा तंटे जातीवादाचे
एकच संदेश सार्या धर्मांचे,
एक होउनी स्वप्न पाहू देश विकासाचे..
सुरुवात करू नव्या क्रांतीला
बनवू देशाचा राजा शेतकर्याला,
नेऊ प्रगतीपथावर या देशाला..
या विज्ञानाच्या युगात
घेऊ उंच भरारी गगनात,
'नंबर वन' राहो भारत या जगात..
अमन मुंजेकर.
पाटणबोरी जि. यवतमाळ
७७७४९६२५९२
....................
जन्म लेकीचा
सम्मान करुया स्त्री जातीचा,
धागा जोडते दोन घराचा
नका संपवु तिला गर्भात,
होवु द्या जन्म लेकीचा
ईवले रुप घेवुन आली,
आंगणी जणु बाग फुलली
रांगत ठुमकत चालत असता,
आसरा मातेच्या पदराचा
लेक माझी सावली सुखाची,
बघता रुप तिचे विसर दु:खाची
माय जणु ती माझी भासते,
जेव्हा फिरवीते हात प्रेमाचा ।
बालपण तिचे पित्याच्या घरी,
तारुण्याचा संसार सासुरवाडी
वंश चालण्या पती कुळाचा,
तीच देते जन्म मुलाचा
कुळा-कुळाचा उद्धार केला,
स्त्री मुळेच वारस जन्मला
चुल-मुल सांभाळ करूनी,
तीच घास देई अन्नाचा
कन्यादान हे श्रेष्ठ समजता,
पुण्यदान गर्भात संपवता
ईवल्या रुपाला संपवुनी,
करू नका अपमान स्त्री जन्माचा ।
सुनील बावणे
बल्लारपूर, ८३0८३३४१२३
....................
स्वच्छंद
चल नं सख्या ..
हातामध्ये हात घेऊ
चांदण्यांच्या गावी जाऊ
चांदणचुर्यात हलके हलके
चांदणझुला झुलून घेऊ
चल नं सख्या..
कोसळत्या पावसात जाऊ
दोघे ओलेचिंब होऊ
एकमेकांना बिल्गुन घेत
पाऊसफुलं झेलून घेऊ
चल नं सख्या..
जगापासून दूर जाऊ
दुनियेला विसरून जाऊ
स्वप्नांच्या राज्यात जगू
स्वप्नं सारी रंगवून घेऊ
चल नं सख्या..
उंच उंच भरारी घेऊ
आकाशाला कवेत घेऊ
काळोखाच्या कुशीत शिरून
प्रकाशगाणी गाऊन घेऊ
चल नं सख्या..
देवासमोर उभे राहू
मनापासून हात जोडून
तुझ्या माझ्या प्रेमाला
उदंड आयुष्य मागून घेऊ
मीनाक्षी मोहरील
नागपूर, ९९२३0२0३३४
....................
प्रेम करावं
प्रेम करावं.. करून पहावं
कुणास डोळी भरून पाहावं
प्रेम करावं पाखरांवरती
प्रेम असावं मेघ नी धरती
धुंद सुगंधीत कळय़ाकळय़ांवर
कधी फुलांच्या पाकळय़ांवर
लांब पसरल्या रस्त्यांवरती
आणि जुनाट वस्त्यांवरती
प्रेम करावं चराचरांवर
ज्या ज्या योग्य त्या परंपरांवर
येत्या जात्या क्षणाक्षणावर
आणि स्वत:च्या वेड्या मनावर
मातृभूमीवर प्रेम करावं
तिच्यासाठी सदा झुरावं..
प्रियंका राऊत
नागपूर, ८६0५३६६0१९
....................
शुक्राची चांदणी
पहाटेचा सूर्य मावळताच
ती चमचम करत होती
इंद्राची अप्सरा लाजेल
अशी शुक्राची चांदणी होती
काळे भुरे डोळे तिचे
अन मऊ गोरे गाल
चंद्राविना चांदणीचे
झालेत बुरे हाल
चमचम करती चांदणी
ती उंच ढगाच्या काळोखात
विचार पडतो मला आता
कसे दिसते तिला अंधारात
या शुक्राच्या चांदणीने आता
अप्सरेला ही लाजविले
चांदणीची चमक पाहून मी
माझे डोकेच खाजविले
चंद्राच्या आडोश्यात लपलेल्या
चांदणीची चमक लयभारी
तुटता तारा बनुनी ही चांदणी
करती सर्वांची इच्छा पूर्ण सारी
चंद्राच्या आड लपलेल्या चांदणीला
मला एक विचरायचय
तू इतकी कशी चमकते चांदणी
तसे मला सुद्धा चमकायचय
प्रतिक कांबळे,
पवई, मुंबई, ९७0२२0६३७२
....................
प्रेमाचा बाजार.!
जिव्हाळा ह्या प्रीतीचा
म्हणे खेळ खेळत होते,
प्रेमाच्या नावाचा इथे
फक्त बाजार मांडत होते।
रेशीम धाग्याने म्हणे
वस्त्र विनवीत होते,
प्रेम करणे होत नाही
म्हणून धागे तोडत होते
तुटलेल्या धाग्यामध्ये
माझं हृदय तोडत होते,
प्रेमाच्या नावाचा इथे
फक्त बाजार मांडत होते
हृदय तोडतांना इथे
वेदना सांडत होते,
रक्तानी माखलेल्या
हृदयात कल्लोळ मांडत होते
डोळ्या पाणी वाहूनी
दु:ख वेदनेशी खेळत होते,
रिकामा हृदय मला
प्रेमाचा हिसाब मागत होते
स्पशूर्नी अंत:करणा
म्हणे प्रेम केलेच नव्हते,
प्रेमाच्या नावाचा फक्त
बाजार मांडत होते
श्रीपाद नागनाथ राऊतवाड
नांदेड, ९९७00५२८३७
....................
चला दोस्तांनो
चला दोस्तांनो दु:खाना वाटून घेऊ
या जगण्याला आनंदी वाहून घेऊ..
काल कुठले दिलासे बोलले मज
आज सुखाची स्पंदने रोवून घेऊ..
पुन्हा होतील भेटीचे बहाने इथे
क्षण उरात गुलाबी कोरून घेऊ..
अदा तुझिया माणसां बहरू दे रे
गोड स्वप्नांचे घरटे बांधून घेऊ..
प्रा. गणेश सांगोळकर
उदापूर, जि. चंद्रपूर
मो. ९९२१४५१५५0
....................
कैदी
गुन्हेगार तर कैदी आहेच
आम्ही भूतलावरील
सारे कैदीच आहोत
अंडज कवचात कैदी
जरायुज गर्भात कैदी
जन्मानंतर चरितार्थासाठी जो तो कैदी
कृमी किटक पक्षीही
अवघे प्राणी अन्नासाठी भ्रमंतीचे कैदी
उत्पादकाला उत्पन्न होण्याची कैद
मालकाला संपत्तीच्या वाढीची,
रक्षणाची खरेदी विक्रीची कैद
कामगाराला रोजी रोटीची कैद
आपली भूमिका निभवणारे
कार्याच्या पूर्ततेची कैदी
सांगा, इथे कैदी कोणी नाही?
सुरेंद्र मेर्शाम
नागपूर, ९१५८५६५0१0
....................
तुमचा प्रश्न
पाखरानं टोकरलेलं बोर
हमखास गोड असतं
ते उष्टावलेलं आहे
हे माहिती असूनही
ते मिळणारे स्वत:ला
भाग्यवान समजता
अख्खी अनाघ्रात बोरे
असुंदर व आंबट असतात
त्यांना समजूतदारपणा नसतो
ती पूर्णत: अनानुभवी असतात
त्यामानाने टोकरलेली बोरे
तुम्हाला खूश करण्यात
तरबेज असतात
आता हा तुमचा प्रश्न आहे
तुम्हाला टोकरलेलं, उष्टावलेलं
बोर चालेल की,
अख्ख अनाघ्रात बोरच हवय.
गोविंद मोतलग
अकोला
....................
तुम्हां जगविलंच पाहिजे!
तुम्हांमुळे मी जीवंत आहे
तुम्हा जगविलंच पाहिजे
ही नात्यांमुळे मानवता,
ती नात्यांविण दानवता।
शांती माया प्रेम दया समता,
जीवनी तरंग उठवित आहे
हे भाऊ ताई आई बाबा,
ते मावशी आजी आजोबा ।
अनावर तेणे वासनेवरी ताबा
वाढत्या वेलींना आधार आहे
झाडे-झुडे ही वल्लरी,
हो शुद्ध हवेची बेल्लरी ।
तयाविण जीव प्राण गुदमरी
सुवासी इच्छा जगण्याची आहे
हवे प्राणी पशू पक्षी,
खरी सृष्टीवरी ही नक्षी।
रक्षी आता रक्षी नरा कारे भक्षी,
मम विकासी तू भकास होताहे
सारे परोपकारी तुम्ही,
कसा वाणू किती कुणी मी?
कुचकामी या भूमी हा 'कृगोनि',
तो मेला तरी जग अधुरे नोहे
के. जी.एन. 'कृगोनि'
गडचिरोली, ७७७५0४१0८६
करतो पुन्हा पुन्हा आम्ही
तीच जाती धर्म पुनरावृत्ती
अन् विसरतो सहजतेने
शहिदांच्या त्या पावन स्मृती
करतो अवमान वीरांचा त्या
जयांनी सोडुन जाती-पाती
भारतमातेसाठी लढुन शर्थीने
दिली अपुल्या प्राणांची आहुती
स्वाधीनता आली परि न सुटली
जाती धर्माची अजब ही गुंती
नव्या युगीही जोपासली आम्ही
जुनी जीर्ण भेदाभेद संस्कृती
नववर्षाची साद घ्या ऐकुनी
त्यागा निजस्वार्थी ही वृत्ती
देशभावना हीच सर्वतोपरी
बिंबवुन घ्या अपुल्या चित्ती
गणेश पांडे
मो, ९५0३३५0५७४
....................
प्रार्थना
भोवती सारे सुखाचे भास होते..
दु:ख माझे एकटे अभिजात होते..
सावली झालास तू ग्रिष्मात जेव्हा
मी कुठे तेव्हा तुझ्या गावात होते..?
का फुले देहावरी काटाच माझ्या
का असे माझे ऋतू कैफात होते..?
शुन्य तू होताच मी का पूर्ण झाले
काय हे माझ्या-तुझ्या नात्यात होते..?
पेरते प्राणात माझ्या प्रार्थना मी
तेज दे सार्यास जे तिमिरात होते..?
मंजिरी भोयर
हिंगणघाट, जि. वर्धा
९९६0४७५९८१
....................
चला मुलांनो...
चला मुलांनो आपण स्वप्नातील
भारताला, साकार करू,
एकविसाव्या शतकाचा
नवा इतिहास रचू
आपण वीर आहो उद्याचे
करू संघर्ष उद्यासाठी,
आपुल्या हाती भवितव्य या देशाचे..
हे बंद करा तंटे जातीवादाचे
एकच संदेश सार्या धर्मांचे,
एक होउनी स्वप्न पाहू देश विकासाचे..
सुरुवात करू नव्या क्रांतीला
बनवू देशाचा राजा शेतकर्याला,
नेऊ प्रगतीपथावर या देशाला..
या विज्ञानाच्या युगात
घेऊ उंच भरारी गगनात,
'नंबर वन' राहो भारत या जगात..
अमन मुंजेकर.
पाटणबोरी जि. यवतमाळ
७७७४९६२५९२
....................
जन्म लेकीचा
सम्मान करुया स्त्री जातीचा,
धागा जोडते दोन घराचा
नका संपवु तिला गर्भात,
होवु द्या जन्म लेकीचा
ईवले रुप घेवुन आली,
आंगणी जणु बाग फुलली
रांगत ठुमकत चालत असता,
आसरा मातेच्या पदराचा
लेक माझी सावली सुखाची,
बघता रुप तिचे विसर दु:खाची
माय जणु ती माझी भासते,
जेव्हा फिरवीते हात प्रेमाचा ।
बालपण तिचे पित्याच्या घरी,
तारुण्याचा संसार सासुरवाडी
वंश चालण्या पती कुळाचा,
तीच देते जन्म मुलाचा
कुळा-कुळाचा उद्धार केला,
स्त्री मुळेच वारस जन्मला
चुल-मुल सांभाळ करूनी,
तीच घास देई अन्नाचा
कन्यादान हे श्रेष्ठ समजता,
पुण्यदान गर्भात संपवता
ईवल्या रुपाला संपवुनी,
करू नका अपमान स्त्री जन्माचा ।
सुनील बावणे
बल्लारपूर, ८३0८३३४१२३
....................
स्वच्छंद
चल नं सख्या ..
हातामध्ये हात घेऊ
चांदण्यांच्या गावी जाऊ
चांदणचुर्यात हलके हलके
चांदणझुला झुलून घेऊ
चल नं सख्या..
कोसळत्या पावसात जाऊ
दोघे ओलेचिंब होऊ
एकमेकांना बिल्गुन घेत
पाऊसफुलं झेलून घेऊ
चल नं सख्या..
जगापासून दूर जाऊ
दुनियेला विसरून जाऊ
स्वप्नांच्या राज्यात जगू
स्वप्नं सारी रंगवून घेऊ
चल नं सख्या..
उंच उंच भरारी घेऊ
आकाशाला कवेत घेऊ
काळोखाच्या कुशीत शिरून
प्रकाशगाणी गाऊन घेऊ
चल नं सख्या..
देवासमोर उभे राहू
मनापासून हात जोडून
तुझ्या माझ्या प्रेमाला
उदंड आयुष्य मागून घेऊ
मीनाक्षी मोहरील
नागपूर, ९९२३0२0३३४
....................
प्रेम करावं
प्रेम करावं.. करून पहावं
कुणास डोळी भरून पाहावं
प्रेम करावं पाखरांवरती
प्रेम असावं मेघ नी धरती
धुंद सुगंधीत कळय़ाकळय़ांवर
कधी फुलांच्या पाकळय़ांवर
लांब पसरल्या रस्त्यांवरती
आणि जुनाट वस्त्यांवरती
प्रेम करावं चराचरांवर
ज्या ज्या योग्य त्या परंपरांवर
येत्या जात्या क्षणाक्षणावर
आणि स्वत:च्या वेड्या मनावर
मातृभूमीवर प्रेम करावं
तिच्यासाठी सदा झुरावं..
प्रियंका राऊत
नागपूर, ८६0५३६६0१९
....................
शुक्राची चांदणी
पहाटेचा सूर्य मावळताच
ती चमचम करत होती
इंद्राची अप्सरा लाजेल
अशी शुक्राची चांदणी होती
काळे भुरे डोळे तिचे
अन मऊ गोरे गाल
चंद्राविना चांदणीचे
झालेत बुरे हाल
चमचम करती चांदणी
ती उंच ढगाच्या काळोखात
विचार पडतो मला आता
कसे दिसते तिला अंधारात
या शुक्राच्या चांदणीने आता
अप्सरेला ही लाजविले
चांदणीची चमक पाहून मी
माझे डोकेच खाजविले
चंद्राच्या आडोश्यात लपलेल्या
चांदणीची चमक लयभारी
तुटता तारा बनुनी ही चांदणी
करती सर्वांची इच्छा पूर्ण सारी
चंद्राच्या आड लपलेल्या चांदणीला
मला एक विचरायचय
तू इतकी कशी चमकते चांदणी
तसे मला सुद्धा चमकायचय
प्रतिक कांबळे,
पवई, मुंबई, ९७0२२0६३७२
....................
प्रेमाचा बाजार.!
जिव्हाळा ह्या प्रीतीचा
म्हणे खेळ खेळत होते,
प्रेमाच्या नावाचा इथे
फक्त बाजार मांडत होते।
रेशीम धाग्याने म्हणे
वस्त्र विनवीत होते,
प्रेम करणे होत नाही
म्हणून धागे तोडत होते
तुटलेल्या धाग्यामध्ये
माझं हृदय तोडत होते,
प्रेमाच्या नावाचा इथे
फक्त बाजार मांडत होते
हृदय तोडतांना इथे
वेदना सांडत होते,
रक्तानी माखलेल्या
हृदयात कल्लोळ मांडत होते
डोळ्या पाणी वाहूनी
दु:ख वेदनेशी खेळत होते,
रिकामा हृदय मला
प्रेमाचा हिसाब मागत होते
स्पशूर्नी अंत:करणा
म्हणे प्रेम केलेच नव्हते,
प्रेमाच्या नावाचा फक्त
बाजार मांडत होते
श्रीपाद नागनाथ राऊतवाड
नांदेड, ९९७00५२८३७
....................
चला दोस्तांनो
चला दोस्तांनो दु:खाना वाटून घेऊ
या जगण्याला आनंदी वाहून घेऊ..
काल कुठले दिलासे बोलले मज
आज सुखाची स्पंदने रोवून घेऊ..
पुन्हा होतील भेटीचे बहाने इथे
क्षण उरात गुलाबी कोरून घेऊ..
अदा तुझिया माणसां बहरू दे रे
गोड स्वप्नांचे घरटे बांधून घेऊ..
प्रा. गणेश सांगोळकर
उदापूर, जि. चंद्रपूर
मो. ९९२१४५१५५0
....................
कैदी
गुन्हेगार तर कैदी आहेच
आम्ही भूतलावरील
सारे कैदीच आहोत
अंडज कवचात कैदी
जरायुज गर्भात कैदी
जन्मानंतर चरितार्थासाठी जो तो कैदी
कृमी किटक पक्षीही
अवघे प्राणी अन्नासाठी भ्रमंतीचे कैदी
उत्पादकाला उत्पन्न होण्याची कैद
मालकाला संपत्तीच्या वाढीची,
रक्षणाची खरेदी विक्रीची कैद
कामगाराला रोजी रोटीची कैद
आपली भूमिका निभवणारे
कार्याच्या पूर्ततेची कैदी
सांगा, इथे कैदी कोणी नाही?
सुरेंद्र मेर्शाम
नागपूर, ९१५८५६५0१0
....................
तुमचा प्रश्न
पाखरानं टोकरलेलं बोर
हमखास गोड असतं
ते उष्टावलेलं आहे
हे माहिती असूनही
ते मिळणारे स्वत:ला
भाग्यवान समजता
अख्खी अनाघ्रात बोरे
असुंदर व आंबट असतात
त्यांना समजूतदारपणा नसतो
ती पूर्णत: अनानुभवी असतात
त्यामानाने टोकरलेली बोरे
तुम्हाला खूश करण्यात
तरबेज असतात
आता हा तुमचा प्रश्न आहे
तुम्हाला टोकरलेलं, उष्टावलेलं
बोर चालेल की,
अख्ख अनाघ्रात बोरच हवय.
गोविंद मोतलग
अकोला
....................
तुम्हां जगविलंच पाहिजे!
तुम्हांमुळे मी जीवंत आहे
तुम्हा जगविलंच पाहिजे
ही नात्यांमुळे मानवता,
ती नात्यांविण दानवता।
शांती माया प्रेम दया समता,
जीवनी तरंग उठवित आहे
हे भाऊ ताई आई बाबा,
ते मावशी आजी आजोबा ।
अनावर तेणे वासनेवरी ताबा
वाढत्या वेलींना आधार आहे
झाडे-झुडे ही वल्लरी,
हो शुद्ध हवेची बेल्लरी ।
तयाविण जीव प्राण गुदमरी
सुवासी इच्छा जगण्याची आहे
हवे प्राणी पशू पक्षी,
खरी सृष्टीवरी ही नक्षी।
रक्षी आता रक्षी नरा कारे भक्षी,
मम विकासी तू भकास होताहे
सारे परोपकारी तुम्ही,
कसा वाणू किती कुणी मी?
कुचकामी या भूमी हा 'कृगोनि',
तो मेला तरी जग अधुरे नोहे
के. जी.एन. 'कृगोनि'
गडचिरोली, ७७७५0४१0८६पुनरावृत्ती
करतो पुन्हा पुन्हा आम्ही
तीच जाती धर्म पुनरावृत्ती
अन् विसरतो सहजतेने
शहिदांच्या त्या पावन स्मृती
करतो अवमान वीरांचा त्या
जयांनी सोडुन जाती-पाती
भारतमातेसाठी लढुन शर्थीने
दिली अपुल्या प्राणांची आहुती
स्वाधीनता आली परि न सुटली
जाती धर्माची अजब ही गुंती
नव्या युगीही जोपासली आम्ही
जुनी जीर्ण भेदाभेद संस्कृती
नववर्षाची साद घ्या ऐकुनी
त्यागा निजस्वार्थी ही वृत्ती
देशभावना हीच सर्वतोपरी
बिंबवुन घ्या अपुल्या चित्ती
गणेश पांडे
मो, ९५0३३५0५७४
....................
प्रार्थना
भोवती सारे सुखाचे भास होते..
दु:ख माझे एकटे अभिजात होते..
सावली झालास तू ग्रिष्मात जेव्हा
मी कुठे तेव्हा तुझ्या गावात होते..?
का फुले देहावरी काटाच माझ्या
का असे माझे ऋतू कैफात होते..?
शुन्य तू होताच मी का पूर्ण झाले
काय हे माझ्या-तुझ्या नात्यात होते..?
पेरते प्राणात माझ्या प्रार्थना मी
तेज दे सार्यास जे तिमिरात होते..?
मंजिरी भोयर
हिंगणघाट, जि. वर्धा
९९६0४७५९८१
....................
चला मुलांनो...
चला मुलांनो आपण स्वप्नातील
भारताला, साकार करू,
एकविसाव्या शतकाचा
नवा इतिहास रचू
आपण वीर आहो उद्याचे
करू संघर्ष उद्यासाठी,
आपुल्या हाती भवितव्य या देशाचे..
हे बंद करा तंटे जातीवादाचे
एकच संदेश सार्या धर्मांचे,
एक होउनी स्वप्न पाहू देश विकासाचे..
सुरुवात करू नव्या क्रांतीला
बनवू देशाचा राजा शेतकर्याला,
नेऊ प्रगतीपथावर या देशाला..
या विज्ञानाच्या युगात
घेऊ उंच भरारी गगनात,
'नंबर वन' राहो भारत या जगात..
अमन मुंजेकर.
पाटणबोरी जि. यवतमाळ
७७७४९६२५९२
....................
जन्म लेकीचा
सम्मान करुया स्त्री जातीचा,
धागा जोडते दोन घराचा
नका संपवु तिला गर्भात,
होवु द्या जन्म लेकीचा
ईवले रुप घेवुन आली,
आंगणी जणु बाग फुलली
रांगत ठुमकत चालत असता,
आसरा मातेच्या पदराचा
लेक माझी सावली सुखाची,
बघता रुप तिचे विसर दु:खाची
माय जणु ती माझी भासते,
जेव्हा फिरवीते हात प्रेमाचा ।
बालपण तिचे पित्याच्या घरी,
तारुण्याचा संसार सासुरवाडी
वंश चालण्या पती कुळाचा,
तीच देते जन्म मुलाचा
कुळा-कुळाचा उद्धार केला,
स्त्री मुळेच वारस जन्मला
चुल-मुल सांभाळ करूनी,
तीच घास देई अन्नाचा
कन्यादान हे श्रेष्ठ समजता,
पुण्यदान गर्भात संपवता
ईवल्या रुपाला संपवुनी,
करू नका अपमान स्त्री जन्माचा ।
सुनील बावणे
बल्लारपूर, ८३0८३३४१२३
....................
स्वच्छंद
चल नं सख्या ..
हातामध्ये हात घेऊ
चांदण्यांच्या गावी जाऊ
चांदणचुर्यात हलके हलके
चांदणझुला झुलून घेऊ
चल नं सख्या..
कोसळत्या पावसात जाऊ
दोघे ओलेचिंब होऊ
एकमेकांना बिल्गुन घेत
पाऊसफुलं झेलून घेऊ
चल नं सख्या..
जगापासून दूर जाऊ
दुनियेला विसरून जाऊ
स्वप्नांच्या राज्यात जगू
स्वप्नं सारी रंगवून घेऊ
चल नं सख्या..
उंच उंच भरारी घेऊ
आकाशाला कवेत घेऊ
काळोखाच्या कुशीत शिरून
प्रकाशगाणी गाऊन घेऊ
चल नं सख्या..
देवासमोर उभे राहू
मनापासून हात जोडून
तुझ्या माझ्या प्रेमाला
उदंड आयुष्य मागून घेऊ
मीनाक्षी मोहरील
नागपूर, ९९२३0२0३३४
....................
प्रेम करावं
प्रेम करावं.. करून पहावं
कुणास डोळी भरून पाहावं
प्रेम करावं पाखरांवरती
प्रेम असावं मेघ नी धरती
धुंद सुगंधीत कळय़ाकळय़ांवर
कधी फुलांच्या पाकळय़ांवर
लांब पसरल्या रस्त्यांवरती
आणि जुनाट वस्त्यांवरती
प्रेम करावं चराचरांवर
ज्या ज्या योग्य त्या परंपरांवर
येत्या जात्या क्षणाक्षणावर
आणि स्वत:च्या वेड्या मनावर
मातृभूमीवर प्रेम करावं
तिच्यासाठी सदा झुरावं..
प्रियंका राऊत
नागपूर, ८६0५३६६0१९
....................
शुक्राची चांदणी
पहाटेचा सूर्य मावळताच
ती चमचम करत होती
इंद्राची अप्सरा लाजेल
अशी शुक्राची चांदणी होती
काळे भुरे डोळे तिचे
अन मऊ गोरे गाल
चंद्राविना चांदणीचे
झालेत बुरे हाल
चमचम करती चांदणी
ती उंच ढगाच्या काळोखात
विचार पडतो मला आता
कसे दिसते तिला अंधारात
या शुक्राच्या चांदणीने आता
अप्सरेला ही लाजविले
चांदणीची चमक पाहून मी
माझे डोकेच खाजविले
चंद्राच्या आडोश्यात लपलेल्या
चांदणीची चमक लयभारी
तुटता तारा बनुनी ही चांदणी
करती सर्वांची इच्छा पूर्ण सारी
चंद्राच्या आड लपलेल्या चांदणीला
मला एक विचरायचय
तू इतकी कशी चमकते चांदणी
तसे मला सुद्धा चमकायचय
प्रतिक कांबळे,
पवई, मुंबई, ९७0२२0६३७२
....................
प्रेमाचा बाजार.!
जिव्हाळा ह्या प्रीतीचा
म्हणे खेळ खेळत होते,
प्रेमाच्या नावाचा इथे
फक्त बाजार मांडत होते।
रेशीम धाग्याने म्हणे
वस्त्र विनवीत होते,
प्रेम करणे होत नाही
म्हणून धागे तोडत होते
तुटलेल्या धाग्यामध्ये
माझं हृदय तोडत होते,
प्रेमाच्या नावाचा इथे
फक्त बाजार मांडत होते
हृदय तोडतांना इथे
वेदना सांडत होते,
रक्तानी माखलेल्या
हृदयात कल्लोळ मांडत होते
डोळ्या पाणी वाहूनी
दु:ख वेदनेशी खेळत होते,
रिकामा हृदय मला
प्रेमाचा हिसाब मागत होते
स्पशूर्नी अंत:करणा
म्हणे प्रेम केलेच नव्हते,
प्रेमाच्या नावाचा फक्त
बाजार मांडत होते
श्रीपाद नागनाथ राऊतवाड
नांदेड, ९९७00५२८३७
....................
चला दोस्तांनो
चला दोस्तांनो दु:खाना वाटून घेऊ
या जगण्याला आनंदी वाहून घेऊ..
काल कुठले दिलासे बोलले मज
आज सुखाची स्पंदने रोवून घेऊ..
पुन्हा होतील भेटीचे बहाने इथे
क्षण उरात गुलाबी कोरून घेऊ..
अदा तुझिया माणसां बहरू दे रे
गोड स्वप्नांचे घरटे बांधून घेऊ..
प्रा. गणेश सांगोळकर
उदापूर, जि. चंद्रपूर
मो. ९९२१४५१५५0
....................
कैदी
गुन्हेगार तर कैदी आहेच
आम्ही भूतलावरील
सारे कैदीच आहोत
अंडज कवचात कैदी
जरायुज गर्भात कैदी
जन्मानंतर चरितार्थासाठी जो तो कैदी
कृमी किटक पक्षीही
अवघे प्राणी अन्नासाठी भ्रमंतीचे कैदी
उत्पादकाला उत्पन्न होण्याची कैद
मालकाला संपत्तीच्या वाढीची,
रक्षणाची खरेदी विक्रीची कैद
कामगाराला रोजी रोटीची कैद
आपली भूमिका निभवणारे
कार्याच्या पूर्ततेची कैदी
सांगा, इथे कैदी कोणी नाही?
सुरेंद्र मेर्शाम
नागपूर, ९१५८५६५0१0
....................
तुमचा प्रश्न
पाखरानं टोकरलेलं बोर
हमखास गोड असतं
ते उष्टावलेलं आहे
हे माहिती असूनही
ते मिळणारे स्वत:ला
भाग्यवान समजता
अख्खी अनाघ्रात बोरे
असुंदर व आंबट असतात
त्यांना समजूतदारपणा नसतो
ती पूर्णत: अनानुभवी असतात
त्यामानाने टोकरलेली बोरे
तुम्हाला खूश करण्यात
तरबेज असतात
आता हा तुमचा प्रश्न आहे
तुम्हाला टोकरलेलं, उष्टावलेलं
बोर चालेल की,
अख्ख अनाघ्रात बोरच हवय.
गोविंद मोतलग
अकोला
....................
तुम्हां जगविलंच पाहिजे!
तुम्हांमुळे मी जीवंत आहे
तुम्हा जगविलंच पाहिजे
ही नात्यांमुळे मानवता,
ती नात्यांविण दानवता।
शांती माया प्रेम दया समता,
जीवनी तरंग उठवित आहे
हे भाऊ ताई आई बाबा,
ते मावशी आजी आजोबा ।
अनावर तेणे वासनेवरी ताबा
वाढत्या वेलींना आधार आहे
झाडे-झुडे ही वल्लरी,
हो शुद्ध हवेची बेल्लरी ।
तयाविण जीव प्राण गुदमरी
सुवासी इच्छा जगण्याची आहे
हवे प्राणी पशू पक्षी,
खरी सृष्टीवरी ही नक्षी।
रक्षी आता रक्षी नरा कारे भक्षी,
मम विकासी तू भकास होताहे
सारे परोपकारी तुम्ही,
कसा वाणू किती कुणी मी?
कुचकामी या भूमी हा 'कृगोनि',
तो मेला तरी जग अधुरे नोहे
के. जी.एन. 'कृगोनि'
गडचिरोली, ७७७५0४१0८६