♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


~~*नवे वर्ष~*~


दिवस सरता सरता नवे वर्ष आले. आपण जगलेल्या दिवसांचा आनंद म्हणून असो किंवा नव्या वर्षाची सुरुवात म्हणून असो आपण तो क्षण साजरा करत असतो.
आयुष्य जगताना प्रत्येक क्षणच आपल्यासाठी नवीन असतो. आयुष्य जगताना प्रत्येक क्षणात आपण नकळत नव्याने आयुष्य एक सुरूवात करत असतो. परिस्थिती बदलते, आपले विचार बदलतात आणि मिळणाऱ्या अनुभवातून आपण प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकत असतो.कधीकधी आपण आनंदात घिरट्या घालत असतो तर कधी दु:खात पार बुडालेलो असतो.पण तो वेळ काही सांगून येत नसतो. त्याच अनुभवातून शिकल्यावर नव्या क्षणाला सामोरे जायला आपण सज्ज होत असतो.
प्रत्येकाला प्रत्येक क्षण हा नवीन असतो . त्या क्षणाचा आनंद कसा साजरा करायचा हे ज्याचं त्यानं ठरवावं लागतं.मरणाच्या दारातून परतलेल्या .... एखाद्या अपघातातून वाचलेल्या व्यक्तीला तोच क्षण पुनर्जन्म देऊन जातो तर कुणासाठी तोच क्षण शेवटही ठरतो.पण ते आपल्यासाठी एक नवं challenge असतं....नवं धाडस असतं....नवं surprise असतं..... त्यामुळे गेलेल्या वेळेचा आणि येणार्या वेळेचा विचार करण्याऐवजी आपण प्रत्येक क्षण भरभरून जगायला पाहीजे..... ज्याप्रमाणे वर्षाचा पहिला दिवस साजरा करतो अगदी तसाच प्रत्येक क्षणाच नव्या उत्साहाने स्वागत करायला हवे.कुणास ठाऊक आता आहे ते नंतर नसेलही कदाचित....
चला तर मग या नव्या वर्षात प्रत्येक क्षण नव्या उत्साहाने साजरा करण्याची सवय अंगी बाळगून नव्या वर्षात पदार्पण करूया.

..... सारिका अनंत चिकटे