नांदेड जिल्ह्यात खरे आदिवासी व खोटे आदिवासी असा प्रश्न निर्माण करून
गेल्या काही वर्षांपासून जनसामान्यांना वेठीस धरला आहे,अनेक
विद्यार्थ्यांचे जातीचे वैधता प्रमाणपत्र प्रलंबीत असून विद्यार्थ्यांच्या
शैक्षणिक वाटचालीत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत,अश्या वातावरणात
नांदेड शहरातील अन्यायग्रस्त आदिवासी मन्नेरवारलू समाजातील गरीब होतकरू
विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत कुठे अडथळा निर्माण होऊ नये
यासाठी दिनांक ९ जुलै २०१७ रोजी "उड़ाण एज्युकेशनल अँड सोशल
फाऊंडेशन,नांदेडची" स्थापना करण्यात आली, या संस्थानच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासिकेच पाहिलं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला व तो
यस्थवी रित्या संपन्न झाला,आज त्या अभ्यासिकेत शंभराहून अधिक विद्यार्थी
लाभ घेत आहेत..
"युवकांचा समूह", या व्हाट्स अँप ग्रुपच्या माध्यमातून साकारण्यात
आलेल्या या संकल्पनेला समाजातूनही भरपूर सहकार्य लाभले,अनेकांनी आर्थिक
निधी देऊन सहकार्य केले तर काहींनी साहित्य,स्पर्धा परीक्षा पुस्तके देऊन
मदतीचा हात समोर केले, उड़ाण च्या उज्वल भरारीतून अनेक विद्यार्थी घडवण्याचं
संकल्पना मणी बाळगून,उरावर्ती अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या भविष्याची
ज्वलंत यशाची किनारे घेऊन उड़ाणने उड़ाण घेण्यास मैदातनात उतरले,संस्थापक
श्री.नयनजी पुदलवाड यांच्या संकल्पनेतून उड़ाण संस्थानाची मुहुर्तमेढ रवली व
सामजिक बांधिलकी जपत आपल्या समाजाच्या हितासाठी ही संकल्पना मांडण्यात
आली,या उड़ाणचे अध्यक्ष श्री.अमितकुमार कंठेवाड,सचिव अतुल पेदेवाड,उपाध्यक्ष
गंगाधर गिरोड,कोषाध्यक्ष श्रीनिवास कणकावाड, विशेष जेष्ठ मार्गदर्शक
श्री.अंबादास आकुलवाड ,सदस्य,सुनील टिप्परसे,श्याम बास्टेवाड, गिरीश
भाटे,श्रीनिवास इज्जपवार,शंकर बंतलवाड,बालाजी परोडवाड,श्रीपाद राऊतवाड
अश्या प्रकारे ही एक ग्रुप उड़ाणच कार्य तन मन धनांनी स्वतःच्या जबाबदारीवर
करण्याच धाडस दाखवले,आणि पाहता पाहता समाज बांधवानी मदतीचा हात समोर करून
आपल्या सामाजिक जीवनाचा एकतृतीयांश हिस्सा या समाजकार्याला लावण्याचा
माणुसकीचा सिद्धांत जोपासला...
१९ व्या शतकात महिला शिक्षणासाठी प्रस्थापित व्यवस्थेशी लढा देत,
महात्मा फुले दांपत्याने अंगावर शेण दगड झेलेले मात्र स्त्रियांना चूल आणि
मूल या पलीकडचे शिक्षण देऊन धर्म व्यवस्थेत बधिस्थ असलेल्या स्त्रियांना
मुक्त केलं,१८४८ साली पुण्याच्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरवात
करून,देशातल्या पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुलेंनी हे कार्य अवगत
केले.
"ज्यांनी मुलगा नाही शिकवला तीही पापाचा भागीदार झाला,जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला तैसे शिक्षण देणे अगत्याचे"
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या ओळीतून शिक्षण हे मूलभुत गरज असल्याचे
सांगितले,पुढे शाहू महाराजांनी शिक्षण हे हक्कच व सक्कीचे करून बहुजन
समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात वाहून नेण्याचं कार्य केले,याच स्थितीवर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात शिक्षण हे जन्मसिद्ध हक्क
आहे,सर्वसामान्यांसाठी शिक्षणाचे दारे उघडे केले,आणि शिक्षण हे वाघिणीचे
दूध आहे.अशी उपाधी दिली..
यावरून सर्व महापुरुषांनी शिक्षणासाठी तडजोड केले,मात्र आजची परिस्थिती
काही औरच आहे,इथे गरीब अति गरीब होत चालले आहेत आणि श्रीमंतांचे मजले वाढत
चालेले आहेत,अश्या परिस्थितीत अनेक कुटुंब अडकून पडलेत,की आजही शिक्षणाचा
घोट त्यांनी घेतलेला नाही,आर्थिक परिस्थिशी झुंज घेत,शैक्षणिक आरक्षणावर
मनोविकृत्यांनी आणलेल्या खोटे आदीवासी म्हणून शिक्यावर, या व्यवस्थेशी झुंज
घेत ,शिक्षणाच्या प्रवाहा पासून दूर लोटले गेले,ही परिस्थिती भयावह
आहे,खाजगी शिक्षण,शहरी शिक्षण आणि स्पर्धेच्या युगात शैक्षणिक साहित्याची
भरमसाठ भार हा परवडणारे नाही,अश्या परिस्थितीशी लढा देणाऱ्या,शिक्षणापासून
दूर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत गरजातील काही आवश्यक गरजा
भागवण्याचे,होतकरू ,जिद्दी मुलांना शिक्षणाची ओढ आहे मात्र परिस्थिती तिथे
आड येथे,प्रलंबित जात वैधता प्रमानपत्राने काहींचे शिक्षणाचे दारेही बंद
झाले, अश्या अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहेत,अश्या
वेळी सामाजिक बांधिलकी जपत समाजातून समाजसेवाचा ध्यास मणी बाळगून मानवतेचा
हात समोर करून "उड़ाण एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन,नांदेडची" स्थापना
करण्यात आली.
उड़ाणच्या माध्यमातून अभ्यासिकेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके
पुरवली जाते,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबारांचे आयोजन करण्यात
येते,महिण्यातुन एकदा प्रमुख अध्यापनाचे कार्यशाळेचे आयोजन करून
विद्यार्थ्यांना उज्जवल यशाचे पाडे पुरवली जाते,दिनांक १२ ऑगस्ट २०१७ रोजी
पुण्यातील राज्यसेवा व लोकसेवा प्रशिक्षण संस्थांचे संचालक श्री.राहुल
खंधारे सर,सौ.उज्जवल कोमवाड,समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार,
वनक्षेत्रपाल कु.सायली शंकरवार, सहाय्यक वनरक्षक श्री.श्रीनिवास लखमावाड
इत्यादी प्रमुख मार्गदर्शकांच्या उपस्थित नांदेडच्या कुसुम सभागृहात
हजारोंच्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांना उड़ाण च्या माध्यमातून मोफत
मार्गदर्शन शिबारांचे आयोजन करण्यात आले होते...
अश्या परीने उड़ाण च कार्य अभ्यासिके पासून ते समाजातील गोरगरीब कुटुंबातील
मुलींच्या लग्नासाठी खर्च उड़ाण च्या सामाजिक उपक्रमातूूु साकारण्यासाठी
विवाह मेळावा सारखे उपक्रम राबविण्यात येेेत आहेत,त्यासाठी उड़ाण ची टीम
परीश्रमासाठी सिद्ध आहे...
लेखक:- श्रीपाद नागनाथ राऊतवाड
मो.८००७८७००२६
नांदेड
Twitter
Facebook
Digg
Delicious
Stumble