भरुनी मेघ नभी येता
जलबिंदूंची साठवण
किरणांचा मारा होता
दिसे इंद्रधनुची कमान...
ता ना पि हि नि पा जा
सप्तरंगाची ही उधळण
एकाच थेंबातुनी होते
कैसे वैविध्यतेचे दर्शन...
एकरूप तदाकार ऐसे
एकाच ठायी एकवटले
एकतेची शिकवण द्याया
नील गगनी हो शोभले...
इंद्रधनुच्या किमयेने होई
उल्हासाचा उत्सव साजरा
ऊनपावसाचा खेळ चाले
अंतरात हासे भाव लाजरा...
आनंदाच्या लहरी किती
तनामनास विभोर करती
हृदयीचा तो मयूर नाचतो
इंद्रधनुच्या कमानीवरती...
विजया पाटील,
विषय शिक्षिका
नवापूर जि.नंदुरबार
मो.क्र.-9422376396
मो.क्र.-9422376396