तंत्रज्ञानानुसार माध्यमांनी बदलावे
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांचे प्रतिपादन
चंद्रपूर
- जेव्हा संगणक आला, तेव्हा अनेकांनी नाक मुरडले. आता टिव्ही, रेडिओनंतर
आॅनलाइन मीडियाने मोठा बदल केला आहे. सोशल मीडियामुळे वैचारिक क्रांती होत
आहे.
तंत्रज्ञानानुसार माध्यमांनी बदलावे, अन्यथा तग धरणे कठिण होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांनी केले.
त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी काव्यशिल्प
इ- दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले. यावेळी त्यांनी संवाद साधला. यावेळी इको -
प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, पुरुषोत्तम चौधरी, मंगेश खाटिक यांची उपस्थिती
होती.
नव्या
पीढी पुस्तकापासून दूर गेला असलातरी वाचनापासून जवळ आले. वाचनाचे माध्यम
बदलत आहे. हा बदल नव्या पीढीने स्वीकारला आहे. त्यामुळे व्यक्त होण्यासाठी
व्यासपीठ उपलब्ध झाले आहेत. त्याची व्याप्तीही मोठी आहे. दिवाळी साहित्य
ब्लाॅग रुपात मांडण्याची कल्पना नवीन असली तरी अभिनव आहे. त्यात आणखी
बदलाची संधी आहे. तो लोकोपयोगी माहितीचा ठेवा व्हावा, अशी अपेक्षा मनोहर
सप्रे यांनी व्यक्त केली.
देवनाथ
गंडाटे यांनी ब्लाॅग, डिजिटल आणि इ- दिवाळी अंकामागील भूमिका विषद केली.
कार्यक्रमाला धर्मेंद्र लुनावत, गोविल मेहरकुरे, ललित लांजेवार, नितीन
बुरडकर उपस्थित होते.
Twitter
Facebook
Digg
Delicious
Stumble